इंद्रायणी नार्वेकर

मुंबई सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे काम वेगात सुरू आहे. हा प्रकल्प या वर्षाअखेरीस नोव्हेंबरमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने पालिका प्रशासनापुढे ठेवले आहे. मात्र संपूर्ण प्रकल्प तोपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाहीच, पण प्रकल्पाचा काही भाग सुरू करणेही पालिकेसाठी आव्हानात्मक आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकल्प सुरू करण्याचा राज्य सरकारचा आग्रह आहे. मात्र नोव्हेंबरची मुदत पाळणे हे पालिकेसाठी आव्हानात्मक आहे. यामागची कारणे आणि त्यांचे विश्लेषण.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?

मुंबई सागरी किनारा प्रकल्प कसा आहे?

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारी हा मार्ग तयार केला जात आहे. त्याची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रचंड मोठा व गुंतागुंतीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २,१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी वरळीच्या समुद्रात खांब उभारावे लागणार आहेत. प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राइव्ह) असणाऱ्या स्वराज्य भूमीलगतच्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत २.८ किमी लांबीचे दोन महाबोगदे तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ ७० टक्क्यांनी वाचणार आहे. समुद्रात भराव घालणे, जमीन तयार करणे, बोगदे खणणे, समुद्रात पूल बांधणे, समुद्री भिंत, समुद्री पथ बांधणे, हिरवळ तयार करणे अशी कामे या प्रकल्पात समाविष्ट आहेत आणि ही सगळी कामे एकाच वेळी सुरू आहेत.

प्रकल्पाचे किती काम पूर्ण झाले आहे?

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांचे ७६ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. बोगदा खणण्याचे काम पूर्ण झाले आहे. भराव टाकण्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. समुद्री भिंत बांधण्याचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. सागरी किनारा मार्गावरून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी व जाण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या आंतरबदलांचे ५६ टक्के काम झाले आहे, तर प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे ५९ टक्केच काम झाले आहे.

प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत कधीची होती व ती किती वेळा पुढे गेली?

डिसेंबर २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवले होते. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला होता. समुद्रात टाकण्यात आलेला भराव पहिल्या वर्षी पाण्याबरोबर वाहून गेला होता. त्यामुळे कामात अडथळा आला होता. समुद्रात भराव टाकण्यास विरोध होऊ लागल्यामुळे जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने प्रकल्पाला स्थगिती दिली. त्यामुळे प्रकल्पाचे काम सात महिने रखडले. त्यानंतर टाळेबंदीच्या काळात कामाचा वेग कमी झाला. न्यायालयीन वाद मिटल्यानंतर कामाला सुरुवात झाली व जुलै २०२३ ची मुदत देण्यात आली होती. परंतु, वरळी येथे पुलाच्या खांबांतील अंतराचा मुद्दा मच्छीमारांनी लावून धरल्यामुळे व काम रखडल्यामुळे आता नोव्हेंबर २०२३ ची मुदत देण्यात आली आहे. प्रत्यक्षात सगळा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याकरिता मे २०२४ उजाडणार आहे. तर संपूर्ण प्रकल्प आणि प्रकल्पालगतच्या सुविधा २०१५ मध्ये पूर्ण होऊ शकणार आहेत.

विश्लेषण : जगातील सर्वांत राहण्यायोग्य १० शहरे कोणती? जागतिक जीवनमान निर्देशांकात भारतीय शहरे कुठे?

नोव्हेंबरमध्ये प्रकल्प सुरू करण्यात अडचणी कोणत्या?

या प्रकल्पांतर्गत असलेल्या दोन महाबोगद्यांपैकी दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचा क्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. तेव्हा या प्रकल्पाचा काही भाग तरी या वर्षाअखेरीस सुरू करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे या प्रकल्पाचा काही भाग नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाला गाठावे लागणार आहे. मात्र हे लक्ष्य गाठताना पालिका प्रशासनाची दमछाक होणार आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी येथील टोकाला, सागरी किनारा मार्ग जेथे जोडला जाणार आहे तेथील पुलाचे बांधकाम अद्याप झालेले नाही. याच ठिकाणी दोन खांबांमधील अंतर वाढवून देण्याच्या मागणीसाठी मच्छीमारांनी प्रकल्पाचे बांधकाम बंद पाडले होते. आता हा प्रश्न मिटला असला तरी हे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे.

प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गापर्यंत (मरिन ड्राइव्ह) दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी दुसऱ्या बोगद्याचे खणन काम मे महिन्यात पूर्ण झाले आहे. त्यामुळे या बोगद्यातील अंतर्गत कामे अद्याप झालेली नाहीत तर वरळीकडून मरिन ड्राइव्हकडे येणाऱ्या मार्गावरील बोगद्याची कामेही अजून सुरू आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये हा मार्ग वरळीपर्यंत सुरू केला तरी बोगद्याची एकच बाजू वापरता येणार आहे. मरिन ड्राइव्हकडून वरळीकडे जाण्यासाठी जुन्याच रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. तसेच दक्षिण मुंबईतून जेमतेम हाजी अलीपर्यंतच जाता येणार आहे.

प्रकल्पाचे काम पूर्ण कधी होणार?

या प्रकल्पासाठी १ कोटी ३ लाख ८३ हजार ८२० चौरस फुटांचे भराव क्षेत्र तयार केले जाणार आहे. यापैकी सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्रात म्हणजेच २८ लाख ५२ हजार २९५ चौरस फुटांमध्ये सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. उर्वरित ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा साकारण्यात येणार आहेत. ज्यात प्रसाधनगृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असेल. याव्यतिरिक्त १ हजार ८५६ एवढी वाहन क्षमता असलेल्या ३ भूमिगत वाहनतळांचाही यात समावेश आहे. मात्र भराव क्षेत्रावरील या विकासासाठी सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२२ मध्ये पालिकेला परवानगी दिली. त्यामुळे ही कामे नुकतीच सुरू झाली असून ती सर्व पूर्ण होण्यास जून २०२५ पर्यंतचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये प्रकल्प सुरू झाला तरी नुसताच रस्ता तयार होणार आहे.

प्रकल्प सुरू करण्याची घाई का?

सागरी किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण करण्याचे वचन हे उद्धव ठाकरे गटाने वचननाम्यात दिले होते. मात्र आता या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून राज्यात सत्तांतरही झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे मोठे राजकीय भांडवलही येत्या पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर केले जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प काही अंशी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र अर्धवट स्थितीत असताना त्याचा वापर सुरू करताना पालिका प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.

Story img Loader