प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या एखाद्या जीवाणूमुळे प्लेगसारखी परिस्थिती तयार झाली आणि माणूस स्वतःचा बचाव करण्यास असमर्थ ठरू लागला तर? हा कथेचा विषय नाही, शास्त्रज्ञांनी अशाच धोक्याची भीती वर्तवली आहे. दोन नोबेल पारितोषिक विजेत्यांसह आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका टीमने अलीकडील अहवालात उपस्थित केलेली ही खरी चिंता आहे. “आम्ही ज्या धोक्याबद्दल बोलत आहोत तो असामान्य आहे,” असे पिट्सबर्ग विद्यापीठातील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ प्राध्यापक वॉन कूपर यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले. “मिरर बॅक्टेरिया बहुधा मानवी, प्राणी आणि वनस्पतींच्या रोगप्रतिकारक प्रणालीच्या प्रतिसादांना टाळू शकतात आणि प्राणघातक संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात,” असेही ते म्हणाले. हे मिरर बॅक्टेरिया नेमके काय आहेत आणि ते वैज्ञानिकांमध्ये चर्चेचा मुद्दा का ठरत आहेत? खरंच प्रयोगशाळेतील या जीवाणूमुळे धोका उद्भवू शकतो का? त्याविषयी जाणून घेऊ.
मिरर बॅक्टेरिया म्हणजे काय?
जीवन डीएनए, प्रथिने आणि कर्बोदक (कार्बोहायड्रेट्स) या जैव रेणूंपासून तयार झाले आहे, याची कल्पना सर्वांना आहे. हा एक अद्वितीय संरचनात्मक गुणधर्म आहे; ज्याला संरचनात्मक विषमता किंवा चिरालिटी म्हणून ओळखले जाते. मानवी हातांप्रमाणेच हे रेणू डाव्या आणि उजव्या हाताच्या आवृत्त्यांमध्ये येतात, जे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा असतात. उदाहरणार्थ, डीएनए आणि आरएनए हे उजव्या हाताच्या रेणूंनी तयार झाले आहेत, तर प्रथिने डाव्या हाताच्या ‘अमिनो ॲसिडस्’पासून तयार झाले आहेत. हे निर्धारित करते की रेणू रासायनिक प्रतिक्रिया कशी देतात आणि जीवन त्याच्या सभोवतालच्या वातावरणाशी कसे संवाद साधते. आता, जीवनाच्या कृत्रिम स्वरूपाची कल्पना केल्यास, त्याचे कृत्रिम स्वरूप म्हणजेच ‘मिरर बॅक्टेरिया.’ हे सैद्धांतिक जीव आहेत जे प्रयोगशाळेत तयार केले गेले आहेत.
हेही वाचा : माधव गाडगीळ यांना गौरवण्यात येणाऱ्या ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ पुरस्काराचं स्वरुप काय असतं?
h
विशेष म्हणजे, असे मिरर-इमेज रेणू आधीच काही मान्यताप्राप्त औषधांमध्ये समाविष्ट केले आहेत. हे जैव रेणू औषधे शरीरात दीर्घकाळ सक्रिय राहण्यास मदत करतात. परंतु, शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की मिरर बॅक्टेरिया काळजीपूर्वक व्यवस्थापित न केल्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात. ते परिसंस्थेमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि मानवी आरोग्यासाठीदेखील धोकादायक ठरू शकतात.
‘मिरर बॅक्टेरिया’ चिंतेचा विषय का?
शास्त्रज्ञांना भीती आहे की, कृत्रिम मिरर बॅक्टेरियाचा उलट प्रभाव होऊ शकतो. “एक संश्लेषित मिरर केलेले सूक्ष्मजंतू केवळ प्राणी आणि संभाव्य वनस्पतींसाठी अदृश्य नसतात तर इतर सूक्ष्मजंतूदेखील असतात, ज्यात विषाणूंचादेखील समावेश आहे, हे जीवाणू इतर सूक्ष्मजंतूंसाठी धोका निर्माण करू शकतात, ” असे पिट्सबर्ग विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजिस्ट वॉन कूपर यांनी ‘द इंडिपेंडंट’ला सांगितले. त्यामुळे हे कृत्रिम जीवाणू परिसंस्थेत अनियंत्रितपणे पसरू शकते, संभाव्यत: माणूस, प्राणी आणि वनस्पतींना संक्रमित करू शकते. “हे धोके किती गंभीर असू शकतात हे सांगणे कठीण आहे,” असे येल युनिव्हर्सिटीचे इम्युनोलॉजिस्ट रुसलान मेडझिटोव्ह यांनी सायन्स जर्नलमध्ये सांगितले. “जर मिरर बॅक्टेरिया संक्रमित प्राणी आणि वनस्पतींमधून पसरत असेल, तर पृथ्वीवरील बरेचसे वातावरण दूषित होऊ शकते आणि दूषित धूळ किंवा मातीचा कोणताही संपर्क प्राणघातक असू शकतो,” असे ते पुढे म्हणाले.
शिकागो विद्यापीठातील सह-लेखक आणि २०१९ चे नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ जॅक झोस्टाक यांनीही चिंता व्यक्त केल्या. “परिणाम घातक आणि अपरिवर्तनीय असू शकते, कदाचित यापूर्वी आपण सामोरे गेलेल्या कोणत्याही आव्हानापेक्षा हे खूप वाईट असू शकते,” असे ते म्हणाले. परंतु, ही परिस्थिती वास्तवात निर्माण होण्यापूर्वी योग्य उपाययोजना शोधण्यावर संशोधक जोर देतात. “आम्ही शिफारस करतो की, मिरर बॅक्टेरिया तयार करण्याच्या उद्दिष्टासह संशोधनास परवानगी दिली जाऊ नये आणि निधी देणारे हे स्पष्ट करतात की ते अशा कार्यास समर्थन देणार नाहीत,” असेही अहवालाच्या लेखकांनी लिहिले.
हेही वाचा : गुन्हेगाराला पकडण्यासाठी आता ‘एआय पोलिस रोबो’; या रोबोची वैशिष्ट्ये काय?
धोका किती गंभीर?
मिरर बॅक्टेरियामुळे उद्भवलेल्या धोक्याच्या तीव्रतेवर सर्व शास्त्रज्ञ सहमत नाहीत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील इम्युनोलॉजिस्ट आणि बायोसेक्युरिटीतज्ज्ञ गिगी ग्रोनव्हॉल या चिंतेचे वर्णन ‘अत्यंत सैद्धांतिक’ म्हणून करतात. संशोधन आणि निधीवर बंदी घालण्याच्या शिफारशीशी ग्रोनवाल सहमत नाहीत. त्यांना विश्वास आहे की, अशा निर्बंधांमुळे नाविन्यपूर्ण संशोधनावर रोख लागू शकते. “विज्ञानामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, परंतु अनेकांना असे वाटते की जोखीम घेणे फायदेशीर नाही.”