मुंबईमध्ये वीजपुरवठा अनेक ठिकाणी खंडित झाला आहे. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं आहे. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला आहे. अशाप्रकारे मुंबईत वीजपुरवठा खंडित होण्याचा हा मागील बऱ्याच काळातील पहिलाच प्रकार आहे. मात्र अनेकांना आपल्या घरापर्यंत वीज कशी येते, ग्रीड फेल्युअर म्हणजे काय हे ठाऊक नसतं. मुळात या गोष्टी समजून घेण्यासाठी आधी वीजनिर्मिती क्षेत्राचे काम कसे चालते, वीजनिर्मिती कशी होते हे समजून घेणं गरजेचं आहे.
तुमच्या घरात वीज कशी येते?
तुमच्या घरापर्यंत वीज पोहचवणाऱ्या यंत्रणेमध्ये तीन मुख्य घटक आहेत. वीज निर्माण कऱणाऱ्या कंपन्या. यामध्ये टाटा पॉवर, राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ अर्थात एनटीपीसी यासारख्या आणि इतर कंपन्यांचा समावेश होतो. त्यानंतर येतात वितरक कंपन्या म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) सारख्या राज्य स्तरावरील वितरक कंपन्या. शेवटचा महत्वाचा घटक म्हणजे स्टेट लोड डिस्पॅच सेंटर म्हणजेच एसएलडीसी. एसएलडीसीच्या माध्यमातून वीजनिर्मीती आणि त्याचा पुरवठा यामधील समतोल राखला जातो. “हे म्हणजे विमान, विमानतळ आणि वाहतूक नियंत्रण कक्ष (एटीसी) यासारखे काम आहे. वाहतूक नियंत्रण कक्ष ज्याप्रमाणे विमानांचे उड्डाण आणि लॅण्डीग वेळेवर होण्यासाठी नियंत्रकाचे काम करता तसेच काए एसएलडीसी करतात,” अशी माहिती मनी कंट्रोल या वेबसाईटशी बोलताना गोपाल जैन यांनी एप्रिल २०२० रोजी एका लेखासंदर्भात बोलताना दिली. गोपाल जैन हे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आणि वीज नियंत्रण आणि नियमन प्रकरणांसंदर्भातील सल्लागार सदस्य आहेत.
फ्रिक्वेन्सी किती असावी लागते?
एसएलडीसी हे वीज निर्माती करणाऱ्या कंपन्या आणि वीज वितरक कंपन्यांदरम्यान समन्वय साधण्याचं काम करतात. एखाद्या ग्रीडमध्ये किती वीज पुरवली जावी हे एसएलडीसी मागणीनुसार ठरवते. एका दिवसाचे ९६ भाग केलेले असतात. प्रत्येक भाग हा १५ मिनिटांचा असतो. या ९६ भागांनुसार प्रत्येक राज्यातील एसएलडीसी त्यांचे वेळापत्रक तयार करुन ठेवतात. ही खूप तांत्रिक आणि स्वयंचलित यंत्रणा असते. त्यामुळे वीज निर्मिती आणि वीज वितरण करताना एसएलडीसीची भूमिका महत्वाची असते. पॉवर ग्रीडमध्ये असणाऱ्या वीजेची फ्रिक्वेन्सी ही ४८.५ ते ५१.५ हर्ट्हसमध्ये ठेवण्याची जबाबदारी एसएलडीसीवर असते. जर ही फ्रिक्वेन्सी अचानक वाढली अथवा कमी झाली तर वीजपुरवठा करणाऱ्या लाईन्स ट्रिप होऊ शकतात आणि गोंधळ उडू शकतो, असं सतीश मुखर्जी यांनी सांगितलं. सतीश मुखर्जी हे वीजनिर्मिती आणि वितरण क्षेत्राशी संबंधित वकील आहेत.
२०१२ साली झालेल्या ब्लॅक आऊटदरम्यान असचं झालं होतं. हा जगातील सर्वात मोठा ब्लॅख काऊट होता. यावेळी अचानक विजेची मागणी वाढली आणि ट्रिपिंग झालं. त्यावेळी साठ कोटी भारतीयांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.
१५ मिनिटांचे ९६ भाग
वीजनिर्मिती आणि वीजपुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊन फ्रिक्वेन्सी नियंत्रणात न राहिल्याने लाईन ट्रिप होण्याची शक्यता असते. असं झाल्यास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होतो. भारतामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जाते. यामध्ये थर्मल (औष्णिक), हायड्रो (जलविद्युत) , गॅस, वारा आणि सौरऊर्जा अशा वेगळ्यावेगळ्या माध्यमांचा समावेश आहे. वीजेची मागणी आणि पुरवठा यासाठी वापरण्यात येणाऱ्या दिवसाच्या प्रत्येकी १५ मिनिटं याप्रमाणेच्या ९६ भाग करण्यात येतात. १५ मिनिटांचे हे चक्र एखाद्या ठराविक दिवसासाठी पूर्णपणे बदलता येणं शक्य नसतं.