भारतात नोकरी, व्यवसाय किंवा इतर कौटुंबीक कारणांमुळे अनेक नागरिक एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा परराज्यात स्थलांतर करतात. २०११ च्या जनगणनेनुसार, देशात जवळपास ४५.३६ कोटी नागरिक स्थलांतरित म्हणून दुसऱ्या शहरात वास्तव्य करतात. त्यामुळे मतदानाच्या काळात त्यांना अनेकदा मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यांना मतदान करण्यासाठी आपल्या मूळ राज्यात परत जावं लागतं. हीच बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं एक मोठा निर्णय घेतला आहे. स्थलांतरित नागरिकांना दुसऱ्या राज्यातूनही आपल्या मूळ गावी मतदान करता यावं, यासाठी नवीन यंत्रणा विकसित केली आहे.

निवडणूक आयोगानं ‘मल्टी कॉन्स्टिट्युअन्सी रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (RVM) सादर केलं आहे. या मतदान यंत्राच्या माध्यमातून एकाच मतदान केंद्रावरून अनेक मतदारसंघांना मतदान केलं जाऊ शकणार आहे. यामुळे स्थलांतरित नागरिकांना मतदान करण्यासाठी आपल्या मूळ गावी जाण्याची गरज नाही. ते ज्याठिकाणी राहतात, तिथूनच ते आपल्या मतदारसंघासाठी मतदान करू शकतात.

election decision officer car fire, Disabled independent candidate,
दिव्यांग अपक्ष उमेदवाराने ‘या’ कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटवून दिली
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
vidhan sabha election 2024
उमेदवारांच्या पारंपरिक प्रचारामुळे प्रिंटिंग व्यवसाय तेजीत
Kolhapur, assembly election Kolhapur, Diwali Kolhapur,
दिवाळी सणामुळे विधानसभा निवडणूक प्रचाराला खंड
census 2021
अन्वयार्थ : जनगणनेला मुहूर्त मिळणार?
smart maps
कुतूहल: स्मार्ट नकाशे
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
admit card for TET exam available for candidates on website
‘टीईटी’चे प्रवेशपत्र उपलब्ध; कधीपर्यंत डाऊनलोड करता येणार?

RVM आणण्यामागील निवडणूक आयोगाचा हेतू

खरं तर, देशातील नोंदणीकृत मतदार प्रत्यक्षात मतदान करत नाही, अशी एक ओरड आहे. असे मतदार मतदान न करण्यामागे विविध कारणं सांगितली जातात. पण भारताच्या संदर्भात देशांतर्गत स्थलांतर हे मतदान न करण्यामागील एक महत्त्वाचं कारण आहे. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे ४५.३६ कोटी देशांतर्गत स्थलांतरित नागरिक आहेत. ही संख्या आता आणखी वाढलेली असेल. हा आकडा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अंदाजे ३७ टक्के इतका आहे. विवाह, नैसर्गिक आपत्ती, रोजगार आणि इतर काही घटक ही स्थलांतराची प्रमुख कारणं आहेत.

हेही वाचा- विश्लेषण : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण नेमकं काय आहे? कर्नल पुरोहितचे कनेक्शन काय?

अशा स्थलांतरित नागरिकांना मतदान करण्याची इच्छा असूनही ते निवडणुकीच्या दिवशी मूळ गावी उपस्थित नसल्याने ते मतदान करू शकत नाहीत. अशा नागरिकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवडणूक आयोगानं RVM आणण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थलांतरितांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी RVM चा पर्याय

निवडणूक आयोगाने देशांतर्गत होणाऱ्या स्थलांतरितांच्या मतदानासाठी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने स्थलांतरित नागरिकांच्या मतदानासाठी इंटरनेट मतदान, प्रॉक्सी मतदान आणि पोस्टल बॅलोटसह विविध संभाव्य पर्यायांवर अभ्यास केला. २०१६ मध्ये याबाबतचा एक अहवाल सादर करण्यात आला. पण ही संकल्पना विविध कारणं देऊन नाकारण्यात आली.

हेही वाचा- विश्लेषण: आंग सान सू ची यांना म्यानमार न्यायालयाकडून ३३ वर्षांची शिक्षा, नेमके आरोप काय? कोणत्या प्रकरणात किती शिक्षा?

त्यानंतर, दुहेरी मतदान रोखण्यासाठी विश्वसनीय मतदार यादी आणि ‘आयडेन्टीफिकेशन मेकॅनिझम’वर आधारित गुप्त पद्धतीने मतदान करता यावं यासाठी तांत्रिक पर्याय सूचवण्यात आला. यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या कंपन्यांनी RVM मशीन विकसित केली. RVM ही सध्या वापरात असलेल्या ईव्हीएम प्रणालीवर आधारित मतदान यंत्र आहे.

RVM नेमकं कार्य कसं करतं?

RVM हे सध्या मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM प्रमाणेच असेल. यासाठी नेटवर्कची आवश्यकता नाही. मतदारांना गुप्तपद्धतीने मतदान करता येतं. या मतदान यंत्राद्वारे दूरवरच्या कुठल्याही भागात मतदान प्रक्रिया राबवली जाऊ शकते.