सध्या भारताच्या आंतरराष्ट्रीय- राजकीय परिक्षेत्रात मालदीव विरुद्ध भारत असे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचे काही फोटो शेअर करत लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर मालदीवकडून या मुद्द्याचे अवडंबर माजवून प्रसार माध्यमांवर पंतप्रधान मोदी तसेच भारतीय यांच्या विरोधात गरळ ओकण्यात आली. मालदीवच्या सरकारी अधिकाऱ्यांकडून पंतप्रधान मोदी यांची तुलना विदुषकाशी करण्यात आली, तसेच भारतीयांचे राहणीमान, वर्ण अशा अनेक मुद्यांचा वापर करत भारतावर टीका करण्यात आली. त्यामुळे हा मुद्दा केवळ मालदीव विरुद्ध लक्षद्वीप स्पर्धा असा न राहता, भारतीयांविषयी असणाऱ्या वंश- वर्णद्वेषी भावना देखील या निमित्ताने उघड झाल्या.

हे केवळ मालदीवकडून झाले असे नाही, तर गेल्या काही वर्षांमध्ये आशियातील अनेक राष्ट्रांकडून भारतीयांना अशा स्वरूपाची वागणूक मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. भारत हा आशियातील एक महत्त्वपूर्ण देश आहे. आजपर्यंत आपण पाश्चिमात्य देशात वर्ण- वंश द्वेषाची भावना प्रबळ असल्याचे पाहिले. काळे-गोरे असा वाद तर अनेक शतकांचा संघर्ष आहे. याबाबतीत आशियातील देशांची नावे फार क्वचित प्रसंगी घेतली जात होती. आशियातील अनेक देश वसाहतवादाच्या कालखंडात पाश्चिमात्य देशांच्या गुलामगिरीच्या जोखडात बंदिस्त होते. भारताने जे भोगले, त्याहीपेक्षा जास्त वेदना अनेक देशांच्या वाट्याला आल्या यासाठी इतिहास साक्ष आहे. असे असताना आज याच देशांकडून भारतीयांच्या बाबतीत जे काही घडत आहे ते चकीत करणारे आहेत. याच यादीत सध्या दक्षिण कोरियाचे नाव अग्रेसर आहे. दक्षिण कोरिया सारख्या देशाकडूनही भारतीयांना वर्णद्वेषी वागणूक दिली जाते, याविषयी भारतात आजही अनभिज्ञताच अधिक आहे.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
nikki tamboli trolled over bold video
बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळी ‘त्या’ बोल्ड व्हिडीओमुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, “ही आपली संस्कृती नाही”
Sanjay Rauts statement protested by Thane Small Scale Industries Association
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा ‘टिसा’कडून निषेध
Ricky Ponting Hits Back at Gautam Gambhir over Virat Kohli Form Remarks Said He is quite a prickly character
Ricky Ponting on Gautam Gambhir: “स्वभावच इतका चिडचिडा…”, गौतम गंभीरबाबत रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य, विराट कोहलीच्या फॉर्मवरून रंगला वाद
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता

अधिक वाचा: विद्यार्थी आंदोलनमुळे गुजरातमधील ‘त्यां’ची सत्ता गेली, नेमके काय घडले होते?

अलीकडच्या वर्षांत, दक्षिण कोरियन संस्कृतीने जगाला भुरळ घातली आहे, त्यांचा के- ड्रामा, स्वादिष्ट पाककृती, पॉप म्युजिक आणि वेगळे सौंदर्यशास्त्र यासाठी व्यापक आकर्षण निर्माण झाले आहे. कोरियन पॉप संस्कृतीच्या जागतिक उन्मादामुळे, संगीतापासून फॅशनपर्यंत, भारतामध्येही त्याविषयी प्रचंड रस निर्माण झाला आहे. याचीच प्रचिती देणारा एक प्रसंग नुकताच तामिळनाडूमध्ये घडला ‘BTS बँड’ला भेटण्यासाठी तीन अल्पवयीन मुलींनी घर सोडले. तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यातील या तीनही मुलींचे वय १३ वर्ष असल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील या तीन अल्पवयीन मुली बीटीएसच्या चाहत्या आहेत. त्यांनी बँडमधील तरुणांना भेटण्यासाठी कुणाच्याही नकळत घर सोडले. यासाठी त्यांनी महिन्याभरापूर्वीच नियोजन केले होते. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे पोहचण्यासाठी प्रवास खर्च म्हणून १४ हजार रुपये गोळा केले, आपल्या गावातून चेन्नई आणि मग चेन्नईतून ट्रेनच्या माध्यमातून विशाखापट्टनमला पोहोचायचे. तिथून समुद्रामार्गे दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला प्रवास करायचा अशी योजना या मुलींनी तयार केली होती. “या तीनही मुली निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. एका मुलीची आई ग्रामपंचायतीच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. दुसऱ्या मुलीचे वडील दिव्यांग आहेत, तर तिसऱ्या मुलीचे पालक शेतमजूर आहेत. पोलिसांच्या सतर्कततेमुळे मुलींना ताब्यात घेण्यात यश आले आहे. यासारख्या अनेक घटना रोज भारतात घडत आहेत, काही प्रसिद्धीस पावतात तर अनेक गोष्टींचा मागमूसही लागत नाही. यातूनच भारतात दक्षिण कोरियन मनोरंजन विश्वासाठीचे आकर्षण किती आहे याची प्रचिती येते. कुठलीही कला वाईट नाहीच, परंतु एखाद्या गोष्टीचे किती वेड असावे हाही मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवाय समोरच्या देशाकडून आपल्यासाठीच्या भावना काय आहेत हे जाणून घेणेही महत्त्वाचे ठरते. सध्या दक्षिण कोरियातून येणाऱ्या झेनोफोबिया आणि वंशविद्वेषाच्या बातम्या, विशेषत: भारतीयांविषयीच्या बातम्या चिंता वाढविणाऱ्या आहेत.

के-ड्रामा आणि कोरियन सौंदर्यशास्त्राच्या चकचकीत जगाच्या पलीकडे भेदभावाचे एक कठोर वास्तव आहे, ज्याकडे अनेकदा लक्ष दिले जात नाही. जगभरात कोरियन संस्कृतीचे कौतुक मोठ्या प्रमाणात केले जाते; असे असूनही भारतीयांबरोबर जगातील काही वांशिक गटांविरुद्ध भेदभाव हा दक्षिण कोरियामध्ये होत असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अलीकडच्या व्हिडिओंनी या समस्येवर प्रकाश टाकला आहे. यु-ट्यूब वरील अनेक भारतीयांनी वर्णभेद दर्शविणाऱ्या व्हिडीओजच्या माध्यमातून दक्षिण कोरियातील भारतीयांना भेडसावणाऱ्या वर्णद्वेषाच्या घटनांकडे लक्ष वेधले आहे.

सेऊल हे कोरियातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. भारतातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी तिथे जातात. अनेकांनी या शहरात त्यांना आलेले अनुभव शेअर केलेले आहेत. तसेच भेदभावाच्या घटनांची कबुली दिली आहे, तर काहींनी या घटनांबरोबरीनेच स्थानिकांकडून मिळालेला दयाळूपणा आणि पाठिंबा देखील अधोरेखित केला आहे. इतकेच नाही तर अनेकांनी या व्हिडीओजच्या खाली आपल्याला आलेले अशाच स्वरूपाचे अनुभव नमूद केले आहे. यातून या प्रकरणातील भीषणता लक्षात येणारी आहे.

भारतीयांना भेडसावणारे भेदभावाचे प्रकार

दक्षिण कोरियामध्ये जगातील इतर काही नागरी समूहांसह भारतीयांना विविध प्रकारच्या भेदभावांना सामोरे जावे लागले आहे. शहरातील नाईट क्लब्सच्या बाहेर इस्लामी आणि हिंदूंना प्रवेश निषिद्ध असे फलक लावण्यात आले आहेत. जिथे असे फलक नाहीत, तेथे राष्ट्रीयत्त्व जाणून घेऊन नंतर प्रवेश नाकारण्यात येतो. लोकप्रिय यूट्यूबर निकिता ठाकूर यांनी अलीकडेच दक्षिण कोरियामधील वर्णद्वेषाचा प्रकार चर्चेत आणला आहे. ठाकूर यांचा व्हिडिओ या देशातील भारतीयांना भेडसावणाऱ्या भेदभावावर प्रकाश टाकतो, ज्यामुळे अनेक परदेशी, विशेषत: हिंदू आणि मुस्लिम बळी पडतात असे अस्वस्थ करणारे वास्तव उघड केले आहे. एका धक्कादायक अहवालात १० पैकी ७ व्यक्तींना अशा प्रकारचे वांशिक पूर्वग्रह सहन करावे लागल्याचे उघड झाले आहे. भारतीय वंशाच्या व्यक्तींना समाजात अस्पृश्य किंवा बहिष्कृत असल्यासारखे वागवले जाते. इतकेच नाही तर भारतीयांचा स्पर्शही त्यांना नकोसा वाटतो, एका विद्यार्थिनीने कपड्यांच्या दुकानातील प्रसंग सांगितला आहे,ज्या वेळेस ती कपडे घेण्यासाठी गेली, त्यावेळस दुकानदार/ व्यवस्थापकाने तत्काळ येवून कपडे झाडले / स्वच्छ केले. तर एका मुलीने आपल्या शिक्षिका असलेल्या मैत्रिणीचा अनुभव सांगितला, वर्गातील कोरियन विद्यार्थ्यांनी भारतीय मळकट असतात म्हणून त्यांना ते आवडत नसल्याचे सांगितले. एकूणच परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येते.

अधिक वाचा: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला नेपाळी अध्यात्मिक गुरू ‘बुद्ध बॉय’ कोण आहे?

भारतीयांविरुद्ध वर्णद्वेषाची मुळे

दक्षिण कोरियातील भारतीयांविरुद्धच्या वर्णद्वेषाची मुळे त्यांच्या संस्कृतीत अंतर्भूत असलेल्या कठोर सौंदर्य मानकांमध्ये शोधली जाऊ शकतात. फिकट गुलाबी, पारदर्शक त्वचा आणि काटक अंगकाठी ही सौंदर्याची मानांकने कोरियात आहेत. भारतीय या सगळ्या मानांकनाचे पालन करत नाही. जगातील सर्वात जास्त प्लास्टिक सर्जरीज दक्षिण कोरियात होतात, तरुण दिसण्याच्या आणि काचेसारख्या पारदर्शक त्वचेच्या हव्यासापोटी या शस्त्रकिया होत असल्याचे निदर्शनास आले आहे. किंबहुना त्यांच्या सौंदर्याच्या मानांकनामध्ये डोळ्याच्या पापण्या कापणे हेही समाविष्ट आहे. इतकेच नाही तर हे सौंदर्यपूर्ण लक्षण असल्यासच नोकरी मिळते. या सौंदर्य मानकांचे व्यापक स्वरूप खाजगी संस्थांपुरते मर्यादित नाही; सार्वजनिक संस्था देखील शारीरिक स्वरूपावर आधारित वरवरच्या आवश्यकतांचे पालन करतात, उमेदवाराच्या सौंदर्याला अधिक प्राधान्य देतात. शिवाय, कोरियन लोकांच्या भारतीयांबद्दलच्या संतापाचे अजून एक कारण म्हणजे बरेच भारतीय दक्षिण कोरियात (त्यांच्या दृष्टिकोनातून असलेली) कमी दर्जाची कामे करतात, ही भावना स्थानिक लोकांमध्ये भारतीयांविषयीचा अनादर वाढवते. सौंदर्य मानके आणि व्यावसायिक भूमिकांबद्दलच्या रूढीवादी भावना भारतीयांबद्दलच्या द्वेषाला कारणीभूत आहे.

वर्णद्वेष रोखण्यासाठी कोरियन सरकारने काय केले?

वर्णद्वेषाला आळा घालण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अडथळे येत आहेत. २०१६ मध्ये, अशा समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने एक भेदभाव विरोधी विधेयक प्रस्तावित करण्यात आले होते परंतु यासाठी मोठ्या व्यवसाय आणि कर्मचारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. सरतेशेवटी, हे विधेयक नाकारण्यात आले, जे वर्णद्वेषाच्या विरोधात कायदेशीर उपाययोजना करण्याच्या अनिच्छेचे संकेत देणारे होते. हे वगळता सध्या तरी इतर कोणतेही यश कोरियन सरकारला आलेले दिसत नाही. मालदीवमध्ये झालेल्या वर्णद्वेषी टीकेनंतर आता दक्षिण कोरियातील वर्षद्वेषावरही तेवढीच चर्चा होईल अशी आशा कोरियातील भारतीय नागरिकांना आहे.