Napoleon new movie 2023: गेल्याच आठवड्यात नेपोलियन हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा ऐतिहासिक सत्यघटनेवर अवलंबून असून जो. रिडले स्कॉट यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. त्याच निमित्ताने भारत आणि नेपोलियन यांचा नेमका संबंध काय होता हे जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.
नेपोलियन बोनापार्ट याचे पूर्वेबद्दलचे प्रेम
महत्त्वाकांक्षी नेपोलियन बोनापार्टसाठी, ‘ओरिएंट’ हा लहानपणापासूनच आकर्षणाचा विषय होता. ‘ओरिएंट’ हा लॅटिन शब्द ओरिएन्सपासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘पूर्व’ असा आहे. त्याने पूर्वेबद्दल (भारत आणि भारतीय उपखंड) बरेच काही वाचले होते आणि मॅसेडोनियन सम्राट अलेक्झांडरच्या आशियातील विजयांच्या कौतुकामुळे त्याला अधिक उत्तेजन मिळाले होते. १७९८ सालच्या सुमारास त्याने इजिप्तची मोहीम पार पाडली होती, या मोहिमेदरम्यान त्याला भारताविषयी खरी आवड निर्माण झाली. नेपोलियनला फ्रेंच साम्राज्याचा प्रमुख शत्रू ब्रिटनला धडा शिकवायचा होता तसेच भारतासोबतचा उदयोन्मुख ब्रिटीश व्यापार खंडित करायचा होता. इजिप्तला रवाना होण्याच्या काही काळापूर्वी, त्याने आपल्या डायरेक्टअरला सांगितले होते, “तो इजिप्तचा स्वामी होताच, तो भारतीय राजपुत्रांशी संबंध प्रस्थापित करील आणि त्यांच्यासोबत मिळून ब्रिटिशांवर आणि त्यांच्या ताब्यातील प्रदेशावर हल्ला करील.” विशेषतः टिपू सुलतानच्या सैन्यात सामील होण्यासाठी आणि इंग्रजांना भारतातून हाकलण्यात मदत करण्यास तो उत्सुक होता.
फ्रेंच आणि भारतीय संस्थानिक
या कालखंडात भारतात फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीच्या पाँडिचेरी, माहे, चंदननगर, कराईकल आणि यानॉन येथे व्यापाराच्या निमित्ताने वसाहती होत्या. १७ व्या शतकाच्या पूर्वार्धापासून फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने संस्थानिकांशी संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती, त्यांना राजकीय तसेच सैनिकी मदत पुरविण्यासही सुरुवात केली होती.
फ्रेंच सैनिक (भाडेतत्त्वावर) मुघल सम्राट तसेच इतर प्रादेशिक शासक जसे की हैदराबाद, भोपाळ, पंजाब आणि म्हैसूरचा टिपू सुलतान आदींच्या सैन्यात काम करत होते. परिणामी, इतिहासकार बार्बरा रामुसॅक यांनी त्यांच्या ‘द इंडियन प्रिन्सेस अँड देअर स्टेट्स (२००४)’ या पुस्तकात नमूद केले की, युरोप आणि जगभरातील घटनांचा भारताच्या सामाजिक आणि राजकीय परिदृश्यावर लक्षणीय परिणाम झाला. “उदाहरणार्थ, नेपोलियनच्या आगमनाने भारतातील फ्रेंच स्वारस्य वाढले आणि त्याच्या पराभवामुळे भारतात रोजगार शोधणाऱ्या बेरोजगार फ्रेंच भाडेतत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांची संख्या वाढली.”
नेपोलियनची ब्रिटीश भारताचा ताबा घेण्याची मनसा
इजिप्तमध्ये नेपोलियनला ब्रिटनकडून पराभवाचा सामना करावा लागला, तसेच भारतात टिपू सुलतानाचा १७९९ साली मृत्यू झाला, त्यामुळे ब्रिटीश भारताचा ताबा घेण्याच्या फ्रेंच सम्राटाच्या महत्त्वाकांक्षा थांबल्या नाहीत. नेपोलियनने भारत ताब्यात घेण्यासाठी आखलेल्या अनेक योजना आणि रणनीती त्या काळातील युरोपमधील अनेक वसाहतवादी शक्तींमध्ये, विशेषत: ब्रिटीश, रशियन आणि फ्रेंच यांच्यात चाललेल्या गतिशील प्रादेशिक संघर्षांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या आहेत.
रशियन ऑफर
इजिप्तमधील पराभवानंतर लगेचच, रशियन झार पॉलने नेपोलियनशी संपर्क साधला. हा ‘ग्रेट गेम’चा काळ होता, हा ब्रिटन आणि रशिया यांच्यातील प्रतिस्पर्धेचा काळ मानला जातो, या दोन्ही शक्ती आशियातील बर्याच भागांवर दावा करण्याच्या प्रयत्नात होत्या. १८०१ साली, झारने नेपोलियनला भारतावर संयुक्त आक्रमण करण्याचा तसेच इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनीला कायमचे हाकलून देण्याचा एक गुप्त प्रस्ताव पाठवला. त्यानंतर हा प्रदेश या दोन शक्तींमध्ये विभागला गेला. लेखक रियाझ डीन यांनी त्यांच्या मॅपिंग द ग्रेट गेम: एक्सप्लोरर्स, स्पाईज अँड मॅप्स इन नाईंटीन सेंचुरी एशिया, (२०२०) या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे, “झारचा असा विश्वास होता की ३५,०००ची कॉसॅक फौजे सारख्याच आकाराच्या फ्रेंच सैन्यासह विजयासाठी प्रयत्नशील असेल, कदाचित उग्र तुर्कोमन जमातींच्या काही मदतीमुळे त्यांना वाटेत त्यांच्या मोहिमेत सामील होण्यास प्रवृत्त केले जाईल.” रशियन लोक कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेस फ्रेंचांना भेटतील आणि नंतर पर्शिया आणि अफगाणिस्तानमार्गे भारतात प्रवेश करतील अशी योजना होती. झारच्या अंदाजानुसार, या घटनाक्रमाला सुमारे चार महिने लागणार होते. दरम्यान, नेपोलियनने ओरिएंटसाठी त्याच्या महत्त्वाकांक्षेमध्ये आणखी एक संभाव्य साथीदार शोधण्यास सुरुवात केली. हा साथीदार पर्शिया होता, जो त्यानंतर लगेचच फ्रेंच, रशियन आणि ब्रिटीश या तीन साम्राज्य शक्तींमधील कडवट प्रादेशिक संघर्षात सापडला.
अधिक वाचा: Diwali 2023: दिवाळीला ‘भूत चतुर्दशी’ का म्हणतात?
पर्शियाने बजावलेली भूमिका
युरोप आणि भारतीय उपखंडात सामरिकदृष्ट्या वसलेल्या, पर्शियाचे महत्त्व कोणत्याही साम्राज्य शक्तीने नाकारले नाही. नेपोलियनसाठी, पर्शियाला फेंच सैनिकांना भारतात प्रवेश करण्यासाठी शक्य तितके सर्वोत्तम साधन पुरवायचे होते. १८०० पर्यंत, फ्रेंच एजंट्स पर्शियाचा शाह, फतह अली याच्याशी मैत्री करत असल्याची अफवा पसरली होती.
इतिहासकार अमिता दास यांनी नेपोलियनविरुद्ध ब्रिटिश इंडियाचा बचाव (२०१६) या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, १८०० च्या सुरुवातीच्या काळात फ्रेंच हेर आणि एजंटांनी पर्शियामध्ये “प्रथम विविध वेशात आणि नंतर राजनैतिक माध्यमांद्वारे” घुसखोरी केली, पर्शियाकडून फ्रेंच राज्याचा धोका वाढत असल्याचे लक्षात येताच, इंग्रजांनी लवकरच त्यांचे स्वतःचे दूत शहाकडे संबंध प्रथापित करण्यासाठी पाठविण्याचा व तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन जॉन माल्कम हा देखणा तरुण हैदराबादच्या निजामाच्या दरबारात होता , तसेच तो फारसी अस्खलितपणे बोलत होता, इंग्रजांसाठी तो सर्वोत्तम पर्याय ठरला.
जानेवारी १८०१ सालामध्ये, माल्कमने इंग्रजांसाठी पर्शियाशी व्यावसायिक आणि राजकीय करार केला. “फ्रेंच राष्ट्राच्या सैन्याने पर्शियाच्या कोणत्याही बेटांवर किंवा किनार्यावर स्थायिक होण्याचा प्रयत्न केला तर, दोन उच्चकरार करणार्या पक्षांद्वारे संयुक्त सैन्याची नियुक्ती केली जाईल, सहकार्य आणि प्रतिकार हा त्या मागील उद्देश असेल”,असे या करारात नमूद करण्यात आले. अफगाणांनी भारताविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला तर पर्शिया त्यांच्याविरुद्ध युद्धात उतरेल, असे आश्वासनही पर्शियाकडून या करारात देण्यात आले. या कराराने रशियाला सोयीस्कररित्या एकटे पाडले. नेपोलियनने तोपर्यंत स्वतःला फ्रान्सचा सम्राट म्हणून राज्याभिषेक केला होता आणि त्याचा संपूर्ण युरोपला धोका निर्माण झाला. परिस्थिती पाहता, ब्रिटिशांना रशियन लोकांपासून दूर जाण्याची इच्छा नव्हती आणि तरीही त्यांच्यानुसार रशिया हे पर्शियासाठी सर्वात मोठा धोका होते.
एक वर्षानंतर, रशियाने जॉर्जियाचे छोटे स्वतंत्र राज्य आपल्या साम्राज्यास जोडले, हे राज्य पर्शियन लोकांच्या वर्चस्वाखाली होते. १८०४ सालापर्यंत, रशियन आणखी प्रगती करत राहिले आणि त्यांनी सध्याच्या आर्मेनियामधील एरिव्हन शहराचा ताबा घेतला. रशियाच्या सततच्या आक्रमक कृत्यांमुळे अस्वस्थ होऊन शहाने १८०१ च्या करारानुसार ब्रिटनकडे मदत मागितली. या करारात रशियाचा उल्लेख नसल्याचे कारण पुढे करून ब्रिटिशांनी टाळाटाळ केली. परिणामी, फतह अलीकडे मदतीसाठी फ्रान्सकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. १८०४ च्या हिवाळ्यात, एरिव्हनच्या वेशीवर रशियन लोकांशी लढत असताना, त्याने नेपोलियनला एक पत्र लिहिले. १८०५ च्या वसंत ऋतूपर्यंत, नेपोलियनने दोन अनधिकृत दूत पर्शियामध्ये चाचणी घेण्यासाठी पाठवले. १८०७ मध्येच त्यांचा पर्शियाशी अधिकृत करार झाला. फिनकेन्स्टाईनच्या कराराद्वारे, फ्रान्सने पर्शियाला त्याच्या प्रादेशिक अखंडतेची हमी दिली. इरादज अमिनी त्यांच्या ‘नेपोलियन अँड पर्शिया (१९९९)’ या पुस्तकात नमूद करतात, या कराराने “जॉर्जियावरील त्यांचे कायदेशीर हक्क देखील मान्य केले, या प्रदेशातून तसेच इतर सर्व पर्शियन प्रदेशातून, फ्रान्स रशियाला हाकलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.” फ्रान्सने पर्शियाला लष्करी मदत देण्याचे आणि युरोपियन धर्तीवर त्यांचे तोफखाना आणि पायदळ व्यवस्थापित करण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. त्या बदल्यात, पर्शियाने ताबडतोब ब्रिटनबरोबर युद्ध घोषित करण्यास आणि त्यांच्याशी असलेले सर्व राजकीय आणि व्यावसायिक संबंध निलंबित करण्याचे मान्य केले.
अधिक वाचा: ‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे नेमके काय? यापासून स्वत:ला कसे वाचवाल?
याच दरम्यान, फ्रान्सही रशियाबरोबर नेपोलियन युद्धात गुंतला होता. फ्रिडलँडच्या लढाईत रशियाशी शांततेची वाटाघाटी करत असताना फ्रान्सने पर्शियाशी करार केल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनंतर, नेपोलियन आणि झार अलेक्झांडर प्रथमने तिलसित करारावर स्वाक्षरी केली. डीनने आपल्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, या शांतता चर्चेदरम्यान फ्रेंच सम्राटाने “जग जिंकण्यासाठी आणि फूट पाडण्यासाठी (पश्चिम फ्रान्सकडे आणि पूर्व रशियाकडे) सैन्याला एकत्रित करण्याच्या त्याच्या भव्य रचनेवर चर्चा केली”. अमिनी लिहितात, “या कराराद्वारे, नेपोलियन मुख्यतः युरोपचे वर्चस्व सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत होता.
नेपोलियनने झारला असेही सुचवले की ते पर्शियाच्या पाठिंब्याने तुर्कीतून भारताकडे कूच करतील. अलेक्झांडरनेही या योजनेला सहमती दर्शवली आणि त्याने टिप्पणी केली की, “तुम्ही जेवढे इंग्रजांचा तिरस्कार करता तितकाच मी इंग्रजांचा द्वेष करतो आणि त्यांच्याविरुद्धच्या कोणत्याही उपक्रमात तुम्हाला मदत करण्यास तयार आहे.”
फ्रान्स आणि रशिया यांच्यातील या गुप्त करारामुळे केवळ रशियाला दूर ठेवण्याच्या आशेने फ्रेंचांशी हातमिळवणी करणाऱ्या पर्शियन लोकांची खूप गैरसोय होणार, हे नक्की होते. टिलसिटच्या तहाची बातमी एका गुप्तहेराद्वारे ब्रिटीशांपर्यंत पोहोचली. या गुप्त कराराची माहिती शहाला मिळाल्यावर, त्याच्याकडे मदतीसाठी ब्रिटिशांकडे परत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पुन्हा एकदा नवीन करार झाला. इंग्रजांना शाहच्या हिऱ्यांबद्दलच्या आकर्षणाची जाणीव होती आणि त्यांनी त्याला R ११००० किमतीचा हिरा एक भेट म्हणून दिला ज्यामुळे राजाला भूतकाळातील मतभेद विसरून जाण्याची खात्री पटली. ब्रिटीश आणि पर्शियन यांच्यातील नवीन कराराच्या अटींनुसार, परकीय सैन्याला त्यांच्या देशातून भारतात जाऊ देऊ नये, असे ठरले. दुसरीकडे, ब्रिटनने पर्शियाला परकीय शक्तीने आक्रमण केल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले, आक्रमणकर्ता ब्रिटीशांशी मैत्रीपूर्ण अटींवर असला तरीही ते पर्शियाला मदत करतील असे ठरले. शाह, यावेळी, रशियाकडून धोक्याच्या बाबतीत ब्रिटिशांचे समर्थन समाविष्ट करणारे अतिरिक्त कलम सुनिश्चित करण्यात सावध होते. याशिवाय, पर्शियन शासकाने हे देखील सुनिश्चित केले की त्याला त्याच्या सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी ब्रिटीशांच्या मदतीसह दरवर्षी मोठी रक्कम दिली जाईल.
या नवीन करारामुळे नेपोलियनचे भारत ताब्यात घेण्याचे दीर्घकाळचे स्वप्न संपुष्टात आले!