Mamta Kulkarni Mahamandaleshwar: माजी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना शुक्रवारी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून घोषित करण्यात आले. एका मुलाखतीत ५२ वर्षीय ममता यांनी या आध्यात्मिक परिवर्तनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. किन्नर आखाड्यातील लोक भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या अर्धनारीश्वर अवताराचे प्रतिनिधित्व करतात. अशा आखाड्याच्या महामंडलेश्वर होणे म्हणजे माझ्या २३ वर्षांच्या आध्यात्मिक साधनेनंतर ऑलिम्पिक पदक जिंकण्यासारखे आहे, असे ममता यांनी इंडिया टुडेला सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर इंडियन एक्स्प्रेसने किन्नर आखाड्याविषयी प्रत्यक्ष जाऊन घेतलेला हा आढावा.

रात्रीचे १ वाजले होते..

रात्रीचे १ वाजले होते. प्रयागराजच्या महाकुंभात संगमाजवळ एक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गट परीक्षेत यश मिळावे म्हणून महंत अवंतिका गिरींचे आशीर्वाद घेण्यासाठी आला होता. जवळच एक वृद्ध दाम्पत्य अघोरी साधूच्या मदतीने मध्यरात्रीच्या काली पूजेसाठी प्रतीक्षेत होते. तर, बंगळुरू आणि बंगाल येथील आयटी व्यावसायिक आणि डॉक्टर्स राख फासून, कडाक्याच्या थंडीत अर्धनग्न होऊन ढोलाच्या आदिम ठेक्यांमध्ये एका अतिंद्रिय क्षणात लीन झालेले होते. या वातावरणात इंडियन एक्स्प्रेसने अवंतिका गिरी या किन्नर आखाड्याच्या महंतांशी संवाद साधला.

Explosion at an ordnance manufacturing factory in Jawahar Nagar
भंडाऱ्यातील घटनेमुळे देशभरातील आयुध निर्माणीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे का?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य, “सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे, सगळ्यांनी…”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

आस्था हेच वैशिष्ट्य

आस्था हा भाव किन्नर आखाड्यात सर्वांना सामावून घेणारा मुख्य घटक आहे आणि हेच तृतीयपंथीयांच्या या मठसंस्थेचे खास वैशिष्ट्य आहे . “आम्ही ना पुरुष आहोत, ना स्त्रिया, पण दोघांमधील सर्वोत्तम गुण आमच्यात आहेत,” असे भगव्या वस्त्रांमध्ये, डोळ्यांत काजळ, आणि कपाळावर तेजस्वी लाल टिळा लावलेले गिरी सांगतात. आखाडा जात, धर्म, वय किंवा लिंग यांची कोणतीही मर्यादा न ठेवता सर्वांना आपलेसे करतो. “आम्हाला समाजाने मान्यता नाकारली याचा अर्थ असा नाही की, आम्ही त्याचा प्रतिशोध घेणार आहोत. सनातन धर्म हा इतरांप्रती वर्तन कसे असावे आणि आपले कर्तव्य काय याविषयी आहे. कुंभ हे आत्मज्ञानाचे रूपक आहे. जर तुम्हाला विज्ञानात रुची असेल तर, महाकुंभाच्या या काळात पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र अधिक तीव्र होते आणि मानवी ऊर्जांवर ते परिणाम करते हे नक्की जाणून घ्या,” असे नाट्यशास्त्रात मास्टर्स मिळवलेले आणि प्रशिक्षित ओडिसी नर्तक गिरी यांनी सांगितले.

सांस्कृतिक आणि नागरी दृष्टिकोनातून किन्नर नेहमीच मुख्य प्रवाहाचा भाग राहिले आहेत. पुराणकथांमध्ये शिवाचे अर्धनारीश्वर (अर्धा पुरुष, अर्धी स्त्री) स्वरूप दाखवले गेले आहे आणि रामायणात त्यांना पुरुष व स्त्रियांइतकाच समान दर्जा दिला आहे. ब्रिटिशांचे राज्य भारतावर येण्यापूर्वी राजकीय व्यवस्थेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, १८७२ साली ब्रिटीश कायद्यांनी त्यांना गुन्हेगार ठरवले आणि समाजाबाहेर टाकले. ही कलंकाची छाया आजही त्यांच्यावर टिकून आहे. “आम्ही फक्त मनुष्य आहोत, ‘तृतीयपंथी’ नाही. म्हणूनच आम्ही सामाजिक दर्जाविशेषांना नाकारतो,” असे गिरी म्हणतात. ही लोकशाहीची मूल्येच तरुणांना किन्नर आखाड्याकडे आकर्षित करत आहेत.

किन्नर आखाडा

२०१५ साली स्थापन झालेला किन्नर आखाडा आता क्विअर लोकांसाठी सुरक्षित ठिकाण ठरला आहे. “सर्वोच्च न्यायालयाच्या २०१४ च्या नालसा निर्णयाने तृतीयपंथीयांना मान्यता दिली आणि आम्हाला समान अधिकार दिले. २०२० चा ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायद्याने त्यांच्या विकासात भर घातली. आम्हाला विशेष वागणूक नको, फक्त सन्मान आणि समानता हवी आहे,” असे आखाड्याच्या प्रमुख कल्याणी नंदगिरी सांगतात. प्रत्येक प्रकारच्या ट्रान्सजेंडर व्यक्ती येथे एकत्र येतात. आपापल्या कथा आणि चिंता शेअर करतात. कुंभसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांवर चर्चा करत, भाविकांसाठी भोग वितरण, शिक्षण शिबिरे, एचआयव्ही जागरूकता मोहिमा कशा नियोजित करायच्या यावर विचारमंथन करतात. तसेच “आम्ही काय परिधान करू, प्रत्येकजण कसा दिसेल, हे देखील ठरवतो,” असे नंदगिरी यांनी सांगितले. आपल्या दागिन्यांवरून हात फिरवत आणि रेशमी साडीचा पदर झळकवत, “हेच आमचे कवच आणि अभिमान आहे. जगाने जरी आमच्यावर अन्याय केला तरी आम्ही जीवन साजरे करणे का थांबवावे?” असे त्या विचारतात.

येथील प्रत्येकाजवळ शोषणाच्या काळ्या छायांची एक कहाणी आहे. त्यामुळे त्यांचे परस्पर नाते घट्ट झाले आहे. “किन्नर आपले शिक्षण पूर्ण करण्याबाबत खूप जागरूक असतात. कारण शिक्षण हे मुख्य प्रवाहात येण्यासाठीचे सर्वात मोठे साधन आहे. तरीही लोकांचा दृष्टिकोन बदलत नाही. मी शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईतील एका कंपनीत टेक सपोर्ट स्टाफ म्हणून नोकरी मिळवली. पण वर्किंग होस्टेलमधील माझ्या रूममेट्स मला नापसंत करत होत्या, त्यापैकी काहींनी माझे लैंगिक शोषण केले. पण, सर्वात वाईट अनुभव म्हणजे माझ्या सहकाऱ्यांनी मला तीन दिवस बाथरूममध्ये बंद केले. तेव्हा मी निर्णय घेतला आणि एचआयव्ही प्रतिबंधासाठी काम करणाऱ्या एका एनजीओमध्ये सहभागी झाले. त्यानंतर मी आखाड्यात प्रवेश घेतला, दीक्षा घेतली आणि अशा संस्थांमध्ये चालणाऱ्या वैदिक शिक्षणाचा अभ्यास केला. या आध्यात्मिक सामूहिकतेत मला माझे ध्येय सापडले,” असे गिरी सांगतात.

अघोरी साधू महत्त्वाचे

किन्नर आपल्या समारंभांसाठी अघोरी गुरूंना बोलावतात. कारण त्यांना वाटते की, अघोरी त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात. रूढ प्रथांना विरोध करत अघोरी संन्यासी जगाकडे द्वैताच्या चष्म्यातून पाहत नाहीत. मृत असो किंवा जिवंत, खाण्यायोग्य असो वा नसो ते कोणावरही अन्याय करीत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीला महत्त्वाचे मानतात. कारण प्रत्येक वस्तू पंचमहाभूतांनी तयार झालेली असते. ते नकारात्मक भावनांना प्रतिसाद देत नाहीत. “लोक त्यांच्या अलिप्ततेला, त्यांच्या कठोरतेला आणि विचित्र प्रथांना घाबरतात. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की ते शुद्धतावादी, सर्वसमावेशक आणि लोकशाहीप्रिय आहेत,” असे गिरी सांगतात.

या संभाषणादरम्यान डॉक्टर्स आणि आयटी अभियंते हवन पूजेसाठी अग्निकुंडात लाकूड पेटवत होते. त्यावेळी विचार येतो की, विज्ञानाचे ज्ञान असलेले हे लोक श्रद्धेशी कसे जुळवून घेतात किंवा अघोर पूजा कशी करतात? बेंगळुरूमधील एक सॉफ्टवेअर अभियंता (तो नाव सांगू इच्छित नाही) म्हणतो, “अमेरिकन खगोलतज्ज्ञ कार्ल सेगन यांनी म्हटले होते की, विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांपासून वेगळे आहेत. हा विचार दोन्ही विषयांवर अन्याय करणारा आहे. विज्ञान हे पुराव्याच्या आधारे माझ्या वास्तवाचे आकलन करण्याविषयी आहे. श्रद्धा ही माझ्या मानसिक ताकदीविषयी आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याविषयी आहे. आजच्या तरुणांसाठी हे गरजेचे आहे.” या अग्निकुंडातील राख त्यांना आठवण करून देईल की, गृहस्थ असो किंवा संन्यासी त्यांचा प्रवास सारखाच असतो.

Story img Loader