महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी चार हजार किमीहून अधिक लांबीच्या रस्त्यांचे जाळे विणणार आहे. यापैकी काही किमी लांबीचे रस्ते पूर्ण झाले असून ते वाहतूक सेवेत दाखलही झाले आहेत. तर आता काही रस्ते वाहतूक सेवेत दाखल होणार असून अनेक महत्त्वाकांक्षी रस्त्यांच्या कामाला एमएसआरडीसी २०२५ मध्ये सुरुवात करणार आहे. त्यामुळे नवे वर्ष रस्ते विकासाचे वर्ष असणार असल्याचे म्हटले जात आहे. नव्या वर्षात वाहतुकीसाठी खुले होणार रस्ते कोणते आणि कोणत्या रस्ते प्रकल्पांच्या कामाला सुरुवात होणार याचा घेतलेला हा आढावा…

पाच हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे जाळे

राज्यातील रस्ते विकासाची मुख्य जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) आहे. राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि विविध जिल्ह्यांतील अंतर कमी करून त्यांचा विकास साधण्यासाठी सरकारने राज्यात पाच हजाराहून अधिक किमी लांबीच्या महामार्गांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा महामार्गाद्वारे जोडून प्रवास अतिजलद करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार ५,२६७ किमी लांबीच्या महामार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. एमएसआरडीसी सुमारे ४,२१७ किमी लांबीच्या द्रुतगती म्हामार्गांची कामे करणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) माध्यमातून सुमारे १,०५० किमी लांबीच्या महामार्गांची उभारणी करण्यात येणार आहे. एमएसआरडीसीच्या प्रकल्पात १५ महामार्गांचा समावेश असून यापैकी ९४ किमी लांबीचा मुंबई – पुणे महामार्ग सेवेत दाखल झाला आहे. मुंबई – नागपूर या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून आतापर्यंत यापैकी ६२५ किमी लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. इतर १३ महामार्गांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. महत्त्वाचे म्हणजे २०२५ मध्ये १३ पैकी पाचहून अधिक प्रकल्पांच्या कामाला सुरुवात होणार आहे.

Donald Trump
विश्लेषण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची जागतिक समुदायाला धास्ती का वाटते? शांतता, पर्यावरण, आर्थिक मदतीचे मुद्दे बासनात?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
gold reserves, Dhanteras gold, gold storage, RBI, england
विश्लेषण : १०२ टन सोने इंग्लंडकडून भारताकडे… रिझर्व्ह बँकेच्या ‘सोने वापसी’ निर्णयामागे काय कारण?
bangladesh and pakistan establish military tie up what are implications for india
बांगलादेशच्या भूमीवर पुन्हा पाकिस्तानचे सैन्य… दोन अस्थिर शेजाऱ्यांमधील करार भारतासाठी डोकेदुखी ठरणार?
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

हेही वाचा : गेल्या १५ डावांत एकदा ५०, दोनदा २०… अपयशी रोहितची सिडनी कसोटी अखेरची? कर्णधारपदासाठी दावेदार कोण?

नागपूर – मुंबई प्रवास आठ तासांत?

राज्याची राजधानी मुंबई आणि राज्याची उपराजधानी नागपूर परस्परांना जोडून या दोन्ही महानगरांतील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. एकूण ७०१ किमी लांबीच्या या महामार्गामुळे नागपूर – मुंबई प्रवास १६ तासांऐवजी केवळ आठ तासांत करणे शक्य होणार आहे. या महामार्गाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. यापैकी नागपूर – शिर्डी दरम्यानचा ५२० किमी लांबीचा महामार्ग डिसेंबर २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. त्यानंतर शिर्डी – भरवीर आणि भरवीर – इगतपुरी मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला. सध्या ६२५ किमी लांबीचा नागपूर – इगतपुरी दरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल आहे. या प्रकल्पातील शेवटच्या इगतपुरी – आमणे टप्प्याचे १०० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या या टप्प्यातील कामांवर अखेरचा हात फिरवण्यात येत असून ही कामे फेब्रुवारीअखेरीस पूर्ण होणार आहेत. त्यामुळे मार्चमध्ये इगतपुरी – आमणे टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात समृद्धी महामार्गावरून नागपूर – मुंबई असा थेट प्रवास केवळ आठ तासात करण्याचे प्रवाशी-वाहनचालकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मुंबई – पुणे प्रवासही सुसाट?

मुंबई – नागपूर प्रवास अतिवेगवान करतानाच एमएसआरडीसीने मुंबई – पुणे प्रवास सुकर करण्यासाठी दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. यापैकी एक प्रकल्प म्हणजे मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली – कुसगाव दरम्यानची नवी मार्गिका अर्थात मिसिंग लिंक प्रकल्प. तर दुसरा प्रकल्प म्हणजे ठाणे खाडी पूल ३ प्रकल्प. ठाणे खाडी पूल १ आणि २ वरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी ठाणे खाडी पूल २ ला समांतर असा ठाणे खाडी पूल ३ बांधण्यात येत आहे. १.८३७ किमी लांबीच्या या पुलाची दक्षिणेकडील बाजू (मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी बाजू) सप्टेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली. तर आता मार्चमध्ये उत्तरेकडील (पुण्याहून मुंबईला येणारी) मार्गिकेचे लोकार्पण करून ही बाजू वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. तर मिसिंग लिंकचेही काम वेगात सुरू असून जून २०२५ पर्यंत मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. ही मार्गिका खुली झाल्यास मुंबई – पुणे प्रवासातील २५ मिनिटांचा कालावधी कमी होणार आहे. एकूणच नव्या वर्षात खऱ्या अर्थाने मुंबई – पुणे प्रवास सुकर आणि सुसाट होणार आहे.

हेही वाचा : ‘Ghost Particle’ शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आता समुद्राखाली बसवणार दुर्बिणी; कसं चालणार त्यांचं काम?

पुणे वर्तुळाकार, जालना – नांदेड

नव्या वर्षात मुंबई – नागपूर, मुंबई – पुणे प्रवास अतिवेगवान होणार आहे. तर दुसरीकडे अधिकाधिक नव्या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करून रस्ते विकासाला गती देण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच २०२५ मध्ये पुण्यातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या पुणे वर्तुळाकार रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. या प्रकल्पातील भूसंपादन पूर्ण झाले असून कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकल्पाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जालना – नांदेड द्रुतगती महामार्ग (समृद्धी महामार्ग विस्तारीकरण) प्रकल्पासह नागपूर – चंद्रपूर, भंडारा – गडचिरोली आणि नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्गाच्याही कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे सर्व महामार्ग समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाचा भाग आहेत. या महामार्गांमुळे राज्यातील अनेक भाग, गावे आणि जिल्हे समृद्धी महामार्गाशी जोडले जाणार असून येत्या काळात रस्ते प्रवास सुसाट होणार आहे.

एमएमआरमधील रस्ते विकासालाही गती

एमएसआरडीसीच्या चार हजारांहून अधिक किमी लांबीच्या रस्त्याच्या जाळ्यातील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका. एमएमआरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच विरार – अलिबाग अंतर कमी करण्यासाठी विरार – अलिबागदरम्यान १२६ किमी लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका बांधण्यात येणार आहे. या १२६ किमी लांबीच्या मार्गिकेतील ९८.५० किमी लांबीच्या नवघर – बलवली टप्प्याचे काम एमएसआरडीसी करणार आहे. तर उर्वरित मार्गिकेची बांधणी एनएचएआय करणार आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने पहिल्या टप्प्याच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. सध्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. येत्या काही महिन्यांत भूसंपादन पूर्ण करून याच वर्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. हा प्रकल्प एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Story img Loader