आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी एखाद्याला एक कोटी रुपयांचे वार्षिक पगाराचे पॅकेज मिळणेही खूप मोठी गोष्ट आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत उच्च पगाराच्या नोकरीची संकल्पना बदलली आहे. इलेक्ट्रिक कारसाठी सॉलिड-स्टेट रिचार्जेबल लिथियम मेटल बॅटरी विकसित करणाऱ्या अमेरिकन कंपनीचे सह-संस्थापक जगदीप सिंग हे सर्वाधिक पगार घेणारे सह-संस्थापक म्हणून सध्या चर्चेत आले आहेत. त्यांचा दररोजचा पगार ४८ कोटी रुपये असून वार्षिक पगाराचे पॅकेज १७,५०० कोटींपेक्षा जास्त आहे. कोण आहेत जगदीप सिंग? क्वांटमस्केप म्हणजे काय? त्याविषयी जाणून घेऊ या.
क्वांटमस्केपचे सह-संस्थापक जगदीप सिंग हे जगातील सर्वाधिक वेतन घेणारे व्यक्ती आहेत. त्यांच्या पगारात सुमारे २.३ अब्ज डॉलर्स किमतीच्या स्टॉकचादेखील समावेश आहे. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांच्या यशात महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बी.टेक आणि बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीए केले आहे, त्यामुळे त्यांच्यात व्यवसाय आणि तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठीची आवश्यक कौशल्ये रूजली आहेत. जगदीप सिंग यांनी क्वांटमस्केपचे नेतृत्व अशा सॉलिड-स्टेट बॅटरीज विकसित करण्यात केले आहे, ज्या उत्तम ऊर्जा घनता, जलद चार्जिंग आणि सुरक्षा प्रदान करून पारंपरिक लिथियम-आयन बॅटरीपेक्षा जास्त कामगिरी करतात.

हेही वाचा : ‘Sham Marriage’मुळे सरकार चिंतेत; सिंगापूरमध्ये वाढणारा लग्नाचा हा ट्रेंड काय आहे?

Tamil Nadu CM Stalin offers $1 million prize for deciphering Indus Valley script
Indus Valley script: ५००० वर्षे प्राचीन सिंधू लिपीचा अर्थ उलगण्यासाठी १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर; का आहे ही लिपी महत्त्वाची?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक

बिल गेट्स आणि फोक्सवॅगनसारख्या गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याने, कंपनी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा उपायांना पुढे आणण्यासाठी सज्ज आहे. उल्लेखनीय म्हणजे, क्वांटमस्केप कॉर्पोरेशनने २०२४ मध्ये ११९.५७ दशलक्ष डॉलर्सचा तोटा नोंदवला, जो मागील वर्षी याच कालावधीत ११०.६२ दशलक्ष डॉलर्स होता. २०२४ च्या पहिल्या नऊ महिन्यांसाठी, कंपनीचा निव्वळ तोटा ३६३.२ दशलक्ष डॉलर्स इतका वाढला, जो २०२३ मध्ये ३३१.७९ दशलक्ष डॉलर्स होता. हे आकडे परिणाम क्वांटमस्केपची प्रगत बॅटरी तंत्रज्ञान विकसित करण्यात चालू असलेली आव्हाने प्रतिबिंबित करतात.

क्वांटमस्केप म्हणजे काय?

क्वांटमस्केप कॉर्पोरेशन कंपनी मुळात क्वांटमस्केप बॅटरी.इंक या नावाने २०१० मध्ये स्थापन करण्यात आली होती. त्याचे उद्दिष्ट शाश्वत भविष्यासाठी ऊर्जा संचयनात क्रांती घडवून आणण्याचे आहे. २०२० मध्ये कंपनी केन्सिंग्टन कॅपिटल ऍक्विझिशन कॉर्पोरेशनमध्ये विलीनीकरणाद्वारे सार्वजनिक झाली, ज्याचे नाव करार संपल्यानंतर क्वांटमस्केप कॉर्पोरेशन असे करण्यात आले. विलीनीकरणानंतर क्वांटमस्केप बॅटरी.इंक ही नव्याने स्थापन झालेल्या क्वांटमस्केप कॉर्पोरेशनची पूर्ण मालकीची उपकंपनी झाली. क्वांटमस्केपने शून्य-उत्सर्जन वाहतुकीसाठी जलद चार्जिंग, दीर्घकाळ टिकणारी आणि सुरक्षित बॅटरी सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेले बॅटरी तंत्रज्ञान विकसित केले आहे. कंपनीचे नावीन्य म्हणजे पेटंट केलेले सॉलिड सिरेमिक इलेक्ट्रोलाइट सेपरेटर आहे, जे चार्ज आणि डिस्चार्जदरम्यान लिथियम आयनांना हलविण्याची परवानगी देऊन एनोड आणि कॅथोडला स्पर्श करण्यापासून प्रतिबंधित करते.

जगदीप सिंग नक्की कोण आहेत?

२०१० मध्ये जगदीप सिंग यांनी क्वांटमस्केप ही कंपनी स्थापन केली, जी बॅटरी तंत्रज्ञानातील नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करते. सिंग यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने आपले लक्ष इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) सॉलिड-स्टेट बॅटरीज विकसित करण्याकडे वळवले. ही कल्पना ईव्ही मार्केटसाठी गेम चेंजर मानली गेली. सॉलिड-स्टेट बॅटरी पारंपरिक लिथियम-आयन बॅटरींपेक्षा वेगळ्या असतात, कारण त्या द्रव इलेक्ट्रोलाइट्सचा वापर काढून टाकतात. यामुळे सुरक्षित बॅटरी, जलद चार्जिंग आदींमुळे इलेक्ट्रिक वाहनांमधील महत्त्वाच्या समस्यांमध्ये सुधारणा होते, जसे की रेंजची चिंता किंवा जास्त चार्जिंगचा वेळ, त्यामुळे या बॅटरीज इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यासाठी व्यवहार्य आणि कार्यक्षम पर्याय ठरतात.

सिंग यांच्या नेतृत्वामुळे बिल गेट्स आणि फोक्सवॅगनसारख्या उद्योगातील दिग्गजांशी या कंपनीने मोठे करार केले असल्याने ईव्ही आणि स्वच्छ ऊर्जा या दोन्ही क्षेत्रांमध्ये क्वांटमस्केपला एक प्रमुख खेळाडू म्हणून पाहिले जाते. सिंग यांच्या नेतृत्वाचे मूल्य त्यांच्या कमाईतून दिसून येते. क्वांटमस्केपच्या वार्षिक भागधारकांच्या बैठकीत एक बहुअब्ज डॉलर्सचे भरपाई पॅकेज मंजूर करण्यात आले, ज्यामध्ये कथितपणे २.३ अब्ज डॉलर्स किमतीचे स्टॉक पर्याय समाविष्ट होते. सिंग यांच्या पगाराची तुलना केल्यास, त्यांनी ब्रॉडकॉमचे हॉक टॅन (१६१.८ दशलक्ष डॉलर्स) आणि पालो अल्टो नेटवर्क्सचे निकेश अरोरा (१५१.४ दशलक्ष डॉलर्स) यांसारख्या उद्योगातील इतर नेत्यांच्या पगराला मागे टाकले आहे.

हेही वाचा : न्यू ऑर्लीन्समधील हल्लेखोर इस्लामिक स्टेटचा; ‘ISIS’मध्ये कशी केली जाते तरुणांची भरती? या संघटनेचा इतिहास काय?

१६ फेब्रुवारी २०२४ रोजी सिंग यांनी क्वांटमस्केपचे सीईओ पद सोडले आणि शिवा शिवराम यांना जबाबदारी सोपवली. परंतु, सिंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि आता त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार ते ‘स्टेल्थ स्टार्टअप’चे नेतृत्व करत आहेत. सिंग यांचा यशाचा प्रवास त्यांच्या भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमीवर आधारित आहे. त्यांनी मेरीलँड विद्यापीठातून संगणकशास्त्रात पदवी, स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीए केले आहे. एचपी अँड सन मायक्रोसिस्टममधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी विवध स्टार्टअप कंपन्यांमध्ये काम केले. १९९२ मध्ये सुरू झालेली एअरसॉफ्ट ही त्यापैकीच एक कंपनी आहे.

Story img Loader