मातृसत्ताक कुटुंबपद्धती म्हणजे नेमके काय ?

Mothers Day 2023 मातृसत्ताक कुटुंबपद्धतीत आईच्या कुळाचे स्वामित्त्व मान्य केलेले असते. जन्मानंतर आईच्या कुळाचे नाव , तिच्या कुळाच्या परंपरांचा स्वीकार केला जातो. या पद्धतीत कुटुंबाच्या प्रमुखाची भूमिका स्त्री बजावते . किंबहुना वारसा हक्काने चालत येणारी संपत्ती आईकडून मुलीकडे जाते. एकूणच स्त्री केंद्रित कुटुंब व्यवस्थेला मातृसत्ताक कुटुंबपपद्धती म्हटले जाते. जगाच्या इतिहासात मुख्यत्त्वेकरून आदिवासी समाजात अशा स्वरूपाची कुटुंबव्यवस्था अस्तित्त्वात असल्याचे दिसते. असे असले तरी भारतासारख्या देशात या कुटुंब व्यवस्थेलाही धार्मिक पार्श्वभूमी असल्याचे लक्षात येते. तरी शास्त्रीय परिभाषेत मानववंशशास्त्रज्ञ या व्यवस्थेची व्याख्या करताना या पद्धतीचे मूळ आदिम मानवी उत्पत्तिशी जोडतात. उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यात अपत्यप्राप्ती नंतर पित्याची भूमिका निश्चित नसल्याने, अपत्ये मातेचीच मानली जात असत. याच प्रक्रियेतून काही समाजांमध्ये मातृसत्ताक कुटुंबव्यवस्था निर्माण झाली, असा अभ्यासकांचा कयास आहे.

मातृसत्ताक विवाह- मामाच्या मुलीशी लग्न

मातृसत्ताक या स्त्री प्रमुख समाजांमध्ये विवाह झाल्यावर पती आपल्या पत्नीच्या घरी जातो किंवा जावून येवून राहतो. काही समाजात नवविवाहित जोडपे मुलीच्या मामाकडे स्थायिक होते. स्त्रीप्रधान समाजात विधवा, घटस्फोट सामान्य मानले जातात. यामुळे त्या स्त्रीवर कुठल्याही प्रकारची बंधने येत नाही. किंबहुना स्त्रियांनी एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परंपरा या समाजात अस्तित्त्वात होती असे लक्षात येते. आजही भारतात अनेक ठिकाणी मामाच्या मुलीसोबत विवाह करण्याची प्रथा आहे. ही प्रथा याच स्त्रीप्रधान मातृसत्ताक कुटुंबपद्धतीची द्योतक आहे. महाराष्ट्रासह दक्षिणेकडे अशा स्वरूपाच्या प्रथा अस्तित्त्वात असल्याचे दिसते. मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये वारसा हक्काने मिळणारी संपत्ती मुलीकडे जात होती व आजही जाते. ही संपत्ती एकाच कुटुंबात राहावी या गरजेतून मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा अस्तित्त्वात आली असावी असे अभ्यासक मानतात. तसेच या कुटुंबव्यवस्थेत मातुलकुलाला महत्त्व असल्याने त्या कुळाचे नाव, गोत्र अखंडित राखण्याचा प्रयत्न केला जातो.

bollywood actor sahil khan announces secon wife conversion to islam
बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म, अभिनेत्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी आहे लहान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार

आणखी वाचा: विश्लेषण: अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णाचे विराट रूप का आठवले होते?

भारतात अनेक भागात आजही मातृसत्ताक कुटुंबपद्धती अस्तित्त्वात आहे. यात प्रामुख्याने ईशान्येकडील खासी, गारो समाजांचा समावेश होतो. तर दक्षिणेकडील नायर समाजाचा उल्लेख वगळल्यास भारतीय मातृसत्ताक कुटुंबपद्धतीचा इतिहास अपूर्ण ठरतो.

मातृसत्ताक कुटुंबपद्धती पळणारे मेघालयातील खासी आणि गारो समाज:

खासी समाज
ईशान्येकडील सात राज्यांपैकी मेघालय हे महत्त्वाचे राज्य आहे. १९७२ सालापर्यंत मेघालय हे आसाम राज्याचा भाग होते. १९७२ सालापासून खासी, गारो, जैंतिया या पर्वतशृंखला असलेल्या जिल्ह्यांच्या विलगीकरणातून मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली. याच पर्वत शृंखलेतील मूलनिवासी खासी समाजात मुलांना त्यांच्या आईचे आडनाव प्राप्त होते, पती लग्नानंतर त्यांच्या पत्नीच्या घरी जातात आणि सर्वात लहान मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळतो. खासी हा मेघालयातील आदिवासी समाज आहे. त्यांच्या उत्पत्तीचा संबंध इतिहासकार आग्नेय आशियातील एका प्राचीन ऑस्ट्रिक वंशाशी जोडतात. बहुतांशी खासी समाज हा आज मेघालयात राहातो. परंतु मेघालय या राज्याच्या स्थापनेपूर्वी हा समाज बंगाल, आसाम तसेच विलगीकरणापूर्वीचा मेघालय या भागात विस्तारलेला होता. परंतु भारत व बांग्लादेश फाळणीनंतर बहुतांशी समाज हा मेघालय या राज्यात येवून स्थायिक झाला. काही अभ्यासकांच्या मते खासी समाज हा मूलतः पितृसत्ताक समाज होता. जमिनीसाठी लढा देणारे शूर पुरुष म्हणून या समाजातील पुरुषांची ख्याती होती. परंतु कालांतराने हा समाज स्त्री प्रधान का झाला? याचे समर्पक उत्तर आजतागायत अभ्यासक देवू शकले नाही. पारंपारिकरित्या, खासी विस्तारित कुटुंबांमध्ये किंवा कुळांमध्ये राहतात. मुले त्यांच्या आईचे आडनाव घेत असल्याने, मुली कुळातील सातत्य सुनिश्चित करतात. घराण्यातील मोठ्या मुलींना त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहण्याचे किंवा बाहेर जाण्याचे स्वातंत्र्य आहे. सर्वात धाकटी मुलगी लग्नानंतरही माहेरच्या घराचा त्याग करत नाही. ती तिच्या पालकांची काळजी घेते आणि अखेरीस तिच्या आईच्या मृत्यूनंतर कुटुंबप्रमुख होते.

गारो समाज
मेघालयातील गारो हा समाजदेखील खासी प्रमाणेच मातृसत्ताक समाजाच्या पद्धतींचे पालन करतो. कुळातील सदस्यांना त्यांच्या ज्येष्ठ महिलेकडून वंशपरंपरागत अधिकार मिळतो आणि मालमत्ता कुटुंबातील सर्वात लहान मुलीला दिली जाते. या समाजात सर्व संपत्ती आणि संपत्तीचा वारसा फक्त सर्वात लहान मुलीलाच मिळतो. सर्व मोठ्या मुलींनी पितृसत्ताक पद्धतीचे पालन केले पाहिजे आणि लग्नानंतर त्यांच्या पतीसोबत त्यांच्या घरी राहावे असा प्रघात आहे.

आणखी वाचा: विश्लेषण: क्लिओपात्रा खरंच गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची का?

मातृसत्ताक पद्धती पाळणारा केरळ मधील नायर समाज:

केरळ मधील नायर समाज हा पारंपरिक मातृसत्ताक कुटुंबपद्धती पळणारा समाज होता. ब्रिटिशांनी केरळ पूर्णपणे काबिज करण्यापूर्वी नायर समाजाचे आधिपत्य या भागात होते. किंबहुना ब्रिटिशांच्या काळातही सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचाच दबदबा होता. या समाजात वारसा परंपरेने संपत्ती त्या कुटुंबाच्या मुली व मुलांकडेच राहत असे. १६ व्या आणि १८ व्या शतकादरम्यान कालिकत, वल्लुवनद, पालघाट आणि कोचीन या मध्यवर्ती प्रदेशात नायर समाजामध्ये अत्यंत असामान्य विवाह प्रथा अस्तित्त्वात होती. या प्रथेनुसार मुली वयात येण्यापूर्वी तिचा विवाह हा नायर किंवा नंबुदिरी ब्राह्मणाशी विधीपूर्वक होत असे. परंतु ती नायर मुलगी माहेरीच राहत असे. विवाहानंतर पती तिला भेटू शकत होता परंतु त्याला तसे करण्याचे कुठलेही बंधन नव्हते. काही वेळा मुलगी वयात आल्यावर ती पतीला किती वेळा भेटू शकते हे ठरविले जाई. या समाजात एकापेक्षा अधिक पती करण्याची प्रथा होती. ब्रिटिश कायद्याने नायरांमधील बहुपतिकत्वाची चाल बंद करण्यात आली व त्यांच्या वारसाहक्क कायद्यातही बदल घडवून आणले. याशिवाय याच भागात आढळणारा मातृसत्ताक संस्कृती असलेला समाज म्हणजे इझावा (ezhava). याही समाजातील मातृसत्ताक परंपरा ब्रिटिशांच्या हस्तक्षेपामुळे बंद झाली.

खासी, गारो, नायर समाज वगळता भारतात अनेक समाज आजही मातृसत्ताक कुटुंबव्यवस्थेचे पालन करताना आढळतात. त्यांच्या भाषा, प्रदेश, राहणीमान वेगळे असले तरी मुळाशी माता व तिचे कूळ प्रधान असते.

Story img Loader