गौरव मुठे
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी त्यांचे उत्तराधिकारी ठरवण्याची योजना अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्याची मुकेश अंबानी यांची इच्छा यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी वडील धीरूभाई यांच्या पश्चात, धाकटय़ा भावासोबत वारसाहक्क, संपत्ती विभाजनाच्या कडवट अनुभवाचा त्यांना सामना करावा लागला होता.

मुकेश अंबानी यांनी कोणती घोषणा केली?

 रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर त्यांची मुलगी ईशा अंबानी-पिरामल, आकाश आणि अनंत या तिन्ही मुलांच्या निवडीची घोषणा केली. आतापर्यंत ही तिन्ही मुले केवळ काही कंपन्यांचे व्यावसायिक कामकाज सांभाळत होती. आता पहिल्यांदाच त्यांचा पालक कंपनीच्या संचालक मंडळात प्रवेश झाला आहे. संचालक पदावरील त्यांच्या नियुक्तीला भागधारकांकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर मग मंजुरी मिळेल. याचबरोबर मुकेश अंबानी यांना एप्रिल २०२९ पर्यंत आणखी पाच वर्षे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर मुदतवाढ देण्यासही भागधारकांची मंजुरी घेतली जाणार आहे.

ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?
bank account holders allowed for nomination after new banking rules update
विश्लेषण : बँक खातेदारांना आता चार नॉमिनेशन्सची मुभा… नवीन बँकिंग कायद्यात आणखी काय बदल?

हेही वाचा >>> विश्लेषण : प्रिगोझिन यांच्यापश्चात ‘वॅग्नेर’चे भवितव्य काय?

मुकेश अंबानी का भावुक झाले?

वार्षिक सभेला संबोधित करताना, ‘हा आपल्यासाठी खूप भावनिक क्षण आहे’ असे मुकेश अंबानी यांनी नमूद केले. १९७७ साली दिवंगत धीरूभाई यांनी मुकेश यांचा कंपनीच्या संचालक मंडळात समावेश केला. त्या वेळी ते अवघ्या २० वर्षांचे होते. ४६ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटल्यानंतरदेखील कंपनीत नव्यानेच जबाबदारी घेतली असल्याची भावना अजूनही असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले. ईशा, आकाश आणि अनंत या तिघांनी समर्पण, वचनबद्धता आणि कठोर परिश्रमातून हे यश मिळवले आहे. इतर ज्येष्ठ संचालकांसोबत ते रिलायन्स समूहाला नेतृत्व देण्यासाठी आणि समूहातील सर्व व्यवसायांना मार्गदर्शन करण्यासाठी एक संघ म्हणून काम करतील, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

वीस वर्षांपूर्वी काय घडले होते?

रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे २००२ मध्ये निधन झाल्यांनतर संपत्ती आणि अधिकार क्षेत्रावरून त्यांचे दोन्ही पुत्र मुकेश आणि अनिल यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. आई कोकिळाबेन यांच्या मध्यस्थीने रिलायन्स समूहाची वाटणी करण्यात आली. त्यानुसार मोठे बंधू मुकेश यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, रिलायन्स पेट्रोलियम, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या पारंपरिक व्यवसाय असणाऱ्या कंपन्या सोपवण्यात आल्या होत्या. तर धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्याकडे रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम), रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स एनर्जी, रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस या कंपन्यांची जबाबदारी देण्यात आली.  

हेही वाचा >>> विश्लेषण : रश्मी शुक्ला यांच्याशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणाचे काय होणार?

कोणाकडे काय जबाबदारी?

आकाश अंबानी यांची रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या अध्यक्षपदी गेल्या वर्षी नियुक्ती करण्यात आली होती. ती जिओ प्लॅटफॉम्र्सची उपकंपनी आहे. त्यात मेटा आणि गूगलसारख्या जागतिक कंपन्यांची हिस्सेदारी असून, तिचे अध्यक्षपद मुकेश अंबानी यांच्याकडेच आहे. आकाशची जुळी बहीण ईशाकडे रिलायन्स रिटेल या किराणा क्षेत्रातील व्यवसायाची जबाबदारी सोपवण्यात आली. रिलायन्स समूहाकडून पुढील वर्ष ते सव्वा वर्षांच्या कालावधीत रिलायन्स रिटेलचा आणखी १० टक्के हिस्सा बडय़ा गुंतवणूकदारांना विकण्याचे नियोजन आहे. २८ वर्षीय अनंत अंबानी यांच्याकडे ऊर्जा व्यवसायाची धुरा सोपविण्यात आली आहे. नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. त्या आता रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

समभागात घसरण कशामुळे?

मुकेश अंबानी यांनी पुढच्या पिढीच्या हाती सूत्रे सोपविण्यासाठी पहिले पाऊल टाकले ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. मात्र बाजारावर त्याचा फारसा सकारात्मक परिणाम दिसून आला नाही. वार्षिक सभेतून रिलायन्स रिटेलच्या आणि दूरसंचार व्यवसायाच्या प्रारंभिक समभाग विक्रीबाबत घोषणा होण्याची गुंतवणूकदारांना आशा होती. त्याबाबत आणि अन्यही ठोस कोणती घोषणा नसल्यानेदेखील हिरमोड झाल्याने समभाग सलग दोन सत्रांत घसरला. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी म्हणजेच सोमवार आणि पुढे मंगळवारच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात घसरण झाली. मंगळवारच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग ०.९६ टक्क्यांनी घसरून २,४२०.३५ रुपयांवर बंद झाला.

gaurav.muthe@expressindia.com

Story img Loader