मलायन वाघ मलेशियाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. मात्र, हे वाघ आता पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलात केवळ १५० वाघांची नोंद करण्यात आली आहे. आता अनेक वाघांच्या मृत्यूमुळे काहींनी या परिस्थितीला ‘राष्ट्रीय आणीबाणी’ म्हणून घोषित केले आहे. मलायन वाघ नामशेष का होत आहेत? त्यांच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे? या वाघांचे महत्त्व काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

मलायन वाघ

‘MalaysianWildlife.org’ नुसार वाघाचे वैज्ञानिक नाव पँथेरा टायग्रिस जॅकसनी किंवा पँथेरा टायग्रिस मॅलेनिस आहे. हे सहसा प्रायद्वीपीय मलेशिया, तसेच सिंगापूर बेटावरील जंगलांमध्ये आढळतात. हे वाघ सुमारे आठ फूट लांब असतात आणि त्यांचे वजन जवळ जवळ १३० किलो इतके असू शकते. ते रानडुक्कर, हरीण, अस्वल, हत्तीचे पिल्लू आदींची शिकार करतात. जंगलात त्यांचे आयुर्मान २० वर्षांपर्यंत असते. मलायन वाघ हे मलेशिया देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. ते देशाच्या ‘कोट ऑफ आर्म्स’वर केशरी रंगासह चित्रित केले गेले आहे. वाघांच्या सर्वांत लहान प्रजातींपैकी एक असलेले मलायन वाघ दोन दशकांपासून वाघांची उप-प्रजाती म्हणून ओळखले जात आहेत.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
Hyena herd tried to attack the lion
‘संकटात सगळ्यांचे नशीब साथ देत नाही…’ तरसाच्या कळपाने केला सिंहावर हल्ला करण्याचा प्रयत्न… पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप
Ashwini Jagtap statement during Devendra Fadnavis meeting in Kalewadi for Shankar Jagtap campaign
चिंचवड: वाघ गेला, ही वाघीण पिल्लांना एकटं पडू देणार नाही; आमदार आश्विनी जगताप कुणाला उद्देशून म्हणाल्या?

हेही वाचा : पाकिस्तान सरकार इम्रान खान यांच्या राजकीय पक्षावर घालणार बंदी? कारण काय?

पूर्वी ही इंडो-चायनीज वाघाचीच प्रजाती असल्याचे मानले जात होते. वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड मलेशिया (डब्ल्यूडब्ल्यूएफ)नुसार, मलायन वाघ वन्यजीव संरक्षण कायदा २०१० अंतर्गत संरक्षित आहेत. त्यांना ‘आययूसीएन रेड लिस्ट फॉर थ्रेटेन्ड स्पेसीज’अंतर्गत ‘गंभीरपणे धोक्यात’ असेही वर्गीकृत करण्यात आले आहे. ‘डाउन टू अर्थ’नुसार मलेशियामध्ये १९५० च्या दशकात सुमारे तीन हजार वाघ होते.

मलायन वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर का आहेत?

अधिवास आणि शिकारीमुळे या दशकात वाघांची संख्या खूप कमी झाली आहे. जंगलात १५० हून कमी वाघ उरले आहेत. ‘डाउन टू अर्थ’नुसार मलेशियाच्या नैसर्गिक संसाधने आणि निसर्गसंवर्धन उपमंत्र्यांनी जूनमध्ये देशाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहासमोर हा क्रमांक जाहीर केला होता. ही संख्या पहिल्या राष्ट्रीय व्याघ्र सर्वेक्षणातून आली आहे. २०१६ ते २०२० या कालावधीत वन्यजीव आणि राष्ट्रीय उद्यान विभाग, डब्ल्यूडब्ल्यूएफ-मलेशिया आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी हे सर्वेक्षण केले होते. जूनमध्ये मृत वाघाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रीय चिन्हाबद्दल नवीन चिंता निर्माण झाली होती. ग्रामीण उत्तरेकडील केलांटन राज्यातील एका भागात वाघाचे मृत शरीर फोटोंमध्ये दिसून आले. वनरक्षकांना हे अवशेष सापडले होते.

‘सीएनएन’नुसार नोव्हेंबर ते मेदरम्यान कारच्या धडकेत किमान चार वाघांचा मृत्यू झाला. ‘डाऊन टू अर्थ’ने आपल्या वृत्तात सांगितले की, सरकारने वाघांच्या संवर्धनासाठी नऊ धोरणात्मक उपाययोजना सुरू केल्या. २०२१ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या उपाययोजना २०३० पर्यंत सुरू राहतील. सरकार ओरांग अस्ली (मलय द्वीपकल्पातील सर्वांत जुनी आदिवासी प्रजाती) यांची शिकारींना पकडण्यासाठी आणि त्यांना ट्रॅक करण्यासाठी मदत घेत आहे.

राष्ट्रीय आणीबाणी

‘MalaysianWildlife.org’ नुसार, बाली वाघ, कॅस्पियन वाघ व जावन वाघ हे सर्व नामशेष झाले आहेत. आता तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मलायन वाघांची परिस्थितीही गंभीर आहे. “मलायन वाघांची दुर्दशा हे एक राष्ट्रीय संकट आहे याकडे सर्व मलेशियाची पूर्ण लक्ष असण्यासह वचनबद्धता आवश्यक आहे,” असे वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड मलेशिया (डब्ल्यूडब्ल्यूएफ)चे संवर्धन संचालक हेन्री चॅन यांनी ‘सीएनएन’ला सांगितले. “हे प्राणी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. फक्त एक वाघ गमावल्याने संपूर्ण प्रजाती नामशेष होण्याच्या जवळ जाते. प्रत्येक वाघाचे जीवन प्रजातीच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे चॅन पुढे म्हणाले.

हेही वाचा : Puja Khedkar Controversy: आयएएस अधिकारी, प्रशिक्षणार्थी अधिकारी यांच्यासाठी काय नियम असतात?

वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी मलेशियाचे कंट्री डायरेक्टर मार्क रायन दारमाराज यांनी सांगितले की, पहांग येथे वाघाची कवटी व हाडे यांच्यासह शिकारींना अटक करण्यात आली. “वाघांच्या अधिवासाचे नुकसान, शिकार करणे व मानव-वाघ संघर्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्या निवासस्थानातून रस्त्यांचे बांधकाम झाल्यामुळे अलीकडील अनेक घटनांमध्ये असे दिसून आले आहे की, या प्राण्यांना वाहनांची धडक बसत आहे. हादेखील त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला महत्त्वाचा घटक आहे”, असेही दारमाराज यांनी स्पष्ट केले.