देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने रस्त्यावरील गँगवॉर, दहशतवादी हल्ल्याची भीषणता अनुभवला. कालौघात गुन्ह्यांचे स्वरूप बदलत गेले. पूर्वी खंडणी उकळणारे गुन्हेगार आता सायबर फसवणुकीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची आयुष्यभराची कमाई लुटत आहेत. नुकत्याच सरलेल्या वर्षात (२०२४) मुंबईकरांची तब्बल १२०० कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात सायबर फसवणूक कशी वाढली, त्याविषयी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सायबर फसवणुकीद्वारे किती नुकसान?

शेअर बाजारातील गुंतवणूक, टास्क फसवणूक व डिजिटल अटक यांसारख्या नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करून सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. नोव्हेंबर २०२४ पर्यंत ५५ हजार तक्रारदारांनी सायबर फसणुकीच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत. त्यात अगदी सनदी लेखापाल (सीए), निवृत्त बँक अधिकारी, डॉक्टर यांसारख्या उच्चशिक्षित व्यक्तींचाही समावेश आहे. सायबर फसवणूक करणारे आरोपी सामान्य नागरिकांची आयुष्यभराची कमाई लूटत आहेत. २०२४ मध्ये प्रथमच मुंबईतील सायबर फसवणुकीची रक्कम हजार कोटींवर पोहोचली. मुंबईत नोव्हेंबर २०२४ पर्यंत १,१८१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. नागरिकांची सायबर फसवणुकीतील रक्कम तात्काळ वाचवण्यास मदत व्हावी, यासाठी मुंबई पोलिसांनी मदत क्रमांक १९३० उपलब्ध केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या मदत क्रमांकावर सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दूरध्वनी येऊ लागले आहेत. या हेल्पाईनवर २०२४ मध्ये पाच लाखांहून अधिक तक्रारीचे दूरध्वनी आले आहेत. 

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘एचएमपीव्ही’चा धोका वाढतोय?

प्रचंड वाढ, तरी माफकच रिकव्हरी!

मुंबईतील सायबर फसवणुकीच्या प्रमाणात २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईत नोव्हेंबर २०२३ पर्यंत केवळ २६२ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. मात्र २०२४ नोव्हेंबरपर्यंत त्यात प्रचंड वाढ झाली असून आतापर्यंत सायबर फसवणुकीतील रक्कम १,१८१ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. मुंबई पोलिसांच्या मदत क्रमांकावर २०२३ मध्ये सुमारे ९१ हजार, तर नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाच लाखांहून अधिक दूरध्वनी आले. नोव्हेंबर २०२४ पर्यंत ५५ हजार ७०७ जणांनी सायबर फसवणूक झाल्याची तक्रार केली असून या प्रकरणांमध्ये एकूण ११८१ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी केवळ १२ टक्के म्हणजे १३९ कोटी १५ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. २०२३ मध्ये याच कालावधीत १८ हजार २५६ जणांनी तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणांमध्ये २६२ कोटी ५१ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. त्यापैकी केवळ १० टक्के म्हणजे २६ कोटी ५२ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले होते. ही आकडेवारी पाहता सायबर फसवणुकीतील रक्कम परत मिळण्याचे प्रमाणही फार कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

नेमकी कोणती कारणे? 

सायबर फसवणुकीत पूर्वी परदेशी टोळ्या कार्यारत होत्या. विशेष करून नायजेरियन टोळ्याची त्यात मक्तेदारी होती. सायबर फिशिंगच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचा समावेश होता. पण आता भारतातच अनेक ठिकाणी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमधील सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सायबर फसवणुकीसाठी पूर्वी कुख्यात असलेल्या झारखंडमधील जामताराच्या धर्तीवर देशात अनेक ठिकाणी अशा सराईत टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. फसवणुकीची रक्कम रोखीमध्ये काढून ती विविध व्यवसाय व मालमत्तांमध्ये गुंतवण्यात येत आहे. याशिवाय शहरांमध्ये परदेशी नागरिकांची सायबर फसवणूक करणारे कॉल सेंटर कार्यरत असल्याचे मागील काही कारवाईतून उघड झाले आहे. हे गुन्हे आता सराईतपणे केले जात आहेत. त्यात नागरिकांची गोपनीय माहिती चोरणाऱ्या अथवा मिळवणाऱ्या टोळ्याही कार्यरत आहेत. त्यांच्याकडून नागरिकांची माहिती मिळवून अथवा जाहिरातीद्वारे फसवणूक करण्यात येत आहे. विशेष करून मोबाइल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे व्यवहारांमध्ये नफा झाल्याचे आभासी चित्र उभे केले जाते. दरम्यानच्या काळात ही रक्कम विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाते. अशी बँक खाती असणाऱ्या टोळ्याही कार्यरत आहेत. या टोळ्या बनावट कागदपत्रांद्वारे बँकांमध्ये अशी खाती उघडतात अथवा एखाद्या व्यक्तीचे बँक खाते कमिशन देऊन वापरतात. ही रक्कम अगदी परराज्यांसह आता परदेशातूनही काढण्यात येत आहे. परदेशात काढलेली रक्कम हवाला अथवा कूट चलनात गुंतववण्यात येते. पुढे ती मालमत्तांमध्ये गुंतवण्यात येते. एवढ्या सराईतपणे काम होत असल्यामुळे सायबर फसवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा >>>माणसांमध्ये वेगाने पसरतोय ‘रॅबिट फिव्हर’; काय आहे हा विचित्र आजार? त्याची लक्षणे काय?

गुन्हेगारांकडे कोट्यावधींची माया?

जामतारासारख्या छोट्या गावापासून देशातील अन्य भागांतील टोळ्या सायबर फसवणुकीत सक्रिय आहेत. आता राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी सायबर फसवणूक करण्याऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. सराईतपणे काम करणारे आरोपी कोट्यवधी रुपये कमवत असल्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी माटुंगा पोलिसांनी एका टोळीला अटक केली होती. या टोळीच्या बँक खात्यातून ६० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आरोपींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ती रक्कम ५० बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी गेल्यावर्षी सायबर फसवणुकीप्रकरणी अटक केलेल्या एका आरोपीने त्याच्या गावी पाच कोटी रुपयांची जमीन खरेदी केली होती. सराईतपणे सायबर फसवणूक करण्यात येत असल्यामुळे मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणे अवघड बनले आहे. 

पोलिसांकडून कोणत्या उपाययोजना?

सायबर फसवणुकीतील रक्कम तात्काळ वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांनी मदत क्रमांक १९३० उपलब्ध केला आहे. त्यासाठी सहा अधिकारी व ३० कर्मचारी कार्यरत असतात. सायबर फसवणुकीच्या काही प्रकरणांमध्ये १०० टक्के रक्कम पोलिसांनी वाचवल्याची उदाहरणे आहेत. पण त्यासाठी सायबर पोलिसांचा मदत क्रमांक १९३० अथवा एनसीआरपी पोर्टलवर तात्काळ तक्रार करणे आवश्यक आहे. पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी लागत होता. त्याचा फायदा घेऊन आरोपी बँक खात्यातील रक्कम काढत होते. आता सायबर पोलीस प्रथम संबंधित बँक खात्यात हस्तांतरित झालेल्या रकमेचा व्यवहार थांबवतात. सायबर फसवणूक झाल्यानंतर दोन तासांमध्ये सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास पैसे वाचवणे शक्य होते. पण अल्पावधीत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच सायबर फसवणुकीत सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ६५०० अवैध सीमकार्डे बंद केली आहेत. त्याशिवाय अशी अवैध मोबाइल सिमकार्डे पुरवणाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. पण सायबर फसवणुकीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्याशिवाय या प्रकरणांमध्ये घट होणार नाही.