आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी एखाद्याला एक कोटी रुपयांचे वार्षिक पगाराचे पॅकेज मिळणेही खूप मोठी गोष्ट आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत उच्च पगाराच्या नोकरीची संकल्पना बदलली आहे. इलेक्ट्रिक कारसाठी सॉलिड-स्टेट रिचार्जेबल लिथियम मेटल बॅटरी विकसित करणाऱ्या अमेरिकन कंपनीचे सह-संस्थापक जगदीप सिंग हे सर्वाधिक पगार घेणारे सह-संस्थापक म्हणून सध्या चर्चेत आले आहेत. त्यांचा दररोजचा पगार ४८ कोटी रुपये असून वार्षिक पगाराचे पॅकेज १७,५०० कोटींपेक्षा जास्त आहे. कोण आहेत जगदीप सिंग? क्वांटमस्केप म्हणजे काय? त्याविषयी जाणून घेऊ या.
क्वांटमस्केपचे सह-संस्थापक जगदीप सिंग हे जगातील सर्वाधिक वेतन घेणारे व्यक्ती आहेत. त्यांच्या पगारात सुमारे २.३ अब्ज डॉलर्स किमतीच्या स्टॉकचादेखील समावेश आहे. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांच्या यशात महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बी.टेक आणि बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीए केले आहे, त्यामुळे त्यांच्यात व्यवसाय आणि तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठीची आवश्यक कौशल्ये रूजली आहेत. जगदीप सिंग यांनी क्वांटमस्केपचे नेतृत्व अशा सॉलिड-स्टेट बॅटरीज विकसित करण्यात केले आहे, ज्या उत्तम ऊर्जा घनता, जलद चार्जिंग आणि सुरक्षा प्रदान करून पारंपरिक लिथियम-आयन बॅटरीपेक्षा जास्त कामगिरी करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा