फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यम ॲप्सची मालकी असलेल्या ‘मेटा’ या कंपनीने आता ‘थ्रेड्स’ नावाचे नवे ॲप बाजारात आणले आहे. या ॲपची रचना काही प्रमाणात ट्विटर या समाजमाध्यमाप्रमाणेच आहे. याच कराणामुळे भविष्यत हे ॲप थेट ट्विटरशी स्पर्धा करणार आहे. मेटा कंपनीच्या थ्रेड्स ॲपला प्रतिसादही चांगला मिळतोय. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या २४ तासांत हे ॲप साधारण ३० दशलक्ष वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. दरम्यान, मेटा कंपनीने लॉन्च केलेले हे ॲप ट्विटरची प्रतिकृती असल्याचा दावा केला जात आहे. मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग हे ‘कॉपीकॅट’ (नक्कल करणारे) आहेत, असे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मेटा कंपनीने अन्य समाजमाध्यमांप्रमाणेच सुविधा दिलेल्या आहेत. याचा अन्य समाजमाध्यमांवर काय परिणाम पडला? हे जाणून घेऊ या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ट्विटरने पाठवली मेटाला नोटीस
मेटा कंपनीने नव्याने लॉन्च केलेल्या थ्रेड्स या ॲपला लोकांची चांगली पसंदी मिळत आहे. मात्र ट्विटरने मेटाच्या या ॲपवर आक्षेप घेतला आहे. एलॉन मस्क यांच्या वकिलाने मेटाचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांना एक नोटीस पाठवली आहे. या नोटिशीमध्ये ट्विटरमध्ये काम करणाऱ्या लोकांना हाताशी धरून झुकरबर्ग यांनी ट्विटरच्या व्यापाराची संकल्पना वापरली आहे. तसेट मेटाने ट्विटरच्या बौद्धिक संपदेचा वापर केला आहे, असा दावा करण्यात आला आहे.
झुकरबर्ग फक्त कॉपी करतात?
झुकरबर्ग यांच्यावर ‘कॉपी’ केल्याचा आरोप पहिल्यांदाच करण्यात आलेला नाही. या आधीही अनेकवेळा झुकरबर्ग यांनी वेगवेगळ्या समाजमाध्यमांच्या संकल्पनांना समोर ठेवून इन्स्टाग्राम, फेसबूक, व्हॉट्सॲप या ॲप्समध्ये बदल केल्याचा दावा केला जातो. झुकरबर्ग यांनी नव्याने लॉन्च केल्याल्या थ्रेड्स या ॲपमध्ये ट्विटरप्रमाणेच सुविधा असल्याचे नेटिझन्स म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने तर थ्रेड्स हे ॲप तयार करण्यासाठी कॉम्प्यूटरच्या कीबोर्डवरील Ctrl+C+V या बटणांचा वापर करण्यात आलेला आहे, असे उपहासात्मक पद्धतीने म्हटले आहे. म्हणजेच काही नेटकऱ्यांना थ्रेड्स हे ॲप ट्विटरप्रमाणेच आहे, असे वाटत आहे.
झुकरबर्ग यांचा नफा मिळवण्यासाठी खटाटोप?
झुकरबर्ग यांच्यावर केल्या जाणाऱ्या ‘कॉपीकॅट’ या आरोपावर वेडबूश सिक्युरिटीजचे ॲनालिस्ट (विश्लेषक) डॅन इव्हस यांनी ‘सीएनबीसी’ला प्रतिक्रिया दिली आहे. “थ्रेड्स या ॲपच्या मदतीने कसलीही नवी निर्मिती करण्यात आलेली नाही. इन्स्टाग्रामवर असलेल्या युजर्सचा तसेच एलॉन मस्क आणि ट्विटरविषयी लोकांचा रोष, नकारात्मक भावना याचा आधार घेऊन ते नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा झुकरबर्ग आणि फेसबूकचा खरा स्वभाव आहे. अगोदरपासून समाजमाध्यमांमध्ये असलेल्या संकल्पनांचा आधार घेऊन ते अधिक कमाई करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे डॅन इव्हस म्हणाले.
ट्विटर ब्लूप्रमाणेच मेटा व्हेरिफाईट
सध्या थ्रेड्स या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी झुकरबर्ग यांनी याआधी इतर ॲप्सला समोर ठेवून फेसबुक, इन्स्टाग्राम या ॲप्समध्ये अनेक बदल केलेले आहेत. यातील काही प्रयोग यशस्वी झाले, तर काही प्रयोग बंद करावे लागले. ‘मेटा व्हेरिफाईड’ संकल्पना हिदेखील यापैकीच एक आहे. सध्या ट्विटर ‘ट्विटर ब्लू’च्या माध्यमातून वापरकर्त्यांना ब्लू टीक तसेच अन्य सुविधा पुरवल्या जातात. या सुविधांसाठी काही पैसे मोजावे लागतात. मेटा कंपनीनेही ‘मेटा व्हेरिफाईड’ नावाची नवी संकल्पना आणली आहे. याच वर्षाच्या मार्च महिन्यात झुकरबर्ग यांनी तशी घोषणा केली होती. मेटा व्हेरिफाईडच्या माध्यमातून फेसबूक, इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना ब्लू टीक तसेच अन्य सुविधा देण्यात येतात. सध्या अशा प्रकारचे सबस्क्रीप्शन घेण्यासाठी अमेरिकेत ११.९९ डॉलर (९९१ रुपये) वेब व्हर्जन तर १४.९९ डॉलर (१२४० रुपये) मोबाईल व्हर्जनसाठी मोजावे लागतात. ट्विटरकडूनदेखील वापरकर्त्यांकडून पैसे घेऊन अशाच प्रकारे सुविधा दिली जाते.
ट्विटर ‘ट्विटर ब्लू’ या सुविधेसाठी ८ डॉलर्स म्हणजेच ६६१ रुपये प्रतिमहिना आकारतो. या सबस्क्रिप्शनच्य माध्यमातून वापरकर्त्यांना ट्वीट करताना शब्दमर्यादा वाढवून मिळते. तसेच अशा वापरकर्त्यांना जाहिराती कमी दाखवल्या जातात. विशेष म्हणजे अशा वापरकर्त्यांना ६० मिनिटांपर्यंतचे व्हिडीओ पोस्ट करता येतात. ट्विटरने ही सुविधा जाहीर केल्यानंतर मेटा कंपनीदेखील मेटा व्हेरिफाईडच्या नावाखाली फेसबूक, इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांकडून पैसे घेत आहे.
मेटाचे लासो ॲप
भारतात टिकटॉक या ॲपवर बंदी आहे. मात्र जगभरात हे ॲप फार लोकप्रिय आहे. या ॲपची लोकप्रियता पाहून मार्क झुकरबर्ग यांनीदेखील लासो नावाचे असेच एक ॲप आणण्याचा निर्णय घेतला होता. २०१८ साली हे ॲप लॉन्च करण्यात आले होते. या ॲपच्या माध्यमातून लोकप्रिय गाण्यांवरचा १५ सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर करता येत होता. यामध्ये ट्रेंडिग असलेल्या गाण्यावर व्हिडीओ करून तो शेअर करता येत होता. या ॲपमध्ये हॅशटॅगच्या माध्यमातून ट्रेंडिंग गाणेदेखील शोधता येत होते. सुरुवातील लासो हे ॲप कोलंबिया, मेक्सिको, अमेरिका, अर्जेंटिना, चिली, पेरू, पनामा, कोस्टा रिका, एल साल्वाडोर, इक्वाडोर आणि उरुग्वे या देशांत लॉन्च करण्यात आले होते. २०२० सालाच्या सुरुवातीला या ॲपमध्ये हिंदी गाण्यांवरही कन्टेंट तयार करण्याचे फिचर उपलब्ध करून देण्यात आले होते. त्या काळात फेसबुक लवकरच भारतात आणखी काहीती नवी घोषणा करणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र हे लोकांच्या पसंदीस उतरले नाही. परिणामी झुकरबर्ग यांनी १० जुलै २०२० रोजी ते बंद करण्याचा निर्णय घेतला.
इन्स्टाग्रामध्ये रिल्सचा समावेश
टिकटॉकशी स्पर्धा करण्यासाठी झुकरबर्ग यांनी लासो हे ॲप बाजारात आणले होते. मात्र लोकांनी त्याला नाकारले. त्यामुळे आगामी काळात झुकरबर्ग यांनी इन्स्टाग्रामध्येच काही बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मेटा कंपनीने २०२० साली इन्स्टाग्राममध्ये रिल्स नावाचे नवे फीचर आणले. या फीचरच्या माध्यमातून वापरकर्त्यांना शॉर्ट व्हिडीओ तयार करण्याची मुभा देण्यात आली. हे फीचर टिकटॉकप्रमाणेच होते. झुकरबर्ग यांचा हा प्रयोग पुढे यशस्वी झाला. यामुळे इन्स्टाग्रामसह फेसबुकचे वापरकर्तेदेखील वाढले. चालू वर्षांत म्हणजेच २०२३ सालात इन्स्टाग्रामवर रील्स पाहण्याचे प्रमाण १३.०८ टक्के आहे. टिकटॉकचे हेच प्रमाण ९.०८ टक्के आहे.
इन्स्टाग्रामर स्टोरी अपलोड करण्याचे फीचर
मार्क झुकरबर्ग यांनी ‘इन्स्टाग्रम स्टोरी’ हे फीचरदेखील दुसऱ्यांकडूनच प्रेरणा घेऊन लॉन्च केले होते, असे म्हटले जाते. याआधी अशा प्रकारचे फीचर हे स्नॅपचॅट या ॲपमध्ये होते. मार्क झुकरबर्ग यांनी स्नॅपचॅट हे ॲप खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न यशस्वी न झाल्यामुळे त्यांनी २०१६ साली थेट स्नॅपचॅटला आव्हान म्हणून इन्स्टाग्राम ॲपमध्येही स्टोरीचे फीचर लॉन्च केले. हे फीचर लॉन्च केल्यानंतर लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा फटका स्नॅपचॅटला बसला. तुलना करायची झाल्यास २०१८ सालाच्या मध्यापर्यंत स्नॅपचॅटला जेवढे लोक रोज वापरायचे त्यापेक्षा दुप्पट लोक इन्स्टाग्रामवर स्टोरीज अपलोड करत होते.
व्हॉट्सॲपवर मेसेज एडीट करण्याचा पर्याय
तुम्ही व्हॉट्सॲपवर अनेकदा एखाद्या व्यक्तीला चुकीचा मेसेज पाठवला असेल. किंवा पाठवलेल्या मेसेजमध्ये काही चुका राहिलेल्या असतील. अगोदर अशी चूक दुरुस्त करण्याचा व्हॉट्सॲपवर कोणताही पर्याय नव्हता. यावर्षाच्या मे महिन्यात मात्र मेटा कंपनीने व्हॉट्सॲपवरील मेसेज १५ मिनिटांच्या आत दुरुस्त करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. “एखादा शब्द चुकला असेल तर तो दुरुस्त करण्यासाठी तसेच तुमचा संवाद प्रभावी होण्यासाठी आम्ही हे फीचर लॉन्च करत आहोत,” असे तेव्हा मेटाने म्हटले होते. दरम्यान, टेलिग्राम, सिग्नल अशा ॲप्समध्ये अशा प्रकारचे फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे. ट्विटरनेदेखील आपल्या ट्विटर ब्लू सदस्यांना ३० मिनिटांच्या आत मेसेजमध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय याआधीच दिलेला आहे.
होबी ॲपचा फसलेला प्रयोग
फेसबूकने Pinterest या ॲपशी स्पर्धा करण्यासाठी होबी नावाचे ॲप लॉन्च केले होते. मात्र लोक या ॲपकडे आकर्षित झाले नाहीत. या ॲपला फक्त ७ हजार लोकांनी डाऊनलोड केल होते. ॲपटॉपपियानेही हे ॲप १० हजारपेक्षा कमी लोकांनी डाऊनलोड केल्याचे सांगितले होते.
फेसबुकवरील हॅशटॅगचे फीचर
ट्विटरवर काही शोधायचे असल्यास आपण हॅशटॅगची मदत घेतो. या हॅशटॅगचा ट्रेंडिंग मुद्दा शोधण्यासाठी बराच उपयोग होतो. किंवा व्यक्त होणे सोपे होते. हीच बाब लक्षात घेता मागे राहण्याच्या भीताने फेसबुकनेही २०१३ साली हॅशटॅगचे फीचर लॉन्च केले होते. लोकांचा संवाद आणखी सुलभ व्हावा. जगात संवाद आणखी वाढावा यासाठी आम्ही ही सुविधा देत आहोत, असे तेव्हा फेसबुकने सांगितले होते. ट्विटरवर हॅशटॅगचा वापर ज्या कामासाठी होत होता, त्याच कामासाठी फेसबुकनेही हॅशटॅग ही संकल्पना लॉन्च केली होती.
दरम्यान, आता मेटा कंपनीने थ्रेड्स हे नवे समाजमाध्यम बाजारात आणल्यामुळे लोकांचा हा प्रतिसाद कायम राहणार का? हे नवे ॲप ट्विटरला पर्याय ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.