इन्स्टाग्राम समाजमाध्यम आणि व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय असून ते वापरणाऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र ही दोन्ही माध्यमं वापरण्यास सातत्याने अडचणी येत आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपनंतर इन्स्टाग्रामही काही काळासाठी बंद पडले होते. दरम्यान, सर्वाधिक लोकप्रिय असलेली ही माध्यमं पुन्हा-पुन्हा बंद का पडत आहेत. त्यामागे कारण काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विश्लेषण : पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व कसे दिले जाते?

व्हॉट्सअ‍ॅप बंद पडल्याची घटना ताजी असतानाच ३१ ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांची खाती निलंबित झाल्याचे मेसेज आले होते. काही वापरकर्त्यांनी तर इन्स्टाग्राम अॅप क्रॅश होत असल्याचीही तक्रार केली होती. इन्स्टाग्राम वेबवरही अशीच समस्या येत होती. इन्स्टाग्राम खाते बंद पडल्यामुळे अनेक वापरकर्त्यांचे फॉलोवर्स कमी झाले. खुद्द इन्स्टाग्रमाच्या खात्याचेदेखील साधारण १० लाख फॉलोवर्स कमी झाले. देशभरातून तक्रारी आल्यानंतर इन्स्टाग्रामनेही ट्विटरच्या माध्यमातून याला दुजोरा दिला. ‘इन्स्टाग्रामच्या सेवांमध्ये अडथळा निर्माण झाला असून ही अडचण जगभरातील वापरकर्त्यांना जाणवत आहे,’ असे इन्स्टाग्रामने सांगितले होते. तसेच आम्ही सर्व सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्विट इन्स्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी यांनी केले होते. त्यानंतर साधारण ८ तासांनंतर इन्स्टाग्राम पुन्हा एकदा सुरळीत झाले.

हेही वाचा >>> विश्लेषण : ५ जी लॉंन्च झाले मात्र अद्याप सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचली नाही, कारण काय?

इन्स्टाग्राम बंद पडण्यामागे कारण काय?

३१ ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामकडून अपडेटेड व्हर्जन देण्यात येणार होते. मात्र यावेळी इन्स्टाग्रमाच्या यंत्रणेत अनपेक्षित समस्या (मेजर बग) निर्माण झाली. याच कारणामुळे जगभरातील इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना अडचणी येत होत्या. जेव्हा एखादे सॉफ्टवेअर किंवा यंत्रणा अपडेट करायची असते तेव्हा अशा समस्या येणे स्वाभाविक असते. जगभरात जेव्हा एखादी यंत्रणा अपडेट होत असते तेव्हा या संभाव्य समस्यांवर आधीच तोडगा काढला जातो. मात्र इन्स्टाग्रामच्या बाबतीत तसे झाले नाही. परिणामी इन्स्टाग्राम वापरताना अनेकांना अडचणी आल्या. याच वर्षी सप्टेंबर महिन्यातही इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना अशीच अडचण आली होती.

हेही वाचा >>> विश्लेषण : एलॉन मस्क यांनी खरेदी केल्यानंतर ट्विटर आता खासगी कंपनी, नेमके काय बदल होणार?

व्हॉट्सअ‍ॅप बंद का पडले होते?

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपदेखील काही काळासाठी बंद पडले होते. व्हॉट्सअ‍ॅपकडून यामागचे नेमके कारण अद्याप सांगण्यात आलेले नाही. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या डोमेन नेम सिस्टीममध्ये (DNS) बिघाड झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती, असे सांगण्यात येत आहे.

मेटा कंपनीच्या सेवा नेहमी बंद होण्यामागचे कारण काय?

हेही वाचा >>> विश्लेषण : दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी, १४० लोकांचा मृत्यू; पण गर्दी प्राणघातक कशी ठरू शकते?

इन्स्टाग्राम समाजमाध्यम आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंक अॅप मेटा या कंपनीच्या मालकीचे आहे. ही माध्यमं बंद पडण्याच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडलेल्या आहेत. मेटा कंपनीकडून जगातील सर्वात लोकप्रिय अ‍ॅप्स चालवले जातात. हे अ‍ॅप्स वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. याच कारणामुळे मेटाच्या प्रणालीवर ताण ती बंद करतात. जेव्हा या माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होते तेव्हाच त्या बंद पडतात. ही अडचण आगामी काळात येऊ नये यासाठी मेटा कंपनीला आणखी बँडविड्थ विकत घ्याव्या लागतील. मात्र बँडविड्थ विकत घेतल्यानंतरही या समस्या येणार नाहीत, याची शास्वती नाही. फेसबूक, इन्स्टाग्राम तसेच व्हॉट्सअ‍ॅपने सुरळीत काम करावे म्हणून देखभालीसाठी मेटा या कंपनीने इतर अनेक कंपन्यांशी करार केलेले आहेत. यामुळेदेखील मेटा कंपनीच्या मालकीची ही समाजमाध्यमं अनेकवेळा बंद पडतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta company instagram and whatsapp outage now cause in detail prd