-मंगल हनवते

रेल्वे स्थानकातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर जाणे प्रवासी तसेच पादचाऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आकाशमार्गिका (स्कायवॉक) प्रकल्प हाती घेतला. वांद्रे पूर्व ते कलानगर असा पहिला स्कायवॉक २००८ मध्ये बांधण्यात आला. त्यानंतर मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे स्थानकाबाहेर एकूण ३६ स्कायवॉक बांधण्यात आले. त्यासाठी तब्बल सातशे कोटी रुपये खर्च केले. चांगल्या उद्देशाने एमएमआरडीएने स्कायवॉक बांधले असले तरी नियोजनाअभावी हा प्रकल्प म्हणावा तितका यशस्वी झाला नाही. अनेक स्कायवॉक केवळ लोखंडी सांगाडे झाले आहेत. काही स्कायवॉक हे चोर, गर्दुल्यांचे अड्डे झाले आहेत. मोजक्याच स्कायवॉकचा योग्य आणि १०० टक्के वापर होतो. पहिला स्कायवॉक अशी ओळख असलेला वांद्रे पूर्व येथील स्कायवॉक अल्पावधीतच इतिहासजमा झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्कायवॉक प्रकल्प म्हणजे नेमका काय, हा प्रकल्प का फसला याचा हा आढावा.

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना

स्कायवॉक म्हणजे काय?

स्कायवॉक म्हणजे सोप्या भाषेत हवाईपूल. आकाशमार्ग, स्कायब्रिज अशी नावे यासाठी आहेत. एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत, एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी, रेल्वे स्थानकाहुन मुख्य रस्त्यावर येण्यासाठी स्कायवॉक बांधले जातात. परदेशात अनेक वर्षांपासून असे स्कायवॉक उभे आहेत.

मुंबईत स्कायवॉकची संकल्पना कशी पुढे आली?

राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईतील लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. अशा या मुंबईत रेल्वे प्रवाशांची संख्याही प्रचंड आहे. अनेक रेल्वे स्थानकाबाहेर बस, रिक्षा, टॅक्सीची गर्दी, प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या गर्दीतून वाट काढून मुख्य रस्त्यावर येणे प्रवासी, पादचाऱ्यांसाठी अत्यंत अडचणीचे ठरते. ही बाब लक्षात घेऊन प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठी २००७ मध्ये स्कायवॉकची संकल्पना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) तत्कालीन महानगर आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी पुढे आणली. सॅटीस अर्थात स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम योजनेअंतर्गत मुंबईत स्कायवॉकची संकल्पना प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील अनेक रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ते छोटे असल्याने अशा रेल्वे स्थानकाची निवड करून स्कायवॉक बांधण्याचे एमएमआरडीएने ठरविले. पुढे या निर्णयाची अंमलबजावणी करून मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३६ स्कायवॉक बांधले.

एमएमआरडीएचा स्कायवॉक प्रकल्प नेमका कसा होता?

रेल्वे स्थानक ते मुख्य रस्ते असे स्कायवॉक बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. प्राधिकरणाच्या २८ सप्टेंबर २००७ रोजी झालेल्या ११९ व्या बैठकीत ६०० कोटी रुपये खर्चून २० रेल्वे स्थानकांसाठी स्कायवॉक मंजूर केले. त्यानंतर प्रत्यक्षात स्कायवॉकच्या कामाला सुरुवात करण्यात आली. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कलानगर जंक्शन असा पहिला स्कायवॉक २००८ मध्ये पादचाऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आला. त्यानंतर एमएमआरडीएने ७०० कोटी रुपये खर्च करून एकूण २० ऐवजी ३६ स्कायवॉक बांधले. अगदी दक्षिण मुंबईपासून वसई -विरारपर्यंत, कल्याण- बदलापूरपर्यंत, नवी मुंबईत स्कायवॉक बांधण्यात आले. एमएमआरडीएने ३६ पैकी २८ स्कायवॉक बांधले असून ७ स्कायवॉक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बांधण्यात आले आहेत तर एक कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बांधला आहे. सर्व स्कायवॉक २०१२ पर्यंत बांधून झाले.

मुंबईतील स्कायवॉक महापालिकेकडे हस्तांतरित?

एमएमआरडीएने बांधलेल्या स्कायवॉकपैकी सर्वाधिक स्कायवॉक हे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आहेत. दरम्यान एमएमआरडीए ही नियोजन प्राधिकरण यंत्रणा असल्याने त्यांच्याकडून बांधण्यात येणारे रस्ते, उड्डाणपूल शेवटी महापालिकेकडे हस्तांतरित केले जातात. त्यानुसार २०१२मध्ये मुंबईतील सर्व स्कायवॉक एमएमआरडीएने देखभालीसाठी पालिकेकडे हस्तांतरित केले. तेव्हापासून आजपर्यंत पालिका या स्कायवॉकची देखभाल-दुरुस्ती करत आहे. त्यासाठी वर्षाला हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र त्यांचा वापर फारसा होत नसल्याने आणि दुरुस्ती-देखभालीतच पैसे जात असल्याने स्कायवॉक पालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहेत. 

सातशे कोटी रुपये पाण्यात?

या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही. स्कायवॉकची नेमकी गरज कुठे आहे याचा योग्य अभ्यास न करता ते बांधण्यात आल्याने काही ठराविक स्कायवॉक वगळले तर उर्वरित स्कायवॉकचा पादचाऱ्यांकडून फारसा वापर होत नसल्याचे दिसते. कित्येक स्कायवॉक हे गुन्हेगारांचे अड्डे झाले आहेत. दुसरीकडे स्कायवॉकच्या बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. स्कायवॉकवरील कोबा, पेव्हर ब्लॉक्स उखडले आहेत, लोखंडी सांगाडे गंजले आहेत.

पहिला स्कायवॉक इतिहासजमा का झाला?

मेट्रोच्या कामासाठी वांद्रे पश्चिम येथील स्कायवॉकचा काही भाग पाडावा लागला. वांद्रे-वरळी ते बीकेसी उन्नत रोड प्रकल्पासाठी वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कलानगर स्कायवॉक बंद करून पश्चिम द्रुतगती मार्गावरील भाग पाडण्यात आला आहे. अर्धवट अवस्थेतील हा स्कायवॉक धोकादायक ठरल्याने अखेर तो पाडून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. नियोजनाअभावी कोट्यवधी रुपये खर्च करून उभा करण्यात आलेला एक प्रकल्प दुसऱ्या प्रकल्पासाठी नामशेष करावा लागला. दरम्यान आता पहिल्या स्कायवॉकची दोन टप्प्यात पुनर्बांधणी करण्यात येत आहे. त्यातील एसआरए इमारत ते कलानगर हा टप्पा एमएमआरडीए बांधणार आहे, तर वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते भास्कर न्यायालय या टप्प्याची पुनर्बांधणी पालिका करत आहे. या कामाला सुरुवात झाली आहे. या पुनर्बांधणी केलेल्या स्कायवॉकचा तरी पादचारी वापर करणार का, हे येणाऱ्या काळात समजेल.

Story img Loader