वसईच्या श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशात खळबळ माजली आहे. या हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. २६ वर्षीय श्रद्धाचा तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपी आफताब वारंवार खोटे बोलत असून पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या आरोपीची न्यायालयाच्या परवानगीनंतर नार्को चाचणी केली जाणार आहे.

वसईतील तरुणीच्या हत्या प्रकरणाला नवे वळण; मला घेऊन जा, अथवा ही माझी शेवटची रात्र..

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Worli accident case, Mihir Shah , High Court ,
वरळी अपघात : मिहीर शहावर खुनाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवण्याची मागणी, उच्च न्यायालयाने घेतली दखल
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?

नार्को चाचणी काय आहे?

नार्को चाचणीमध्ये संबंधित व्यक्तीला ‘सोडियम पेंटोथल’चे इंजेक्शन दिले जाते. याला ‘ट्रुथ सिरम’देखील म्हटले जाते. या औषधाच्या परिणामामुळे व्यक्तीला आत्मभान राहत नाही. त्यामुळे ही व्यक्ती कुठल्याही प्रभावाशिवाय अथवा आत्मनिर्बंधाशिवाय बोलू लागते. या इंजेक्शनमुळे व्यक्ती जागरुकता गमावून संमोहनाच्या स्थितीत पोहोचते. अशा परिस्थितीत तपास अधिकाऱ्यांना आरोपीकडून गुन्ह्याबाबत खरी उत्तरं मिळण्याची शक्यता जास्त असते.

चाचणी करताना काय खबरदारी बाळगली जाते?

संबंधित व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आढळल्यानंतरच ही चाचणी केली जाते. या व्यक्तीच्या शरीरात इंजेक्शनद्वारे ‘सोडियम पेंटोथल’ सोडले जाते. या औषधाला ‘थायोपेंटोन’देखील म्हटले जाते. या औषधाचा डोस वय, लिंग आणि इतर वैद्यकीय परिस्थितीवर अवलंबून असतो. हा डोस अचूक असणे आवश्यक आहे. अन्यथा व्यक्तीचा मृत्यू किंवा तो कोमामध्ये जाऊ शकतो. ही चाचणी करताना खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. हे इंजेक्शन दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला काही विशिष्ट प्रश्नच विचारण्याची परवानगी डॉक्टरांकडून दिली जाते.

Shraddha Murder Case: मृतदेहाचे ३५ तुकडे ठेवण्यासाठी आफताबने श्रद्धाच्याच पैशाने विकत घेतलेला फ्रिज?

या चाचणीसाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते?

आरोपीची ‘नार्को’ चाचणी, ‘पोलिग्राफ’ आणि ‘ब्रेन मॅपिंग’ चाचणी बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, काही विशिष्ट फौजदारी प्रकरणांमध्ये संमतीने सुरक्षा उपायांची खबरदारी घेऊन ही चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडून दिली जाते. संबंधित व्यक्तीच्या परवानगीची रेकॉर्डिंग दंडाधिकाऱ्यांकडे तपास अधिकाऱ्यांना सादर करावी लागते. त्यानंतरच या चाचणीची परवानगी न्यायालयाकडून दिली जाते.

नार्को चाचणी १०० टक्के अचूक आहे का?

या चाचणीची अचूकता १०० टक्के नाही. कधीकधी नार्को चाचणीमध्ये संबंधित व्यक्तीने चुकीची विधाने केल्याचे समोर आले आहे. ही चाचणी तपासासाठी वापरली जाणारी एक अवैज्ञानिक पद्धत मानली जाते.

विश्लेषण: श्रद्धा वालकरच्या खुनाने हादरला देश; भारतात लिव्ह इन रिलेशनचे कायदे काय आहेत?

भारतात नार्को चाचणीची सुरुवात कधी झाली?

भारतात पहिल्यांदा २००२ मधील गुजरातच्या गोध्रा हत्याकांडातील आरोपींची नार्को चाचणी करण्यात आली. त्यानंतर तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीची २००३ मध्ये ही चाचणी करण्यात आली. या प्रकरणात नार्को चाचणीचा अहवाल पुरावा म्हणून वापरण्यावर काही जणांकडून शंका निर्माण करण्यात आली होती. निठारी हत्याकांडातील दोन आरोपींचीही गुजरातच्या गांधीनगरमध्ये नार्को चाचणी करण्यात आली होती.

Shraddha Walkar Murder: “आफताबचे ते शब्द ऐकून मी खालीच कोसळलो…”, श्रद्धाच्या वडिलांनी मांडली व्यथा

२००७ मध्ये हैदराबादमधील दुहेरी बॉम्बस्फोट, २०१२ मधील दिल्लीतील उद्योगपती अरुण टिक्कू हत्या प्रकरणात आरोपींची नार्को चाचणी करण्यात आली होती. याशिवाय २०१० मध्ये कुर्लामध्ये अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद अजमेरी शेखची पोलिसांनी नार्को चाचणी केली होती.

Story img Loader