इंद्रायणी नार्वेकर

दरवर्षी पावसाळ्यात केल्या जाणाऱ्या नालेसफाईवरून नेहमीच राजकीय वाद होतात. पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबले की नालेसफाईच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. सत्ताधारी पक्षावर टीका होते आणि विरोधकांना आयते कोलित मिळते. मात्र पालिकेची मुदत संपल्यामुळे यंदाही प्रशासकीय राजवटीत नालेसफाई होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही नालेसफाईवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. मुंबईतील नालेसफाईला भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या इतके महत्त्व का आहे, याबाबतचे हे विश्लेषण!

Pune Municipal Corporation cleanliness drive on pedestrian bridges Pune news
अडलेले ‘पाऊल’ पडले पुढे! पादचारी पूल आवश्यक ठिकाणीच; असलेल्या पुलांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
municipal administration launched Kacharamukt Tas campaign
कचरामुक्त तास मोहिमेतून ६४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन, १ हजार ४३९ कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?

नालेसफाईची आवश्यकता कशासाठी?

मुंबईला चारही बाजूने समुद्राने वेढले असून मुंबईचा बराचसा भाग हा खोलगट बशीसारखा सखल आहे. त्यातच मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्यजल वाहिन्यांचे जाळे स्वच्छ असणे महत्त्वाचे आहेत. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले आणि १५०८ छोटे नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २००० किमी लांबीची गटारे, पाच नद्या यातून पावसाचे पाणी समुद्रात जात असते. मात्र नाले, गटारे यामध्ये वर्षभर समुद्रातून येणारा व आजूबाजूच्या वस्त्यांमधून टाकला जाणारा कचरा, त्याचबरोबर प्लास्टिक, गाद्या, उशा, लाकडी सामान असा वाटेल तो ऐवज टाकला जातो. त्यामुळे नाले तुंबतात. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी हा गाळ काढणे आवश्यक असते. त्यामुळे पालिका दरवर्षी नदी व नाल्यातील गाळ काढण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचे कंत्राट देत असते.

विश्लेषण: मुद्रांकाच्या काही हजार कोटींच्या महसुलावर पाणी?

किती गाळ काढला जातो?

मुंबईतील विविध लहान व मोठ्या नाल्यांसह पेटीका नाले तसेच रस्त्यांलगतच्या गटारांची साफसफाई या नालेसफाईत अंतर्भूत असते. नदी नाल्यांमधून साचलेला गाळ हा दरवर्षी पावसाळ्यापूर्वी काढून क्षेपणभूमीवर वाहून नेला जातो. मोठ्या नाल्यातून जवळपास ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन एवढा गाळ काढला जातो. एकूणच जवळपास साडेनऊ लाख मेट्रिक टन गाळ काढून मुंबई बाहेरील क्षेपणभूमीवर नेण्यात येतो. एकूण गाळापैकी ७५ ते ८० टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो तर १० टक्के गाळ पावसाळ्यात आणि १० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढला जातो.

गाळ काढण्याचे उद्दिष्ट कसे ठरते?

पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा आढावा घेऊन दरवर्षी नाल्यांमधून गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते. मात्र एखाद्या नाल्यात १ मीटर उंचीपर्यंत गाळ असेल तर तो सगळा काढून टाकला जात नाही. त्यापैकी केवळ १५ सेंमीपर्यंत गाळ काढला जातो. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास मदत होते. सगळा गाळ काढणे हे खूप वेळखाऊ आणि प्रचंड खर्चिक असल्यामुळे केवळ पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील इतका गाळ काढला जातो.

गाळ काढल्यानंतरही कचरा कसा काय साचतो?

नालेसफाई केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून भरतीबरोबर येणारा कचरा आणि झोपडपट्ट्यांमधून टाकला जाणारा कचरा यामुळे पुन्हा कचरा तरंगताना दिसतो. त्यामुळेही अनेकदा टीका होत असते. कधीकधी नाल्याच्या काठावर सुकवण्यासाठी ठेवलेला गाळ तसाच पडून असतो आणि पाऊस पडला की हा गाळ पुन्हा वाहून नाल्यात जातो. असेही प्रकार कंत्राटदारांच्या बेफिकीरीमुळे घडतात.

नालेसफाईवर लक्ष कसे ठेवले जाते?

नालेसफाईच्या कामात अनेकदा घोटाळे झाल्याचे उघडकीस आले आहे. उद्दिष्टाइतका गाळच न काढणे, गाळात बांधकामाचा राडारोडा मिसळणे असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पालिकेने आता नालेसफाईवर लक्ष ठेवण्यासाठी गेल्या वर्षीपासून खास यंत्रणा उभी केली आहे. गाळ वाहून नेणाऱ्या डंपरवर व्हीटीएस यंत्रणा जोडली जाणार आहे. ही यंत्रणा पालिकेच्या सर्व्हरला जोडली जाणार आहे. क्षेपणभूमीवर सीसीटीव्ही बसवणे, डंपर रिकामा करतानाचे चलतचित्र काढणे, रिकाम्या डंपरचे वजन करणे अशा अटी यावेळीही समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

विश्लेषण: रोजगाराचे हमी दर वाढूनही स्थलांतर सुरूच… असे का होते?

महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रत्येक नागरिकाला आपल्या विभागामधील नाल्याची गाळ काढून स्वच्छता कशी केली जाते, ते सहजपणे मोबाईलद्वारेदेखील पाहता येणार आहे. विभागातील विविध नाल्‍यांची तपशीलवार माहिती, प्रत्येक नाल्यामधून काढलेल्या व वाहून नेलेल्या गाळाचा तपशील, गाळ वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनाचा छायाचित्रांसह तपशील आणि नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरू असतानाची छायाचित्रे, दृश्‍य चित्रफीत नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार व सुलभरित्या दररोज पाहता येणार आहे.

दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणाऱ्या डंपर वाहनांच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे ही सर्व जबाबदारी कंत्राटदारांना पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या जवळच्या नाल्यातील गाळ किती काढला याची तंतोतंत माहिती डॅशबोर्ड स्वरूपात संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

विश्लेषण: मुंब्रा बाह्यवळण मार्गाचे रडगाणे कधी संपणार व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गाची ही अवस्था का?

नालेसफाईचा एकूण खर्च किती?

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी केल्या जाणाऱ्या नालेसफाईसाठी यंदा २२६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मोठ्या नाल्यासाठी ९० कोटी, छोट्या नाल्यांसाठी ९० कोटी आणि सुमारे २० किमी लांबीच्या मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या अवाढव्य खर्चामुळेच हा नालेसफाई हा मुद्दा राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरला आहे.

Story img Loader