लोकसभा निवडणुकीमध्ये ‘मराठा मतपेढी’ ची बांधणी झाल्यानंतर छोटेसे आंतरवली सराटी हे गाव पडद्यामागच्या राजकारणाचे केंद्र बनले आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव निकालांवर दिसून आला. आता त्यांच्या राजकारणाचा किती परिणाम विधानसभा निवडणुकीवर, याविषयी.

आरक्षण आंदोलन ते मराठा मतपेढी…

१३ महिन्यांत ६६ दिवस उपोषण करून मराठा हेच कुणबी आहेत, अशी मांडणी करत आंतरवली सराटी या सुमारे १२०० लोकसंख्येच्या गावातून मनोज जरांगे यांनी मराठा मतपेढी घडवली. त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. कोणताही पक्ष स्थापन न करता मराठवाड्यात ८ लाेकसभा मतदारसंघात प्रभाव निर्माण करणाऱ्या जरांगे यांनी पहिले उपोषण २९ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू केले. पुढे सरकारच्या दबावाला बळी न पडणारा मराठा आंदोलक अशी त्यांची प्रतिमा बनत गेली. या काळात ते मागणी करत असलेल्या प्रत्येक बाबीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे सकारात्मक होते. जरांगे यांच्या भेटीला येणाऱ्या शिष्टमंडळात शिवसेना नेत्यांचा वरचष्मा असे. संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत हे शिष्टमंडळात असत. तसे ते बोलणी किंवा वाटाघाटी करण्यासाठी नवखेही होते. अधून- मधून मंत्री दादा भुसेही दिसत. भाजपकडून जालन्याचे पालकमंत्री म्हणून अतुल सावे असत. मात्र, ते काही बोलत नसत. आदाेलनकर्त्यांच्या मागण्यांवर काम करणाऱ्या न्यायमूर्ती शिंदे समितीचे कामकाज, त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे ज्यांंच्या नाव अडनावाच्या जुन्या नाेंदी ‘ कुणबी’ म्हणून सापडल्या त्यांना ओबीसी प्रवर्गातून जातीचे प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. आतापर्यंत म्हणजे अगदी दोन दिवसापूर्वीच्या प्रशासनाकडील नाेंदीनुसार, मराठवाड्यातून एक लाख ७२ हजार ६६ जणांना कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आले आहे. यातून सर्वाधिक लाभ बीड जिल्ह्यात झाला. या जिल्ह्यात एक लाख ११ हजार ३०२ जणांना प्रमाणपत्रे मिळाली. एक प्रमाणपत्र म्हणजे त्या घरातील चार किंवा पाच मतदार. जरांगे यांच्या मराठा मतपेढीचा हा आकार त्यांच्या आक्रमक मागण्यांमुळे वाढत गेला.

akola vidhan sabha
‘मविआ’च्या जागा वाटपावर राजकीय समीकरण ठरणार, अकोल्यातील पाचपैकी कुणाच्या वाट्याला किती जागा?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Marathwada NCP, constituencies Marathwada,
मराठवाड्यात राष्ट्रवादीत फूट पडलेल्या मतदारसंघांमध्ये चुरस
Haryana assembly bjp victory
जाटेतर, दलित, अपक्षांची साथ; हरियाणामध्ये भाजपच्या विजयात इतर मागासवर्गीयांचा महत्त्वाचा वाटा
Deputy Chief Minister Ajit Pawar NCP will contest assembly elections from Pathri constituency print politics news
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पाथरीवर लक्ष
Sudhakar Shrangare, BJP,
भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे पक्षांतराच्या तयारीत
BJP to change candidates in Gadchiroli and Armori Assembly election
गडचिरोलीत भाजप भाकरी फिरविणार?
Embarrassment in Mahavikas Aghadi from Akola East Constituency Assembly Elections 2024 print politics news
अकोला पूर्ववरून महाविकास आघाडीत पेच

हेही वाचा:इस्रायली सैन्य पॅलेस्टिनी नागरिकांना ढाल म्हणून कसे वापरत आहे? काय आहे ‘मॉस्किटो प्रोटोकॉल’?

प्रवास केवळ १३ महिन्यांचा नव्हे?

मराठा मतपेढीचे सध्याचे नेते जरी मनोज जरांगे असले तरी ही मतपेढी जाणीवपूर्वक बांधली गेली. कोपर्डी अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यात निघालेल्या ५८ मोर्चांमध्ये मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली. तत्पूर्वी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. पुढे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे बेमालूम मिश्रण करत आरक्षण मागणीचा आवाज उंचावला गेला. तेव्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते. आरक्षण मागणीच्या आडून होणाऱ्या फडणवीस विरोधाला नवनवी कारणे मिळत गेली. याच काळात राजकीय यश मिळविणाऱ्या भाजपमध्ये दिग्गज मराठा नेते दाखल झाले होते. तत्पूर्वी मराठा जातीची प्रतिमा पुरोगामी करणारे अनेक उपक्रम आखण्यात आले. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांनीही यामध्ये मोठा सहभाग घेतला. अनेक उपक्रमांच्या उभारणीमधून मराठा मतपेढी बांधली गेली. मनोज जरांगे हे या बांधणीच्या टोकावरचे सर्वाेच्च नेते. मराठा मतपेढीचा हा गेल्या १० वर्षांतील प्रवास लक्षणीय मानला जातो. पण तो फक्त १३ महिन्याचा नाही.

जरांगे यांचा प्रभाव किती?

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील सात लोकसभा मतदारसंघात मराठा- मुस्लिम व दलित मतांचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. या आठ मतदारसंघातील ४६ मतदारसंघावर जरांगे यांच्या मतपेढीचा थेट परिणाम दिसून आला होता. तो कायम राहील, अशी शक्यता गृहीत धरून आता सर्वपक्षीय नेते बांधणी करू लागले आहेत. मराठा मतांचा प्रभाव वाढविताना जरांगे यांनी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मराठा समाजाचे विरोधक असल्याची प्रतिमा निर्माण केली. परिणामी मराठवाड्यासह नाशिक, सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा या जिल्ह्यातील मतदारसंघावर जरांगे यांचा प्रभाव राहील असे मानले जाते. या जिल्ह्यांतील काही मतदारसंघात निवडून येऊ शकणाऱ्या २० – २२ जागांवर जरांगे यांचे समर्थक जोर लावणार असल्याचे सांगण्यात येते. निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्थेत वाटाघाटीसाठी अधिक पैस असावा असे प्रयत्न केले जात आहेत. आरक्षित मतदारसंघात काही जणांना पाठिंबा देण्यावर जरांगे यांचा भर हा त्या प्रयत्नांचा भाग असल्याचे मानले जाते. सध्या जरांगे यांची लोकप्रियता एवढी आहे की, त्यांची छायाचित्रे आकाशदिव्यांवरही झळकली आहेत.

हेही वाचा: हरदीप सिंह निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास कॅनडाचा नकार; राष्ट्रीय तपास संस्थेला प्रमाणपत्र का हवेय?

जरांगे यांचे राजकीय मैत्र कोणाशी?

मराठा – मुस्लिम व दलित मतपेढी काँग्रेसला सहायकारक असल्याचे दिसून आल्यानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. जरांगे यांच्या आंदोलनावर पाोलिसांनी लाठीमार केल्यानंतर पहिल्यांदा पोहचणाऱ्या नेत्यांमध्ये शरद पवार हे होते. तेव्हा काही हुल्लडबाज मुलांनी पवार यांना विरोधही केला होता. मनसेचे नेते राज ठाकरे हेही पहिल्या टप्प्यात भेटून गेले होते. पण त्यांनतर त्यांनी या आंदोलनावर कोणतीही प्रतिक्रया व्यक्त केली नाही. पुढे असदुद्दीन ओवेसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जरांगे यांचे कौतुक केले. पहिल्या टप्प्यात ॲड्. प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांचे कौतुक केले. जरांगे यांनीही आंबेडकरांचे कौतुक केले. मात्र, आता वंचित राजकारण जरांगे यांचा वजा करून असेल, असे त्यांनी जाहीर केले. जरांगे कोणाच्या बरोबरीने राजकारण करणार याचे अंदाज बांधले जातात. १३ महिन्यांच्या कालावधीमध्ये जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र टीकेच्या ‘ सुरक्षित’ अंतरावर ठेवले. देवेंद्र फडणवीस हेच त्यांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष टीकेचे धनी होते. त्यामुळे जरांगे यांचा भाजप विरोध बहुतेकांनी हेरला. मात्र, भाजपमधील अनेक मंडळी चांगली असल्याचे जरांगे नुकतेच म्हणाले आहेत. त्यामुळे जरांगे यांना राजकीय यश मिळाले तरी त्यांचे राजकीय मित्र कोण हे निवडणुकीदरम्यान ते कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करतात यावर स्पष्ट होईल.