कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २२४ मतदारसंघ असलेल्या विधानसभेच्या १३५ जागा जिंकून मोठा विजय प्राप्त केला. बहुमतासाठी लागणाऱ्या ११३ जागांच्या कितीतरी पुढे जाऊन त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. बहुमत मिळाले असले तरी काँग्रेसपुढे मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम आहे. निकालांबाबत बोलायचे झाल्यास अनेक राजकीय जाणकार काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीच्या महत्त्वाच्या भागाकडे लक्ष वळवतात. अलीकडे झालेल्या काही निवडणुकांत राज्यातील नेत्यांना वाव देण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर लक्ष देत होते. कर्नाटक निवडणुकीत मात्र राज्यातीलच दोन मातब्बर नेत्यांच्या हातात प्रचाराची धुरा देण्यात आली होती. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी निवडणुकीच्या रणनीतीचे शिवधनुष्य पेलले.

प्रचाराची रणनीती आखत असताना आणि प्रचार करताना काँग्रेसने कधीही मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही वाच्यता केली नाही. तसेच प्रचारादरम्यान सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात स्पर्धा आहे, अशी कोणतीही बातमी पुढे येऊ दिली नाही. उलट दोन्ही नेते खांद्याला खांदा लावून निवडणूक लढवत असल्याचे चित्र दाखविले गेले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निकालानंतर बोलत असताना दोन्ही नेत्यांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा विचार होऊ शकतो, असे संकेत दिले. कर्नाटकच्या निकालांमुळे सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे. या निमित्ताने दोन्ही नेत्यांचा राजकीय इतिहास, त्यांचे आतापर्यंतचे कार्य आणि काँग्रेस नेतृत्वासाठी हे दोन्ही नेते महत्त्वाचे का आहेत? याबद्दल घेतलेला हा आढावा.

cm shinde sanjay kelkar najeeb mulla kedar dighe and sandeep pachange filed nominations for maharashtra assembly election
ठाण्यात राजकीय पक्षांचे शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्री शिंदे, संजय केळकर, नजीब मुल्ला, केदार दिघे, संदीप पाचंगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
puja khedkar father dilip khedkar affidevit
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पण प्रतिज्ञापत्रातील ‘या’ नोंदीमुळे अडचणीत येण्याची शक्यता!
maharashtra assembly election result 2024
महाराष्ट्रात खरंच राष्ट्रपती राजवट लागू शकते का? संजय राऊतांच्या दाव्यात किती तथ्य? नियम काय सांगतो?
Nana Patole Sanjay Raut on Mahavikas Aghadi Candidate List 2024
Mahavikas Aghadi: मविआच्या यादीतील काही नावात बदल होणार? संजय राऊतांसह नाना पटोलेंचंही मोठं विधान; म्हणाले, ‘उमेदवारांच्या काही नावात…’
Priyanka Gandhi Vadra FIle Lok Sabha Candidate Nomination from Wayanad
Priyanka Gandhi : आधी राहुल गांधी, आता प्रियांका गांधी; काँग्रेससाठी वायनाड कसा झाला बालेकिल्ला?
Kedar Dighe and Eknath Shinde
Kopari Pachpakhadi : कोपरी-पाचपाखाडीत शिष्य विरुद्ध वारसदार युद्ध; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे रिंगणात!
MPSC Mantra  Administrative System State Services Main Examination career news
MPSC मंत्र : प्रशासकीय व्यवस्था; राज्यसेवा मुख्य परीक्षा – सामान्य अध्ययन पेपर दोन

हे वाचा >> Karnataka results : समाजवाद रुजलेल्या कर्नाटकात हिंदुत्ववाद पेरणे महागात पडले? विधानसभा निकालाने काय साधले?

सिद्धरामय्या कोण आहेत?

म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा हुबळी येथे असलेल्या सिद्धरामना हुंडी या छोट्याशा गावात १९४८ साली सिद्धरामय्या यांचा जन्म झाला. म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सीची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याचा विचार केला. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचे अनुयायी असलेल्या सिद्धरामय्या यांनी १९८३ मध्ये राजकारणात प्रवेश केला. इंदिरा काँग्रेस या पक्षाविरोधात १९७४ साली भारतीय लोक दल पार्टीची स्थापना झाली होती. या पक्षातर्फे १९८३ साली म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली.

सिद्धरामय्या हे कुरुबा या ओबीसी प्रवर्गातील जातीमधून आलेले आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला ओबीसी प्रवर्गातील जाती, मुस्लीम आणि दलितांचा आवाज त्यांनी उचलून धरला. जनता पक्षात फूट पडल्यानंतर एचडी देवेगौडा नेतृत्व करत असलेल्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षात सिद्धरामय्या यांनी प्रवेश केला. २००६ साली काँग्रेस पक्षात प्रवेश करेपर्यंत सिद्धरामय्या जेडीएसमध्ये होते. देवेगौडा यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी जेडीएसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत त्यांनी अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविली होती.

काँग्रेसचे कर्नाटकामधील नेते म्हणून सिद्धरामय्या यांनी आपले स्थान बळकट केले. त्यांच्या नेतृत्वाखाली २०१३ साली काँग्रेसने १२२ जागा मिळवून मोठा विजय संपादन केला होता. या विजयामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. २०१८ सालीदेखील काँग्रेसने ७४ जागा जिंकल्या होत्या. मात्र बहुमत गाठता न आल्यामुळे जेडीएससोबत आघाडी करून सरकार स्थापन केले गेले. भाजपाने २०१९ साली काँग्रेसचे आमदार फोडले आणि सत्ता काबीज केली. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून साडेतीन वर्षे काम पाहिले.

हे वाचा >> कर्नाटकच्या विजयामुळे इतर राज्यात जिंकण्याच्या काँग्रेसच्या आशा पल्लवित; विरोधकांमध्ये काँग्रेसची पत वाढेल?

लोकनेता असलेले सिद्धरामय्या कर्नाटकातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत लोकप्रिय आहेत. मात्र आठ वेळा आमदार राहिलेल्या सिद्धरामय्यांना या निवडणुकीत मतदारसंघ मिळणे कठीण होऊन बसले होते. कुरुबा, वोक्कलिग, आदिवासी वाल्मीकी आणि दलित यांच्या रस्सीखेचीत सिद्धरामय्या यांना हवा तसा मतदारसंघ मिळत नव्हता. अखेर त्यांनी वरुणा हा सर्वात सुरक्षित असलेला मतदारसंघ निवडला. वरुणामधून सिद्धरामय्या यांनी यंदाच्या निवडणुकीत ६० टक्के मते घेतली. त्यांच्या मतांची संख्या १ लाख १९ हजार ८१६ एवढी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाच्या व्ही. सोमन्ना यांना ७३ हजार ६५३ मते मिळाली. मोठ्या फरकाने सिद्धरामय्या यांचा विजय झाला.

डीके शिवकुमार कोण आहेत?

६० वर्षीय डीके शिवकुमार हे कर्नाटकातील वोक्कलिग या जात समुदायातून येतात. विशेषतः दक्षिण कर्नाटकात त्यांचे प्राबल्य आहेत. तसेच राज्याच्या लोकसंख्येत त्यांची संख्या १५ टक्के एवढी आहे. तरुण वयात असल्यापासून शिवकुमार काँग्रेस पक्षात आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेत काम केले. तेव्हापासून राजकीय जीवनात सक्रिय झालेल्या शिवकुमार यांनी आजवर सात वेळा विधानसभेवर निवडून येण्याची किमया साधली आहे. २७ व्या वर्षीच त्यांनी सथानुर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. २०१८ च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना ६१८ कोटींची संपत्ती जाहीर केल्यामुळे शिवकुमार चांगलेच चर्चेत आले होते.

२०१३ साली सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात शिवकुमार यांनी ऊर्जा विभागाचा कार्यभार सांभाळला. तसेच २०१८ साली जेडीएस-काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे सिंचन विभागाची जबाबदारी होती. मुख्यमंत्रीपद मिळवण्याची आपली महत्त्वाकांक्षा शिवकुमार यांनी कधीही लपवून ठेवली नाही. २०१९ साली काँग्रेसच्या आमदारांना भाजपात जाण्यापासून रोखण्यात शिवकुमार अपयशी ठरले होते. त्यानंतर मात्र त्यांनी २०२३ च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष संघटना बांधणीमध्ये महत्त्वाची जबाबदारी उचलली.

शिवकुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झालेले आहेत. आठ कोटींच्या हवाला प्रकरणी ईडीने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. तसेच बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू होती. २०१७ मध्ये शिवकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर ३०० कोटींचा कर बुडविल्याचा आरोप दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये शिवकुमार यांच्यावर ३४ कोटींचा कर बुडवल्याचा आरोप होता.

ऑगस्ट २०१७ मध्ये प्राप्तिकर विभागाने ७० ठिकाणी छापे मारून जमा केलेल्या माहितीच्या आधारावर ऑक्टोबर २०२० मध्ये सीबीआने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. एप्रिल २०१३ ते एप्रिल २०१८ या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात शिवकुमार यांनी ७४.९३ कोटींची मालमत्ता चुकीच्या पद्धतीने गोळा केली, असा आरोप सीबीआयने त्यांच्यावर ठेवला होता. या काळात शिवकुमार ऊर्जामंत्री होते.

आणखी वाचा >> Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांचे ‘सहा’ कळीचे मुद्दे

सप्टेंबर २०१९ मध्ये हवालाप्रकरणी ईडीने शिवकुमार यांना अटक केली. एक महिन्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले. २०२० साली त्यांच्यावर कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. दि. १३ मे रोजी जेव्हा दुपारी मतमोजणीचा निकाल स्पष्ट होऊन काँग्रेस बहुमताने जिंकणार हे दिसू लागले, तेव्हा माध्यमांशी बोलत असताना शिवकुमार यांना भावना अनावर झाल्या होत्या. भाजपाचे लोक मला तुरुंगात टाकण्याचा आटापिटा करत असताना सोनिया गांधी यांनी माझी तुरुंगात येऊन भेट घेतली होती. ही घटना मी कधीही विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने काही दिवसांपूर्वी दिलेल्या बातमीनुसार, शिवकुमार हे सिद्धारामय्या यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचे विरोधक तर आहेतच. शिवाय जातीय राजकारण आणि प्रशासनाच्या दृष्टीने ते एक चाणाक्ष राजकारणी आहेत. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिवकुमार यांनी आखलेली रणनीती, राष्ट्रीय नेतृत्वाकडून मिळालेली मदत यांच्या आधारावर शिवकुमार यांनी काँग्रेस पक्षाला चांगला विजय मिळवून दिला.

काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता दोन्ही नेत्यांना लागलेली आहे.