महाराष्ट्र विधानसभेत महायुतीने घवघवीत यश मिळवून २८८ पैकी २३० जागा जिंकल्या. पण त्यातही भारतीय जनता पक्षाने राज्याच्या इतिहासातील अभूतपूर्व अशी कामगिरी करत १३२ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ती यंदा काहीशी अपुरी पडली असली तरी मुंबई महापालिकेवर पर्यायाने मुंबईवर एकहाती वर्चस्व राखण्याचे ध्येय भाजपला खुणावू लागले आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक कधी?

मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. पालिकेच्या त्या सभागृहाचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपुष्टात आला. मात्र, त्यावेळी करोनाची लाट असल्यामुळे आणि नंतर प्रभागरचना, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवर सुरू झालेल्या न्यायालयीन लढाईत महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडत गेल्या. मुंबईसह राज्यभरातील महापालिकांमध्ये सध्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय राजवट सुरू आहे. या सर्व निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर लगेच घेतल्या जातील, अशी शक्यता आहे. ते पाहता मार्च-एप्रिलमध्ये या निवडणुका पार पडतील, असे चित्र आहे.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका

विधानसभा निवडणुकीतील चित्र

मुंबईत विधानसभेचे ३६ मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने १५, शिवसेना ठाकरे गटाने १०, शिवसेना शिंदे गटाने ६, काँग्रेसने ३, राष्ट्रवादी अजित पवार गटाने १, समाजवादी पक्षाने एक जागी विजय मिळवला.

हेही वाचा – जामा मशीद की हरिहर मंदिर? मशिदीच्या सर्वेक्षणावरून उफाळला हिंसाचार; प्रकरण काय?

हा निकाल काय सांगतो?

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १६ तर एकसंध शिवसेनेने १४ जागी विजय मिळवला होता. चार जागी काँग्रेसने तर एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने प्रत्येकी एकेक जागी विजय मिळवला होता. त्याच्याशी तुलना करता भाजपने एक जागा गमावली तर दोन्ही शिवसेनांनी मिळवून १६ जागी विजय मिळवला. मात्र, लढवलेल्या जागा आणि विजय यांचा विचार करता भाजपने १८ जागा लढवून १५ जिंकल्या तर ठाकरे गटाने २१ जागा लढवून १० जागी विजय मिळवला. त्यामुळे जागांबरोबरच ‘स्ट्राइक रेट’च्या बाबतीतही भाजप मुंबईतील मोठा पक्ष ठरला आहे.

कोणाचे कोठे वर्चस्व?

ठाकरे गटाने मुंबईत भायखळा, वरळी, माहीम, शिवडी, कलिना, जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा, विक्रोळी, वांद्रे पूर्व, दिंडोशी अशा दहा जागा जिंकल्या. भाजपने मलबार हिल, कुलाबा, वांद्रे पश्चिम, बोरिवली, दहीसर, मुलुंड, चारकोप, गोरेगाव, अंधेरी पश्चिम, कांदिवली पूर्व, विलेपार्ले, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शीव कोळीवाडा, वडाळा या जागी विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाने अंधेरी पूर्व, मागाठाणे, चांदिवली, चेंबूर, भांडूप पश्चिम, कुर्ला अशा सहा जागा जिंकल्या. काँग्रेसला मुंबादेवी, धारावी आणि मालाड हे आपले मतदारसंघ राखता आले तर अजित पवार गट आणि सपाने अनुक्रमे अणुशक्ती नगर आणि मानखुर्द या जागा कायम राखल्या.

या निकालावर दृष्टिक्षेप टाकता भाजपने पश्चिम उपनगरांवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून येते. तर मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्राबल्य कायम आहे. शिंदे गटाला भायखळा आणि माहीम या दोन जागा ठाकरे गटाविरुद्ध गमवाव्या लागल्या. तर चेंबूर आणि भांडूप पश्चिम या ठाकरे गटाच्या दोन जागा शिंदेंनी मिळवल्या. शिंदे गटात असलेले खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी पूर्वची जागा ठाकरे गटाचे अनंत नर यांनी अगदी थोडक्यात जिंकली. मात्र, एकंदरीत निकाल पाहता महायुतीचेच मुंबईवर वर्चस्व राहिल्याचे दिसून येत आहे.

महापालिका निवडणुकीवर काय परिणाम?

मुंबईत १९७०च्या दशकापासून महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. मात्र, शिवसेनेच्या संख्याबळात घट होत राहिली. पालिकेत शिवसेना-भाजप युती अनेक वर्षांपासून राहिली असली तरी भाजपच शिवसेनेचा मोठा प्रतिस्पर्धी ठरला आहे. पालिकेवर एकहाती वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष २०१७मध्ये स्वतंत्र लढले. त्यात शिवसेनेने ८४ तर भाजपने ८२ जागा जिंकल्या. २०१२च्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये जवळपास दीडपट भर पडली. तेव्हापासूनच भाजप मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिला आहे. गेल्या काही वर्षांतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची मुंबईतील मतांची टक्केवारी सातत्याने वाढत राहिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने मुंबईतील आपली ताकद दाखवून दिली. मात्र, त्याच्याही आधीपासून भाजपने मुंबई महापालिकेत दीडशे जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीतील अद्भुत यशानंतर भाजपचे मुंबईतील नेते महापालिकेत २००पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा करू लागले आहेत.

हेही वाचा – COP29: ३०० अब्ज डॉलर्सची मदत भारताने नाकारली, वादग्रस्त हवामान करार नक्की काय? त्यावरून विकसनशील देश का संतापले?

उद्धव ठाकरेंपुढील आव्हाने

विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने लढलेल्या ९४ पैकी केवळ २० जागा जिंकल्या. त्यातील दहा जागा फक्त मुंबईतील आहेत. ही बाब उद्धव ठाकरेंसाठी सुखावह असली तरी, जिंकलेल्या जागांपैकी काही जागा ठाकरे गटाने कमी मताधिक्याने जिंकल्या आहेत. २०१९च्या तुलनेत ठाकरेंच्या उमेदवारांचे मताधिक्य घटल्याचे स्पष्ट होत आहे. आदित्य ठाकरेंचेच उदाहरण पाहता, २०१९मध्ये आदित्य यांनी ६७ हजार ४२७ मतांनी वरळीत विजय मिळवला होता. यावेळी त्यांचे मताधिक्य जेमतेम ८८०१ राहिले. जोगेश्वरी पूर्वमध्ये ठाकरे गटाचे अनंत नर केवळ दीड हजार मतांनी विजयी झाले. अजय चौधरी, सुनील प्रभू, सुनील राऊत यांच्या मताधिक्यातही लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे मध्य मुंबईत वर्चस्व राखणाऱ्या ठाकरेंना महापालिकेसाठी प्रभागनिहाय व्यूहरचना करावी लागणार आहे. पश्चिम उपनगरांत २०१७मध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले होते. ते विधानसभेतही कायम असून महापालिकेतही त्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ठाकरे यांना मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांमध्ये आपली ताकद वाढवावी लागणार आहे. येथे त्यांची लढाई शिंदे गटाशीही राहणार आहे. विधानसभेतील यशानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आपल्या शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करतील. त्यासाठी सध्या ठाकरे गटात असलेल्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे त्यांचे प्रयत्न राहतील.

मनसेची भूमिका कितपत महत्त्वाची?

विधानसभा निवडणुकीत मनसेला राज्यभरात एकही जागा जिंकता आली नाही. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पहिल्याच निवडणुकीत माहीममधून् पराभव पहावा लागला. शिवाय ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मुंबईत अन्यत्रही मनसेचे उमेदवार प्रभाव पाडू शकले नाहीत. मात्र, मनसेच्या उमेदवारांचा फायदा ठाकरे गटाला झाल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांनी निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रामुख्याने लक्ष्य केले. त्यांची भूमिका महायुतीला अनुकूल राहिली. मात्र, वरळी, माहीम, जोगेश्वरी पूर्व, विक्रोळी, दिंडोशी, वर्सोवा, कलिना याठिकाणी मनसेच्या उमेदवारांमुळे महायुतीच्या उमेदवारांना फटका बसल्याचे पाहायला मिळाले. आता महापालिका निवडणुकीत मनसे काय भूमिका घेते, यावर मुंबईतील राजकीय समीकरणे बदलू शकतील.

Story img Loader