महिंद राजपक्षे यांचे ३८ वर्षीय सुपुत्र नमल राजपक्षे हे पुढील महिन्यात श्रीलंकेमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत. महिंद राजपक्षे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. ६ ऑगस्ट रोजी श्रीलंका पोडुजाना पेरामुना (SLPP) या पक्षाकडून नमल राजपक्षे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. २१ सप्टेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. २०२२ साली आर्थिक दिवाळखोरीमुळे श्रीलंका डबघाईला आला होता. महिंद राजपक्षे यांचे बंधू गोटाबाया राजपक्षे हे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना श्रीलंकेतून पलायन करावे लागले होते. त्या सर्व घटनाक्रमानंतर होणारी ही पहिलीच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. महिंद राजपक्षे यांनी २००५ ते २०१५ या दरम्यान राष्ट्राध्यक्षपद भूषवले आहे. तसेच गोटाबाया राजपक्षे यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते देशाचे पंतप्रधान झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा