बांगलादेश आणि भारत यांचे सांस्कृतिक संबंध हजारो वर्षांचे आहेत. पण, १९४७ च्या फाळणीनंतर हा भाग भारतापासून विभक्त झाला आणि येथील मूळ संस्कृतीला ओहोटी लागली. कित्येक वर्षांचा भारतीय संस्कृतीचा इतिहास पाशवी मनोवृत्तीच्या विध्वंसांकडून पायदळी तुडवला गेला. बांगलादेशच्या इतिहासात रक्त, अब्रू आणि मूळ संस्कृतीचे पाट कधीच वाहून गेले आणि उरले ते फक्त भग्न अवशेष. आज कारण काहीही असो त्याच इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. बांगलादेशमधील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काही हिंदू मंदिरांवर हल्ल्याच्या बातम्या येत आहेत.

विद्यार्थ्यांचा खडा पहारा

पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशच्या खुलना विभागात असलेल्या मेहेरपूरमधील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली. इस्लामवाद्यांनी नरसिंगडी जिल्ह्यातील कांडीपारा गावात काली माता मंदिरावर देखील हल्ला केला आहे. तर बांगलादेशमधील प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरावर हल्ला होण्याची शक्यता आहे. असे असले तरी रिपब्लिक वर्ल्डने दिलेल्या वृत्तानुसार या मंदिराच्या सुरक्षिततेसाठी सामान्य विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्याच्या बातम्या येत आहेत. पहाटे तीन वाजता ढाकेश्वरी हिंदू मंदिराचे रक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा फोटो समोर आला. इतकेच नाही तर समाज माध्यमांवर इतरही काही हिंदू मंदिरांच्या बाहेर विद्यार्थी पहारा देत असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ढाकेश्वरी या मंदिराचा इतिहास जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरणार आहे.

sambhal and jaunpur mosque row
Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Six Bangladeshi women arrested from Bhiwandi
Bangladeshi women arrested : भिवंडीतून सहा बांगलादेशी महिलांना अटक
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
India Bangladesh relations, Foreign Secretary talks
भारत-बांगलादेश संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेत हिंदूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
TMC MLA Said We Will Build Babri Mosque Again
Humayun Kabir : “पश्चिम बंगालमध्ये नवी बाबरी मशीद बांधणार आणि…”; तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची घोषणा
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

अधिक वाचा: Bangladesh Sheikh Hasina: १९७५ ते २०२४ – मुजीब यांची हत्या ते लष्करी राजवट; बांगलादेशातील राजकारणात लष्कराची भूमिका महत्त्वाची का?

ढोकेश्वरी- राष्ट्रीय मंदिर

ढाकेश्वरी हे बांगलादेशचे राष्ट्रीय मंदिर आहे. बांगलादेश असा एकमेव इस्लामी देश आहे ज्यांच्याकडे राष्ट्रीय मंदिर आहे. ‘राष्ट्रीय मंदिर’ असल्याने हे मंदिर सरकारी मालकीचे आहे. ढाकेश्वरी नावाचा अर्थ ढाक्याची देवी असा होतो. या मंदिराचे महत्त्व हिंदू धर्मात अनन्यसाधारण आहे. हे मंदिर एक शक्तीपीठ आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार देवी सतीने आत्मदहन केल्यानंतर तिच्या शरीराचे अवयव ज्या भागात पडले तेथे शक्ती पिठं तयार झाली. बांगलादेशमध्ये सात शक्तिपीठं आहेत. म्हणजेच एकूण ५१ शक्तिपीठांपैकी ७ शक्तीपीठ ही बांगलादेशात आहेत. ढाकेश्वरी देवीचे मंदिर ज्या ठिकाणी आहे, तेथे देवी सतीच्या मुकुटातील काही रत्न पडल्याचा पौराणिक संदर्भ आहे. या मंदिरातील मूळ मूर्ती येथे नाही. फाळणी दरम्यान हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर येथील मूर्ती पश्चिम बंगालच्या कुमारतुली येथे हलवण्यात आली. बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान १९७१ साली पाकिस्तानी सैन्याने रामना काली मंदिराला उध्वस्त केले. या मंदिरानंतर ढाकेश्वरी मंदिर हे बांगलादेशातील सर्वात महत्त्वाचे हिंदू मंदिर मानले गेले आहे. हे बांगलादेशातील सर्वात मोठे हिंदू मंदिरही आहे.

मंदिराचा इतिहास

या मंदिराचा इतिहास एकेकाळी बंगालवर राज्य करणाऱ्या सेन घराण्याशी जोडला गेला आहे. ढाकेश्वरी (दुर्गा) मंदिर १२ व्या शतकात – इ.स. ११०० मध्ये सेन घराण्यातील राजा बल्लाल सेन याने बांधले होते. राजा बिजॉय सेनच्या राणीने बंधाऱ्यावर स्नान करून परत येत असताना वाटेत बल्लाल सेन नावाच्या एका मुलाला जन्म दिला, जो नंतर सर्वात शक्तिशाली राजांपैकी एक ठरला होता. सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर बल्लाल सेन (इ.स.१२वे शतक) याने त्याचा जन्म झाला त्या ठिकाणी एक मंदिर बांधले, जे ढाकेश्वरी मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. बी.सी. ऍलन (१९१२) यांनी ‘ईस्टर्न बंगाल डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स: डाका ‘मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या लेखात म्हटले आहे की हे मंदिर “बल्लाल सेन यांनी स्थापित केले आणि [नंतर] राजा मानसिंग यांनी पुनर्बांधणी केली, परंतु या [जुन्या] वास्तूचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत आणि सध्याचे मंदिर कंपनीच्या एका सेवकाने सुमारे दोनशे वर्षांपूर्वी उभारले असल्याचे सांगितले जाते.

देवीसाठी विशेष विमान

ढाका शहराचे नाव देवीच्या नावावर ठेवण्यात आले असे मानले जाते. कालपरत्त्वे झालेल्या असंख्य दुरुस्ती, नूतनीकरण आणि पुनर्बांधणीमुळे मूळ मंदिराचा ढाँचा पूर्णतः नवीन आहे. हे मंदिर ढाक्याच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते. सध्या ढाकेश्वरी देवीची मूर्ती कुमारतुली येथे आहे. कुमारतुली हे मातीच्या हस्तनिर्मित वस्तूंसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु या जागेला खरे महत्त्व प्राप्त झाले, ते येथील छोटेखानी मंदिरामुळे. १९४७-४८ नंतरच्या काही दिवसांमध्ये भारताच्या झालेल्या तीन तुकड्यांमधील पूर्वेकडच्या भागाने प्रचंड रक्तपात पाहिला. पूर्व पाकिस्तानच्या (बांगलादेशच्या) या भागातून हिंदूंचे लोंढेच्या लोंढे भारताच्या सीमेकडे जिवाच्या आकांताने धाव घेत होते. १९४८ साली दंगल आणि हिंसाचार अव्याहतपणे सुरू असताना गुप्ततेने एक विशेष विमान अचानक ढाक्यातून कोलकाता येथे आले. या विमानातून नक्की कोण आलं ही उत्सुकता असताना एका विशेष अतिथीने पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला होता. हा अतिथी दुसरा तिसरा कोणी नसून ढाकेश्वरी देवीची मूर्ती होती.

अधिक वाचा: PM Sheikh Hasina Resign Live Updates बांगलादेश संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींनी मांडली भूमिका; म्हणाले, “राष्ट्रीय हितासाठी…”

कुमारतुली येथील मंदिर

देवीच्या या मूर्तीला भारतात आणणे हे सोपे काम नव्हते, या प्रवासासाठी देवीची सोन्याची मूर्ती एका बॉक्समध्ये ठेवली गेली, हा बॉक्स एका सामान्य दिसणाऱ्या सुटकेसमध्ये ठेवला गेला आणि ढाका कस्टम्सचा शोध टाळण्यासाठी तो बॉक्स कपडे आणि वर्तमानपत्रांनी झाकण्यात आला. ही सुटकेस राजेंद्र किशोर तिवारी (मंदिराचे सेवेकरी) यांच्याकडे होती. त्यांच्याबरोबर हरिहर चक्रवर्ती आणि ब्रजेंद्र दुबे होते. कोलकात्यात या मूर्तीला देबेंद्रनाथ चौधरी नावाच्या एका श्रीमंत उद्योगपतीच्या घरी नेण्यात आले, ज्यांच्या कुटुंबाची बंगा लक्ष्मी कॉटन मिल होती. देवीची या नवीन घरात दररोज पूजा केली जात होती, चौधरी कुटुंबाला देखील आदरणीय मातृमूर्तीसाठी नवीन मंदिर बांधण्याची आवश्यकता लक्षात आली. लवकरच देबेंद्रनाथ चौधरी यांनी कुमारतुली येथे जमीन घेतली आणि एक मंदिर बांधले. या मंदिरात १९५० साली ढाकेश्वरी देवीची स्थापना करण्यात आली आणि मंदिराचे नाव ढाकेश्वरी माता मंदिर असे ठेवण्यात आले. ही सुवर्णमूर्ती १.५ फूट उंचीची असून तिच्या हातात दहा शस्त्रास्त्रे आहेत. देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. तिच्या दोन बाजूला लक्ष्मी, सरस्वती, कार्तिकेय आणि गणेश आहेत; तर देवीचे वाहन सिंह आहे. राम आणि हनुमानाच्या दोन वेगळ्या मातीच्या मूर्ती सिंहासनाजवळ उभ्या आहेत. बांगलादेशातील अराजकतेनंतर ढाका आणि ढाकेश्वरी देवी पुन्हा चर्चेत आली!

Story img Loader