Mughal Architecture Cooling Techniques आपण मुघलकालीन ऐतिहासिक चित्रपटांमध्ये नेहमीच पाहतो, मोठमोठाले किल्ले, त्यातील भव्यदिव्य दरबार… झगमगाट… भरजरी कपडे परिधान करून नृत्य करणाऱ्या नृत्यांगना आणि त्यात मश्गुल असणारे बादशहा व दरबारी मंडळी. हे पाहताना कोणालाही प्रश्न पडू शकतो की…भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे. सिनेमात किंवा तत्कालीन लघुचित्रांमध्ये इतके भरजरी आणि अंगभर कपडे घालणारे मुघल एसी नसताना दरबारात किंवा त्यांच्या राहत्या जागेत वातावरण थंड कसं ठेवत असतील?.. यावर्षी सर्वात उष्ण दिवस २२ जुलै दिवशी होता. हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण दिवस असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सध्याच्या काळात तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, आपल्याला उष्णतेची लाट किंवा या वर्षी सर्वात उष्ण दिवस कधी होता हे समजू शकतं आणि त्याच उष्ण वातावरणाचा सामना करण्यासाठी आपण पंखे, कुलर आणि एसी सारख्या उपकरणांचा वापर करतो. आपली परिस्थिती इतकी बिकट आहे की, पाच ते दहा मिनिटांच्या कामासाठी आपण बाहेर गेलो तरी घरात आल्या आल्या आपल्याला एसी लावल्याशिवाय चैन पडत नाही. त्याचाच परिणाम म्हणून खराब झालेले एअर कंडिशनर अनेकांसाठी काळ ठरले आहेत. वातानुकूलित इमारतीत ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.. त्यामुळे खर्चात वाढ होते ती गोष्ट वेगळी. निसर्गातील वाढलेल्या तापमानासाठी, उष्णतेसाठी आपणच कारणीभूत आहोत. आपण जी निसर्गाला हानी पोहचवलेली आहे, त्याचाच हा परिणाम आहे. त्यामुळे यापुढे कमीतकमी हानी कशी पोहोचेल याची काळजी घेणं गरजेचं आहे. घरातील वातावरण हे पर्यावरणीय कूलिंग तंत्रे वापरूनही थंड ठेवता येऊ शकते. याच प्रकारचे तंत्रज्ञान मुघल वास्तुकलेतही आढळते. ज्याचा वापर आजही समकालीन इमारतींच्या बांधकामात करता येऊ शकतो. त्याचाच घेतलेला हा आढावा!

अधिक वाचा: दख्खनमधील ‘या’ गुलामाने केला होता मुघलांचा पराभव; का महत्त्वाचा आहे त्याचा इतिहास?

Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय
What is Pysanka?
Ukrainian egg: युनेस्कोच्या वारसा यादीत प्राचीन युक्रेनियन अंड्याला स्थान !
maharashtra cabinet expansion before nagpur session
मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, ११ किंवा १२ तारखेला शक्यता

मुघल वास्तूंना थंड ठेवणारे तंत्रज्ञान नेमके कसे होते?

भारतीय वास्तुरचनेच्या इतिहासात मुघल स्थापत्य कलेला स्वतःचे असे वेगळे वलय आहे. मुघल स्थापत्य कला ही पर्शियन, तुर्की, तैमुरीद इराणी, मध्य आशियाई आणि भारतीय हिंदू वास्तुशैलीचे एकत्रित मिश्रण आहे. मुघल स्थापत्यकला ही इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा प्रकार आहे. ही कला प्रामुख्याने १६ ते १८ व्या शतकादरम्यान विकसित झाली. या स्थापत्य रचनेतील काही प्रमुख घटकांमुळे वास्तू थंड राखण्यास मदत झाली. झाडं, पाणी, झरोखे, उंच छत इत्यादींसारख्या घटकांचा यात समावेश होतो.

वनस्पती आणि पाणी

वास्तूच्या सभोवतालच्या हवामानाचे नियमन करण्यासाठी मुघलांनी वनस्पती आणि पाणी या दोन घटकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला. कालवे आणि कारंजी संरचनेच्या आतील भागात तयार केले. मुघल वास्तुविशारदांनी वातावरण थंड ठेवण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. मोठी कुंड आणि जलवाहिन्या मुघल स्थापत्यरचनेचा भाग होत्या. बाष्पीभवनासारख्या प्रक्रियेच्या माध्यमातून वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न केला. तलावांच्या परावर्तित पृष्ठभागांनी भिंतींवरील सूर्यप्रकाश विचलित करण्यात मदत केली आणि ज्यामुळे भिंतींची उष्णता शोषण्याची क्षमता कमी झाली.

झारोखा आणि व्हेंटिलेशन

मुघल स्थापत्यरचनेतील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे झरोका किंवा ओव्हरहँगिंग बंद बाल्कन्या. या झरोक्यांनी इमारतींच्या सौंदर्यात भर घालण्याव्यतिरिक्त नैसर्गिक वायूविजन प्रक्रियेला प्रोत्साहन दिले. त्यामुळे वास्तूतील वातावरण थंड राखण्यास मदत झाली.

अंगण आणि बागा

मोठमोठाली अंगणे आणि बागा या मुघल स्थापत्य रचनेतील महत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जातात. उद्यानांमध्ये असलेल्या तलाव आणि इतर पाण्याच्या घटकांमुळे वातावरण थंड झाले. ज्यामुळे तापमानात लक्षणीयरीत्या घट झाली. मुघलांनी टेरेस आणि छतावरील बागा यांसारख्या शीतकरण पद्धती देखील वापरल्या. या बागांनी आणि छतांनी इन्सुलेशनचे काम करत शोषलेली उष्णता कमी करण्यात मदत केली. बाष्पोत्सर्जनाद्वारे, छतावरील वनस्पतींवर थंड प्रभाव पडला, त्याचा परिणाम छताखाली असलेल्या खोल्या थंड ठेवण्यास मदत झाली.

जाड भिंती आणि उंच छत

जाड भिंती आणि उंच छत असलेल्या इमारती मुघलांच्या सर्वात सोप्या पण प्रभावी धोरणांपैकी होत्या. इन्सुलेटर म्हणून, जाड भिंतींनी बाहेरून आत येऊ शकणाऱ्या उष्णतेचे प्रमाण मर्यादित केले, त्यामुळे आतील भाग थंड ठेवण्यास मदत झाली. परिणामी खोलीतील उष्णता उंच छतापर्यंत पोहोचली आणि खाली राहण्याची जागा लक्षणीयरीत्या थंड झाली. या प्रकारची वास्तूरचना विशेषतः राजवाडे आणि सार्वजनिक संरचनांमध्ये नेहमीचीच होती.

अधिक वाचा:  टिपूची तलवार आणि त्याचा वादग्रस्त इतिहास !

छत्री आणि घुमट

मोठे घुमट आणि छत्री, किंवा उंच घुमट, मोठ्या आकाराचे मंडप ही मुघल रचनेतील प्रमुख वैशिष्ट्ये होती. या रचनांनी वास्तूतील हवा खेळती राहण्यास मदत केली. तसेच उन्हाच्या तीव्र झोतापासून संरक्षण दिले. घुमटाकृती छत उंच असल्यामुळे खोलीतील उष्ण-दमट हवा त्याने पकडून ठेवण्याचे काम केले, त्यामुळे खालच्या खोल्यांमध्ये वातावरण थंड राहण्यास मदत झाली. घुमटाकडील गरम हवा तिथल्या झरोक्यांद्वारे बाहेर टाकली जात होती.

सच्छिद्र दगडी पडदे

मुघल वास्तुकला त्याच्या बारीक नक्षीकाम केलेल्या जाळीदार खिडक्या आणि विभाजकांसाठी ओळखली जाते. या सच्छिद्र दगडी पडद्यांमुळे सूर्यप्रकाश थेट शिरकाव करू शकत नव्हता, त्यामुळे थंड वातावरण निर्माण होत हवा खेळती राहत होती. जाळीदार स्क्रीन्सने सूर्यप्रकाश पसरवून आणि उष्णतेची वाढ कमी करून सर्वात उष्ण दिवसांमध्येही आतील भाग आनंददायी राहण्याची व्यवस्था केली. याशिवाय मुघल इमारतींना जास्तीत जास्त सावली मिळावी आणि उष्णतेची वाढ कमी व्हावी यासाठी अत्यंत काळजी घेतली जात होती. त्यांनी नैसर्गिक वायुविजनावर भर दिला. झाकलेले मार्ग आणि व्हरांड्यांचा वापर करून राहण्याची जागा थंड आणि सावलीत ठेवण्याचे काम केले. सध्याच्या जागतिक तापमानवाढीच्या काळात मुघल वास्तूशैलीच्या या वैशिष्ठ्यांकडे पुन्हा एकदा तद्न्यांचे लक्ष गेले आहे.

Story img Loader