शुक्रवारी (१९ जुलै) मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवेतील मोठ्या आउटेजमुळे जगभरातील एअरलाइन्स आणि वित्तीय सेवांपासून ते मीडिया ग्रुप्स आणि आरोग्यसेवेपर्यंत सर्वांनाच मोठा फटका बसला. जगभरातील अनेक व्यवहार ठप्प झाले. या संदर्भात नेमके काय घ़डले? आणि पुढे काय आदी प्रश्नांचा हा आढावा.

जगाचे व्यवहार ठप्प…

गुरुवारी रात्रीपासूनच अमेरिकेतील Azure service आणि त्यांच्या Microsoft 365 Suite च्या ॲप्समध्ये समस्या येण्यास सुरुवात झाली होती. समस्या प्रामुख्याने या सेवा कनेक्ट करण्यात किंवा सेवा उपलब्ध होण्यात येत होत्या. जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी शुक्रवारी सकाळी संगणकावर लॉग इन करू शकले नाहीत. त्यांना त्यांच्या विंडोज मशीनवर “ब्लू स्क्रीन एरर” दिसून लागली. त्या ब्लू स्क्रीनवर ‘तुमच्या संगणकामध्ये समस्या आली आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. आम्ही फक्त काही त्रुटींची माहिती गोळा करत आहोत आणि त्यानंतर आम्ही तुमच्यासाठी संगणक रीस्टार्ट करू’ असा संदेश आला.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Digital Arrest is biggest crisis of future and police department and banks should show seriousness now
‘डिजीटल अरेस्ट’ हे भविष्यातील सर्वात मोठे संकट
Central Electronics Limited Recruitment 2024: Application Begins For Junior Technical Assistant And Technician Posts, Check Details
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती, मिळणार ७५ हजारपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
MuleHunter.AI rbi
आता सायबर फ्रॉडचा धोका टळणार; काय आहे ‘आरबीआय’चे ‘MuleHunter.AI’? ते कसे कार्य करणार?
Eight startups selected for National Quantum Mission and National Mission on Interdisciplinary Cyber ​​Physical Systems Pune news
क्वांटम तंत्रज्ञानासाठी नवउद्यमींना केंद्र सरकारचे बळ; देशातील आठ स्टार्टअप्समध्ये राज्यातील दोन स्टार्टअप्स
Development of e office system started in Collectorate to make administrative work dynamic and paperless
सरकारी काम? फक्त एक क्लिक थांब!… फायलींचा प्रवास होणार सोपा

आउटेजचा सर्वात जास्त परिणाम विमान उद्योगावर झाला. ज्यामध्ये युरोप पासून आशिया आणि अमेरिकेपर्यंतच्या विमान कंपन्या आणि विमानतळांना या बिघाडाचा मोठा फटका बसला आणि त्यांचे व्यवहार ठप्प झाले. अनेक देशांमध्ये उड्डाणे बंद करण्यात आली. भारतात इंडिगो, अक्सा एअर, एअर इंडिया, एक्सप्रेस आणि स्पाईस जेट सारख्या विमान कंपन्यांनी घोषणा केली की, तिकीट बुकिंग आणि वेब चेक-इन यासारख्या सेवांवर परिणाम करणाऱ्या तांत्रिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे.

उदाहरणार्थ, अक्सा एअरने जाहीर केले की, त्यांची ऑनलाइन सेवा तात्पुरती बंद केली आहे. “सध्या आम्ही विमानतळांवर मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रियेचे अनुसरण करत आहोत आणि त्यामुळे आमच्या काउंटरवर चेक-इन करण्यासाठी तत्काळ प्रवास योजना असलेल्या प्रवाशांना लवकर विमानतळावर पोहोचण्याची विनंती करतो,” असे त्यांनी X वर पोस्ट केले आहे.

याशिवाय अनेक बँक सर्व्हर, तसेच विंडोज सिस्टिमवर कार्यरत असलेल्या इतर व्यवसायांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे, लंडन स्टॉक एक्सचेंजलाही आउटेजचा फटका बसला आहे. एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, एक्सचेंजसह इतर प्रणाली सामान्यपणे चालू असल्या तरी समस्येची चौकशी केली जात आहे.

आउटेज कशामुळे?

मायक्रोसॉफ्टने जाहीर केले आहे की, आउटेजमागील कारण शोधून काढण्यात आले आहे आणि जगात अनेक ठिकाणी सेवा पूर्ववत झाल्या आहेत. परंतु, अनेक ग्राहकांना अद्यापही विविध मायक्रोसॉफ्ट ३६५ सेवांमध्ये समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्यात ‘टीम्स’चा समावेश आहे, ही सेवा अद्यापही बंद आहे. मायक्रोसॉफ्टने जाहीर केल्याप्रमाणे अनेक वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट ॲप्समध्ये समस्या येण्यामागे कॉन्फिगरेशनमधील बदल हे महत्त्वाचे कारण होते. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटस पेजनुसार त्यांच्या Azure बॅकएंड वर्कलोडच्या एका भागात हा कॉन्फिगरेशन बदल करण्यात आला. त्याचा फटका स्टोरेज आणि गणन सेवांना बसला. यामुळे Microsoft 365 ॲप्समधील अनेक ॲप्स वापरता येईनाशी झाली. क्राउडस्ट्राइक या कंपनीच्या सॉफ्टवेअर अपडेट मधील त्रुटींमुळे विंडोजला फटका बसला आणि जगभरच्या पीसींवर निळा स्क्रीन दिसू लागला असे सांगण्यात येत आहे. द सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या बातमीनुसार, “यूएस-स्थित सायबर सुरक्षा प्रदाता क्राउडस्ट्राइकने वापरलेल्या “फाल्कन सेन्सर” मधील त्रुटींमुळे या आउटेजचा सामना करावा लागला. सुरक्षा डेटा गोळा करण्यासाठी अनेक व्यावसायिक संगणकांवर हा सेन्सर इन्स्टॉल करण्यात आला आहे. या मुळे जगभरातील मायक्रोसॉफ्ट प्रणालींवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. “क्राउडस्ट्राइकला फाल्कन सेन्सरशी संबंधित विंडोज होस्टवरील क्रॅशच्या अहवालांची माहिती आहे,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

आता पुढे काय?

आउटेजनंतर, मायक्रोसॉफ्टने जाहीर केले की, प्रभावित सेवा पर्यायी सिस्टीममध्ये देण्याचे काम सुरू आहे. मायक्रोसॉफ्टने आता ‘X’ वरील मायक्रोसॉफ्ट 365 स्टेटस हँडलवर असे म्हटले आहे की, या पुनर्निर्देशनामुळे सेवा उपलब्धतेमध्ये सकारात्मक कल दिसून येत आहे.

सेवा हळूहळू पूर्ववत होत आहेत. आउटेजच्या काही तासांनंतर, अमेरिकेतील फ्रंटियर एअरलाइन्सने सांगितले की, त्यांच्या सेवा हळूहळू पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे आता गोंधळ निस्तरण्याच्या दिशेेने प्रवास सुरू झाला आहे.

Story img Loader