भारतीय विद्यार्थी शिक्षणासह नोकरीसाठीही ऑस्ट्रेलियाला प्राधान्य देताना दिसतात. आता ऑस्ट्रेलियाने एक नवीन योजना आणली आहे; ज्यामुळे भारतातील प्रतिभावान तरुणांना काही काळ देशात काम करता येणार आहे. या योजनेचे नाव आहे ‘मोबिलिटी अरेंजमेंट फॉर अर्ली-प्रोफेशनल स्कीम’ (MATES). ही योजना नक्की काय आहे? याच भारतीयांना काय फायदा होणार? या योजनेसाठी कोणाला अर्ज करता येणार? या योजनेंतर्गत व्हिसा कसा दिला जाईल? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

MATES म्हणजे काय?

ऑस्ट्रेलियाच्या गृह विभागाच्या मते, MATES ही योजना भारतीय विद्यापीठातील पदवीधरांना आणि करिअरच्या सुरुवातीच्या काळात व्यावसायिकांना ऑस्ट्रेलियामध्ये दोन वर्षे काम करण्याची संधी प्रदान करते. २३ मे २०२३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारताने मायग्रेशन अॅण्ड मोबिलिटी पार्टनरशिप अरेंजमेंटला (MMPA) सुरुवात केली. MMPA ही द्विपक्षीय फ्रेमवर्क योजना आहे; जी दोन्ही देशांतील बेकायदा आणि अनियमित स्थलांतराशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. MATES ची स्थापना MMPA अंतर्गत करण्यात आली आहे. ही योजना या वर्षी डिसेंबरपासून व्यावसायिकांसाठी खुली होईल, असे लुधियानास्थित शिक्षण सल्लागार, ‘ईडीयू प्लॅनेट’चे स्थलांतरविषयक सल्लागार गौरव चौधरी यांनी सांगितले.

हेही वाचा : बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?

MATES अंतर्गत व्हिसासाठी कोण अर्ज करू शकते?

वय ३० किंवा त्यापेक्षा कमी वयाचे भारतीय नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतील. त्यामध्ये या योजनेंतर्गत यापूर्वी MATES मध्ये भाग न घेतलेले, इंग्रजी भाषाकौशल्यात प्रवीण (किमान सहा गुण असलेले), अर्जाच्या वेळी पात्र शैक्षणिक संस्थेतून दोन वर्षांच्या आत पदवी प्राप्त केलेले आणि खालीलपैकी एक पात्रता पदवी असलेले अशा व्यक्तींचा समावेश होतो. त्यात अक्षय ऊर्जा, खाणकाम, अभियांत्रिकी, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी), कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), वित्तीय तंत्रज्ञान (फिनटेक) व कृषी तंत्रज्ञान यापैकी एका विषयात पदवीप्राप्त व्यक्ती अर्ज करू शकतील. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) रँकिंग २०२४ नुसार भारतातील टॉप १०० विद्यापीठांमधील पदवीधर या योजनेसाठी पात्र असतील. पंजाब विद्यापीठ, चंदिगड विद्यापीठ, थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी आणि लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, ही पंजाबमधील काही पात्र विद्यापीठे आहेत.

वय ३० किंवा त्यापेक्षा कमी वयाचे भारतीय नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतील. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

या योजनेचे फायदे काय?

MATES लाभार्थी दोन वर्षांपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये राहण्यास आणि काम करण्यास सक्षम असेल. तरुण व्यावसायिकांना त्यांची कौशल्ये विशेषत: वर सूचीबद्ध केलेल्या क्षेत्रांमध्ये विस्तारित करण्यास समर्थन म्हणून ही योजना तयार करण्यात आली आहे. प्रायोगिक कार्यक्रम म्हणून प्रतिवर्ष प्रतिकार्यक्रम प्राथमिक अर्जदारांसाठी तीन हजार ठिकाणांपासून या योजनेला सुरुवात करण्यात येईल. या योजनेतील लाभधारक पती, पत्नी किंवा मुलांना आणण्यासाठी अर्ज करू शकतील. अवलंबितांना ऑस्ट्रेलियामध्ये कामाचे अधिकार असतील आणि त्यांना वार्षिक कॅपमध्ये मोजले जाणार नाही.

मुक्कामाचा कालावधी किती?

व्हिसाधारकांना ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम प्रवेश करण्यासाठी १२ महिन्यांचा कालावधी मिळेल आणि पहिल्या प्रवेशाच्या तारखेपासून ते २४ महिने ऑस्ट्रेलियामध्ये राहू शकतील. हा व्हिसा ऑस्ट्रेलियामध्ये अनेक प्रवेशांना अनुमती देईल. सहभागी तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी राहण्याची परवानगी देणाऱ्या दुसऱ्या व्हिसासाठी अर्ज करून, त्यांचा मुक्काम कालावधी वाढवू शकेल. परंतु, व्हिसासाठी सर्व आवश्यक पात्रता पूर्ण करणे महत्त्वाचे असेल.

हेही वाचा : हिंदू महिलेला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी; कोण आहेत तुलसी गबार्ड?

व्हिसा कसा दिला जाईल?

मतपत्रिकेद्वारे व्हिसा मंजूर केला जाईल. मतपत्रिका व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी एका प्रक्रियेद्वारे लोकांची निवड केली जाते. मतपत्रिका अर्जाचे शुल्क २५ ऑस्ट्रेलियन डॉलर्स आहे. त्यानंतर निवडलेले उमेदवार पुढील औपचारिकता पूर्ण करू शकतात, असे गौरव चौधरी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mates a new scheme for young indians to work in australia rac