मॅकडोनाल्डचा बर्गर जगप्रसिद्ध आहे. मॅकडोनाल्डच्या जगभरात ४० हजारांहून अधिक शाखा आहेत. ही जगातील सर्वात मोठी फूड चेन असल्याचे सांगितले जाते. मात्र, मॅकडोनाल्डमधील हॅम्बर्गर्स खाल्ल्याने अमेरिकेतील १० राज्यांमध्ये ई. कोलायचे रुग्ण आढळून आले आहेत. बर्गरमुळे अमेरिकेतील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अनेक आजारी पडत आहेत, असे यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने मंगळवारी सांगितले. सर्वात जास्त प्रकरणे कोलोरॅडो (२६) मध्ये नोंदवली गेली आहेत, त्यानंतर नेब्रास्कामध्ये नऊ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘सीडीसी’च्या म्हणण्यानुसार या आजाराने कोलोरॅडोमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आणि एका मुलाला गंभीर मूत्रपिंडाची समस्या उद्भवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, आजारी पडणार्या प्रत्येकाने आपण मॅकडोनाल्डचा बर्गर खाल्ला असल्याचे कबूल केले. नेमके हे प्रकरण काय? ई-कोलाय हा आजार काय आहे? हा आजार किती प्राणघातक आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
ई-कोलाय म्हणजे काय?
एशेरेकिया कोलाय याला ई-कोलाय म्हणूनही ओळखले जाते. हा एक प्रकारचा जीवाणू आहे, जो मानवांच्या तसेच प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतो असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. ई-कोलायच्या काही प्रजातींमुळे आजार होऊ शकतो. शिगा टॉक्सिन-प्रोड्यूसिंग ई. कोलाय (STEC) म्हणून ओळखल्या जाणार्या प्रकारामुळे विशेषतः अन्नाच्या विषबाधेसारखे गंभीर परिणाम दिसून येतात. एखाद्याला ई-कोलायची लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब तपासणी करणे आवश्यक असते, त्यांनी काय खाल्ले याची माहिती आरोग्य सेवा प्रदात्यांना देणेदेखील आवश्यक असते.
या लक्षणांमध्ये पोटात तीव्र वेदना, अतिसार आणि उलट्या यांचा समावेश असू शकतो. विशेष म्हणजे, कोलोरॅडोच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्यांना संसर्ग होतो असे बहुतेक लोक जीवाणूने दूषित काहीही खाल्ल्यानंतर सुमारे तीन ते चार दिवसांनी त्यांना लक्षणे दिसू लागतात. विभागाने हेदेखील स्पष्ट केले की, जीवाणूच्या संपर्कात आल्यानंतर एक ते १० दिवसांपर्यंत हा आजार राहू शकतो.
ई-कोलाय किती प्राणघातक?
कॅलिफोर्निया विद्यापीठातील डेव्हिस यांच्या मते, ई-कोलायची लागण झालेल्या जवळजवळ पाच ते १० टक्के लोकांमध्ये जीवघेणी स्थिती विकसित होते; ज्याला हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम (एचयूएस) म्हणतात. गंभीर ‘एचयूएस’च्या लक्षणांमध्ये लघवी कमी होणे, अत्यंत थकवा येणे, मूत्रपिंड निकामी होणे आणि हृदयाची गती वाढणे यांसारख्या लक्षणांचा समावेश असतो. ही लक्षणे सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यानंतर एका आठवड्याच्या आसपास दिसू लागतात. ‘डब्ल्यूएचओ’च्या म्हणण्यानुसार, हा संसर्ग प्रामुख्याने दूषित अन्नपदार्थ, जसे की कच्चे किंवा कमी शिजवलेले मांस आणि कच्चे दूध यांच्या सेवनाने माणसांमध्ये पसरतो. कडधान्य, पालक, कोशिंबीर, ल्युटस यांच्या सेवनानेदेखील ई-कोलायचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे. लागवडीदरम्यान किंवा हाताळणीदरम्यान पाळीव किंवा वन्य प्राण्यांच्या विष्ठेच्या संपर्कामुळे फळे आणि भाज्या दूषित होऊ शकतात.
अमेरिकेतील उद्रेकाचे कारण काय?
“प्राथमिक तपासणीच्या आधारे, बर्गरमधील कांदे हे संसर्गाचे संभाव्य स्त्रोत आहेत,” असे अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या माहितीवरून ‘सीडीसी’ने म्हटले आहे. हे कांदे केवळ हॅम्बर्गरवर वापरले जात होते, अशीही माहिती समोर आली आहे. अन्न सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणारे वकील बिल मारलर यांनी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला सांगितले की, कांदे स्वच्छपणे वाढणे खूप कठीण आहे आणि भूतकाळात साल्मोनेलासारखे इतर अनेक अन्नजनित आजार झाले आहेत. ते म्हणाले की, जर कांदे खरोखरच कारणीभूत असतील तर पुरवठादाराने ते केवळ मॅकडोनाल्डला दिले आहेत की ते इतरत्रही पाठवले आहेत, हे आरोग्य अधिकाऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे. देशाच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेनुसार, या वर्षी जूनमध्ये युनायटेड किंगडम (यूके) मध्ये मोठ्या प्रमाणावर ई-कोलायच्या उद्रेकाने २५० हून अधिक लोक आजारी पडले होते.
मॅकडोनाल्ड्सने उद्रेकाबद्दल काय प्रतिक्रिया दिली?
एका निवेदनात मॅकडोनाल्ड्सने म्हटले आहे की, प्रारंभिक तपासणीत असे दिसून येत आहे की आजार कांद्याशी संबंधित आहे, जे एकाच पुरवठादाराकडून प्राप्त केले गेले होते. कंपनीने कापलेल्या कांद्याचा वापर थांबवला आहे आणि आयडाहो, नेवाडा, न्यू मेक्सिको आणि ओक्लाहोमासारख्या काही प्रभावित भागांमध्ये या विशिष्ट बर्गरची विक्री तात्पुरती थांबवली आहे. “आम्ही अन्न सुरक्षा अत्यंत गांभीर्याने घेतो,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. एका व्हिडीओ संदेशात मॅकडोनाल्ड यूएसएचे अध्यक्ष जो एर्लिंगर म्हणाले, “माझ्यासाठी आणि मॅकडोनाल्डमधील प्रत्येकासाठी अन्न सुरक्षा खूप महत्त्वाची आहे.”
ई-कोलाय संसर्गाचा उपचार कसा करावा?
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, ई-कोलाय संसर्गासाठी कोणताही विशिष्ट उपचार नाही. सामान्यतः संसर्गग्रस्त व्यक्ती एका आठवड्याच्या आत स्वतःच बरा होतो. परंतु, या काळात भरपूर पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, इतर प्रकारच्या ई-कोलाय इन्फेक्शन्सच्या बाबतीत, जसे की मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय), मेंदुज्वर किंवा सेप्सिस अशी गंभीर लक्षणे दिसून आल्यास डॉक्टर्स रुग्णांना प्रतिजैविक लिहून देऊ शकतात. गंभीर आतड्यांसंबंधी आजारांवर उपचार करण्यासाठी अधूनमधून प्रतिजैविकांचा वापर केला जातो. परंतु, ई-कोलाय संसर्ग असलेले बहुतेक लोक प्रतिजैविकांशिवाय बरे होतात. ‘सीडीसी’च्या म्हणण्यानुसार, ई-कोलाय संसर्गासाठी प्रतिजैविकांचा वापर न करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम विकसित होण्याचा धोका वाढू शकतो.
ई-कोलाय संसर्गापासून कसे संरक्षण करावे?
संसर्गापासून संरक्षण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपले हात स्वच्छ धुणे. पाश्चराईज्ड दुधाचे सेवन टाळून तुम्ही संसर्गाचा धोका आणखी कमी करू शकता. खाण्यापूर्वी सर्व कच्ची फळे आणि भाज्या पाण्याखाली स्वच्छ धुवा. बाजारातून आणलेले मांसदेखील व्यवस्थितरीत्या स्वच्छ करा, त्यामुळे ई-कोलायचा संसर्ग टाळला जाऊ शकतो.