Kuwait Fire कुवेतच्या मंगाफ शहरात बुधवारी (१२ जून) आगीची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील मृतांमधील ४० हून अधिक जण भारतीय आहेत. या दुर्घटनेत ५० जण गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “कुवेत शहरातील आगीच्या घटनेच्या वृत्ताने खूप धक्का बसला आहे. ज्यांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावला त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी इच्छा,” असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कुवेतमधील आग दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

दक्षिण कुवेतच्या मंगाफ भागात सुमारे १९५ स्थलांतरित कामगार राहात असलेल्या अल-मंगफ इमारतीत पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली, त्यात सुमारे ४० भारतीयांचा मृत्यू झाला आणि अन्य ५० जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत एकूण ४९ जणांचा मृत्यू झाला. या आगीत मोठ्या संख्येने भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती येताच, मोदी सरकारने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आणि पीडितांना मदत देऊ केली. ही घटना नक्की कशी घडली? पीडित भारतीयांच्या मदतीसाठी मोदी सरकार काय करत आहे? यावर एक नजर टाकू या.

Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Fire , Natasha Enclave Society, Kondhwa,
पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग, रहिवासी बाहेर पडल्याने बचावले
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
Minor girl sexually assaulted by father in Dombivli
डोंबिवलीत वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
या दुर्घटनेत आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील मृतांमधील ४० हून अधिक जण भारतीय आहेत. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : सरकारचा मोठा निर्णय; विशिष्ट सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीवर घातली बंदी, कारण काय?

आग दुर्घटनेचे कारण

इमारत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीतील एका स्वयंपाकघरात ही आग लागली आणि लगेचच इतर मजल्यांनाही आग लागली. सोशल मीडियावरील प्रतिमा आणि व्हिडीओंमध्ये वरच्या मजल्याच्या खिडक्यांमधून काळा धूर निघताना दिसला. ‘मनोरमा ऑनलाइन’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना पहाटे ४ वाजता घडली. ही घटना घडली तेव्हा इमारतीतील कामगार झोपलेले होते. आगीपासून वाचण्यासाठी अनेकांनी इमारतीवरून उड्या मारल्या, ज्यात काहींचा मृत्यू झाला; तर बहुतेक कामगारांचा मृत्यू धुरामुळे झाला.

कुवेती मीडियाने वृत्त दिले आहे की, बांधकाम फर्म असलेल्या एनबीटीसी समूहाने १९५ हून अधिक कामगारांच्या राहण्यासाठी इमारत भाड्याने दिली होती, त्यापैकी बहुतेक कामगार केरळ, तामिळनाडू आणि उत्तर राज्यांतील आहेत. एनबीटीसी समूहाची अंशतः मालकी एका भारतीयाकडे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आग लागल्यानंतर कुवेतचे उपपंतप्रधान शेख फहाद अल-युसूफ अल-सबाह यांनी इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले आणि म्हटले, “दुर्दैवाने रिअल इस्टेट मालकांच्या लोभामुळे या गोष्टी घडतात.” या आगीची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मोदी सरकारने उचलली आवश्यक पावले

आग लागल्याची बातमी समोर आल्यानंतर, जी ७ बैठकीसाठी इटलीला रवाना होण्याच्या तयारीत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी लगेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांची एक आढावा बैठक बोलावली. बैठकीनंतर पंतप्रधानांनी मृत भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना पीएम रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आणि सरकारने सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश दिले.

तसेच पंतप्रधानांच्या निर्देशानुसार, राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह कुवेतला जाणार आहेत, जेथे ते मृतदेहांना लवकरात लवकर मायदेशी आणणे तसेच जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत मिळत आहे की नाही, हे सुनिश्चित करतील. कुवेतला जाण्यापूर्वी सिंह यांनी एएनआयला सांगितले की, काही मृतदेहांची ओळख पटलेली नाही. उर्वरित परिस्थिती आम्ही तिथे पोहोचल्यावर स्पष्ट होईल. पीडितांचे पार्थिव परत आणण्याच्या सरकारच्या योजनेबद्दल विचारले असता सिंह यांनी नमूद केले की, सध्या डीएनए चाचण्या सुरू आहेत. शरीर पूर्णपणे जळाल्यामुळे मृतांची ओळख पटवणे अवघड झाले आहे, त्यामुळे अद्याप तरी पीडितांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी सुरू आहे.

“एअर फोर्सचे विमान स्टँडबायवर आहे. मृतदेहांची ओळख पटताच नातेवाईकांना कळवले जाईल आणि आमचे हवाई दलाचे विमान मृतदेह परत आणेल. काल रात्री आम्हाला मिळालेल्या ताज्या आकड्यांनुसार, ४९ जणांपैकी ४३ जण भारतीय आहेत.

भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाइन

भारतीयांच्या मदतीसाठी आणि कुटुंबातील सदस्यांना संपर्कात राहता यावे यासाठी +९६५-६५५०५२४६ हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. शिवाय, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर त्यांच्या कुवेत येथील समकक्षांशी बोलले आहेत आणि त्यांना या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे पार्थिव लवकरात लवकर परत देण्याची विनंती केली आहे. “कुवेतमधील आगीच्या दुर्घटनेवर कुवेती एफएम अब्दुल्ला अली अल-याह्या यांच्याशी बोललो. घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते, ”असे जयशंकर यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले.

भारतीयांच्या मदतीसाठी आणि कुटुंबातील सदस्यांना संपर्कात राहता यावे यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. (छायाचित्र-पीटीआय)

कुवेतमधील भारताचे राजदूत आदर्श स्वैका यांनीही ताबडतोब जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना भेट दिली. जखमींना पाच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय दूतावासाने कळवले आहे की, जवळजवळ सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कुवेत आग दुर्घटनेवरील राजकीय प्रतिक्रिया

काँग्रेसनेही या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. मल्लिकार्जुन खरगे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. काँग्रेसचे प्रभारी संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले, “कुवेतमधील कामगार इमारतीत लागलेल्या आगीमुळे आपल्या सहकारी भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने खूप दुःख झाले आहे. मृत आत्म्यांच्या कुटुंबीयांना मनापासून संवेदना. मी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती करतो की, या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने मदत करावी आणि सर्व पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत जारी करावी.”

हेही वाचा : ३ दिवसांत ३ दहशतवादी हल्ले: जम्मू-काश्मीरमध्ये नक्की काय घडतंय? या हल्ल्यांमागे नक्की कोण?

याव्यतिरिक्त, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, त्यांनी त्यांचे मुख्य सचिव आणि नवी दिल्लीतील निवासी आयुक्तांना कुवेतमध्ये असलेल्या पश्चिम बंगालमधील लोकांच्या आरोग्याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

केरळच्या पिनाराई विजयन यांनीही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी केली. विजयन यांनी जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “कुवेत सरकारच्या संपर्कात राहून मदत आणि बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी भारतीय दूतावासाला आवश्यक निर्देश द्यावेत.”

Story img Loader