कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई अमेरिकेत लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. लॉरेन्सचा बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई त्यांच्या देशात असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना दिली आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कारवाया रोखण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना मदत मिळेल. मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी विचारणा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, गेल्या महिन्यात गुन्हे शाखेने त्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाला सांगितले की, त्यांनी सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणासंदर्भात अनमोलच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची योजना आखली आहे. कोण आहे अनमोल बिश्नोई? जाणून घेऊ.
कोण आहे अनमोल बिश्नोई?
कुख्यात गुंड अनमोल बिश्नोई ऊर्फ भानू हा लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) गुन्हा दाखल केलेल्या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात तुरुंगात आहे. पंजाबच्या फाजिल्का येथील रहिवासी असलेला अनमोल बिश्नोई लविंदर सिंग आणि सुनीता बिश्नोई यांचा मुलगा आहे. त्याचा पुतण्या सचिन बिश्नोई हाही बेकायदा कामात सहभागी असल्याचे समजते. किशोरवयीन असताना त्याचा खंडणी आणि चोरीसह किरकोळ गुन्ह्यांमध्ये सहभाग राहिला आहे. जसजसे त्याचे वय वाढले तसतसा त्याचा गंभीर गुन्ह्यांतील सहभागही वाढला.
हेही वाचा : शरीरात शिरून मांस खाणारा ‘झोंबी फंगस’ काय आहे? नवीन अभ्यासात संशोधकांना काय आढळले?
अनमोल बिश्नोई याने नेपाळमधील एका व्यावसायिकाकडून बॉम्ब बनवण्याच्या पद्धती शिकून घेतल्या. हा त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीतील एक टर्निंग पॉईंट होता. २९ मे २०२२ रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गोळ्या घालून ठार केल्या गेलेल्या गायक-राजकारणी सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचा आणि मुसेवाला याची हत्या करणाऱ्यांना शस्त्रे व रसद पुरवल्याचा आरोप आहे. एप्रिलमध्ये अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणासह टोळीच्या मोठ्या कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. ‘एनआयए’ने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, अनमोलचे नेमबाज विकी गुप्ता व सागर पाल यांच्याबरोबर नऊ मिनिटे बोलणे झाले आणि अनमोलने त्यांना सांगितले की, एक नवा इतिहास रचला जात आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्येही त्याचे नाव समोर आले होते. अनमोलचे त्या नेत्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींशी बोलणे झाल्याची माहिती आहे. हत्येनंतर काही वेळातच उत्तर प्रदेशचा धर्मराज कश्यप आणि हरियाणाचा गुरमेल बलजीत सिंग या दोन बंदूकधाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले; परंतु उत्तर प्रदेशातील शिवकुमार गौतम अजूनही फरारी आहे. अनमोलवर १८ गुन्हेगारी खटले दाखल आहेत आणि त्याने जोधपूर तुरुंगात शिक्षाही भोगली आहे. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. तो सध्या फरारी असून, त्याची ठिकाणे बदलत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी तो केनियामध्ये दिसला होता. गेल्या आठवड्यात ‘एनआयए’ने अनमोलवर १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
अमेरिकेचा इशारा
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या म्हणण्यानुसार, आरोपपत्रात अनमोलला वाँटेड आरोपी म्हणून सूचीबद्ध करण्यात आल्यावर रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी करण्यात आली होती. “आरसीएनच्या आधारे, यूएस अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी आमच्याशी संपर्क साधला आणि अनमोलच्या अमेरिकेतील उपस्थितीबद्दल आम्हाला सतर्क केले,” असे अधिकाऱ्याने वर्तमानपत्रांना सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या क्षणी अनमोलला अमेरिकन पोलिसांनी ताब्यात घेतले की नाही ते स्पष्ट झालेले नाही; परंतु तो अमेरिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने मागील महिन्यात सादर केलेल्या विविध अर्जांच्या उत्तरात आवश्यक कागदपत्रांवर प्रक्रिया करण्यास पोलिसांना परवानगी दिली आहे. गृह मंत्रालयाला कागदपत्रे मिळाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालय अमेरिकी अधिकाऱ्यांशी समन्वय साधेल. प्रत्यार्पणाची प्रक्रिया मान्य झाल्यास, त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले जाईल.
हेही वाचा : हुकूमशाह किम जोंग उनने केली जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्राची चाचणी? काय आहे उत्तर कोरियाकडील आयसीबीएम?
हे महत्त्वाचे का मानले जातेय?
गेल्या महिन्यात भारताने कॅनडातून आपल्या अधिकार्यांना परत बोलावून घेतले. त्याच्यानंतर काही तासांतच रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी आरोप केला की, भारत सरकारचे काही अधिकारी कॅनडात हिंसाचार भडकवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत काम करीत आहेत. भारताने हे आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत आणि या आरोपांना ‘हास्यास्पद’ म्हणून संबोधले आहे. त्याशिवाय खलिस्तानसमर्थक फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येच्या कथित प्रयत्नासंबंधीच्या प्रकरणात यूएस न्याय विभागाकडून अलीकडेच करण्यात आलेली कारवाई ही अनमोल बिश्नोईविषयीच्या नोटीसला महत्त्व देते.