२००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणाचे आता अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. १५ ऑगस्ट रोजी ‘यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर नाइनथ सर्किट’ने निर्णय दिला की, राणा दोन देशांमधील करारानुसार प्रत्यार्पणासाठी पात्र आहे. राणा याने दाखल केलेल्या अपीलवर, कॅलिफोर्निया जिल्हा न्यायालयाने त्याच्या भारताच्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारी त्याची हैबियस कॉर्पस याचिका फेटाळून लावली होती. न्यायालयाने पुष्टी केली आहे की, मुंबईतील सर्वात प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एकामध्ये राणाच्या सहभागाचे भारताने पुरेसे पुरावे प्रदान केले होते. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू आणि ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. राणाकडे अद्याप निर्णयावर अपील करण्याचा पर्याय आहे. पण, तहव्वूर राणा आहे कोण? २६/११ च्या हल्ल्यात त्याची भूमिका काय होती? सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोण आहे तहव्वूर राणा?
तहव्वूर राणा पाकिस्तानातील हसन अब्दल कॅडेट स्कूलमध्ये शिकला. याच शाळेत त्याची मैत्री डेव्हिड हेडलीशी झाली; ज्याला दाऊद गिलानी म्हणूनही ओळखले जाते. हेडली हा अमेरिकन नागरिक असून त्याची आई अमेरिकन आणि वडील पाकिस्तानी होती. त्याला २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी दोषी ठरवण्यात आले होते. त्याच्यावर या हल्ल्याचे नियोजन केल्याचा आरोप होता. राणा याने थोड्या काळासाठी पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून सेवा दिल्यानंतर, १९९७ मध्ये तो कॅनडाला गेला. तो इमिग्रेशन सेवांमध्ये विशेषज्ज्ञ म्हणून कार्यरत झाला आणि अखेरीस त्याने कॅनडाचे नागरिकत्व मिळवले.
हेही वाचा : केशरी ते बसंती: पवित्र निशान साहिबचा रंग का बदलला? जाणून घ्या रंगाभोवतीचा इतिहास आणि राजकारण
राणा यानी फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेसची स्थापना केली; ज्याची कार्यालये शिकागो आणि इतर काही ठिकाणी होती. तपासानुसार, या व्यवसायाच्या मुंबई शाखेने हेडलीला हल्ले करण्यासाठी, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे संभाव्य लक्ष्य ओळखण्यासाठी आणि सर्वेक्षण करण्यासाठी परिपूर्ण मदत केली. २६ नोव्हेंबर २००८ रोजी १० एलईटी दहशतवाद्यांनी मुंबईत दहशत माजवली. त्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताज हॉटेल, नरिमन हाऊस, अलब्लेस हॉस्पिटल या शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रमुख ठिकाणांना लक्ष्य केले. या भीषण हल्ल्यात सहा अमेरिकन लोकांसह १६६ लोकांचा मृत्यू झाला होता.
ऑक्टोबर २००९ मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी २६/११ च्या हल्ल्याशी संबंधित आरोपावरून शिकागोच्या ओ’हारे विमानतळावर राणाला अटक केली. हेडलीच्या साक्षीच्या आधारे राणाला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. याव्यतिरिक्त २००५ मध्ये प्रेषित मुहम्मद यांचे व्यंगचित्र प्रकाशित करणाऱ्या डॅनिश वृत्तपत्र ‘Jyllands-Posten’ वर हल्ला करण्याच्या कटाचे समर्थन केल्याबद्दल २०११ मध्ये त्याला शिकागोमध्ये दोषी ठरवण्यात आले.
२६/११ च्या हल्ल्याशी राणाचा संबंध
अटकेनंतर तहव्वूर राणाने कबूल केले की, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ही एक दहशतवादी संघटना आहे आणि त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड हेडली पाकिस्तानमधील त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात गेला होता. अमेरिकन कागदपत्रानुसार, २००५ च्या उत्तरार्धात हेडलीला एलईटीकडून भारतात प्रवास करून तिथे पाळत ठेवण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. २००६ च्या सुरुवातीस हेडलीने एलईटीच्या दोन सदस्यांसह मुंबईत इमिग्रेशन कार्यालय उघडण्याबाबत चर्चा केली. हेडलीने राणाला याची माहिती दिली आणि त्यांनी राणाच्या फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेसचे कार्यालय वापरण्याचा निर्णय घेतला, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हेडलीच्या साक्षीनुसार तसेच ईमेल आणि इतर कागदपत्रांच्या माहितीनुसार, “राणाने फर्स्ट वर्ल्डशी संबंधित व्यक्तीला हेडलीसाठी कागदपत्रे तयार करण्याचे निर्देश दिले आणि हेडलीला भारताच्या प्रवासासाठी व्हिसा कसा मिळवायचा याबद्दल सल्ला दिला.” मुंबईवरील हल्ल्यापूर्वी राणाने शिकागोमध्ये इमिग्रेशन लॉ सेंटर चालवणाऱ्या रेमंड सँडर्सच्या माध्यमातून हेडलीला भारतात मल्टिपल-एंट्री बिझनेस व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केली, तसेच आर्थिक सहाय्यही केले. त्याने हेडलीला सप्टेंबर २००६ मध्ये ४१,९३७ रुपये, ऑक्टोबर २००६ मध्ये ६७,६०५ रुपये, नोव्हेंबरमध्ये १७,६३६ रुपये आणि डिसेंबर २००६ मध्ये ८३,८७५ रुपयांचे आर्थिक सहाय्य केले.
मार्च २०१६ मध्ये मुंबईतील विशेष न्यायालयासमोर उलटतपासणीदरम्यान, हेडलीने न्यायालयाला सांगितले की, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (आयएसआय) मेजर इक्बाल यांच्या सूचनेनुसार हल्ल्यासाठी लोकांची भरती करण्यासाठी म्हणून त्याने भाभा अणु संशोधन केंद्राला भेट दिली होती. राणाला याची माहिती होती. ताजमहाल पॅलेस हॉटेलवरील हल्ल्याच्या तपशिलांचीही राणाला माहिती होती. त्याने हेडलीशी हल्ल्याच्या लक्ष्यांबद्दल सविस्तर चर्चा केली होती. राष्ट्रीय तपास संस्थेला राणा हवा आहे आणि त्याच्यावर गुन्हेगारी कट रचणे, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, हत्या, फसवणुकीच्या उद्देशाने खोटी कागदपत्रे तयार करणे आणि इतर गुन्ह्यांचा आरोप आहे.
राणाचे प्रत्यार्पण होणार का?
४ डिसेंबर २०१९ रोजी भारताने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेला विनंती केली होती. यानंतर १० जून २०२० रोजी भारताने प्रत्यार्पणाच्या दृष्टिकोनातून राणाच्या तात्पुरत्या अटकेसाठी तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने १९९७ मध्ये स्वाक्षरी केलेल्या भारत आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकालीन द्विपक्षीय प्रत्यार्पण कराराला बळकटी देत प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर राणाला जून २०२० मध्ये अमेरिकेत पुन्हा अटक करण्यात आली होती. यापूर्वी डेन्मार्कमध्ये नियोजित हल्ल्याशी संबंधित आरोपांनुसार तो १८ ऑक्टोबर २००८ पासून शिकागोमध्ये फेडरल कोठडीत होता. त्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला २०२० मध्ये सहानुभूतीच्या आधारावर थोडक्यात सोडण्यात आले होते.
हेही वाचा : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत बालविवाहाची प्रथा? २४ वर्षांत ३ लाख बालविवाह झाल्याचं उघडकीस
यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट सेंट्रल डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्नियाच्या न्यायाधीश जॅकलिन चुलजियन यांनी १६ मे २०२३ रोजी ४८ पानांच्या आदेशात भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला मान्यता दिली. आपल्या याचिकेमध्ये राणाने असा युक्तिवाद केला की, ज्या वर्तनासाठी त्याला अमेरिकेत निर्दोष मुक्त करण्यात आले, त्या आधारावर त्याचे प्रत्यार्पण केले जाऊ शकत नाही. परंतु, राणाची ही याचिका फेटाळण्यात आली. सरकारच्या म्हणण्यानुसार, करार राणाच्या प्रत्यार्पणाला परवानगी देतो. परंतु, राणाकडे अद्याप या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा पर्याय आहे.