पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामुळे अमेरिका-भारत यांच्यातील संबंध आणखी मजबूत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे मोदींच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना खास भेटवस्तू दिल्या आहेत. विशेष म्हणजे मोदी यांनी बायडेन यांना दिलेल्या एका पेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. या पेटीमध्ये काय आहे? पेटीमध्ये लिहिलेल्या ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो’ याचा अर्थ काय आहे? असे प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी यांनी बायडेन आणि त्यांच्या पत्नीला नेमक्या कोणत्या वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. तसेच बायडेन यांना दिलेल्या पेटीमध्ये नेमके काय आहे? हे जाणून घेऊ या…

बायडेन यांना दिलेल्या भेटीत भारताच्या विविधतेचे दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल बायडेन यांना एक खास हिरा भेट म्हणून दिला आहे. हा हिरा ७.५ कॅरेटचा आहे. तर मोदी यांनी बायडेन यांना भेट म्हणून चंदनाच्या लाकडापासून बनवलेली एक पेटी दिली आहे. या पेटीत वेगवेगळ्या भेटवस्तू आहेत. या भेटवस्तूंच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, भारतातील विविधता, भारतातील कला यांचे दर्शन घडते.

sc judge Sanjeev Khanna verdict on secularism
अन्वयार्थ : ‘सेक्युलर’विरोधात स्वामी, उपाध्याय…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
nda is narendra damodardas ka anushasan
“एनडीए म्हणजे नरेंद्र…”; शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक!
Bhagwant mann
प्रदुषणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री भगवंत मान यांचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “ते युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात, मग…”
delhi court grants bail to satyendar jain
आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना मोठा दिलासा; तब्बल १८ महिन्यांनंतर जामीन मंजूर
natasha awhad post on baba siddique murder
“लॉरेन्स बिश्नोई गँगने माझ्या बाबांनाही…”; बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची पोस्ट चर्चेत!
Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
Arvind Kejriwal
हरियाणातील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आजच्या निकालातून…”

चंदनाच्या पेटीवर लिहिलेले आहे ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो’

मोदी यांनी बायडेन यांनी दिलेली लाकडी पेटी ही म्हैसूरमधील चंदनाच्या लाकडापासून बनवलेली आहे. ही पेटी जयपूरमधील कारागीरांनी तयार केली आहे. पेटीवर ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो’ असे लिहिलेले आहे. ज्या व्यक्तीने एक हजार पौर्णिमेचे चंद्र पाहिलेले आहेत, अशा व्यक्तींना ही खास भेट देण्यात येते. ज्या व्यक्तीचे वय ८० वर्षे ८ महिने आहे, अशांनादेखील ही खास भेट दिली जाते.

बायडेन यांना देण्यात आलेल्या लाकडाच्या पेटीत नेमके काय आहे?

ही पेटी बनवण्यासाठी कर्नाटकमधील म्हैसूर येथून खास चंदन मागवण्यात आले होते. तसेच ही पेटी राजस्थानमधील जयपूर येथील कारागिरांनी तयार केलेली आहे. या पेटीमध्ये एक गणेशमूर्ती आहे. गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात. सर्व देवांच्या अगोदर गणेशाची पूजा केली जाते. ही मूर्ती कोलकाता येथील एका सुवर्णकाराने घडवलेली आहे.

या पेटीमध्ये एक दिवादेखील आहे. दिवा मंदिरामध्ये देवासमोर ठेवण्यात येतो. दिव्याला पवित्रतेचे स्थान असल्यामुळे बायडेन यांना मोदी यांनी पेटीमध्ये दिवादेखील भेट दिला आहे. हा दिवा चांदीचा असून तो कोलकाता येथील कारागिरांनी बनवलेला आहे.

एखाद्या व्यक्तीने पौर्णिमेचे एकूण १ हजार चंद्र पाहिलेले असतील तर वेगवेगळ्या वस्तू दान करण्याची प्रथा आहे. यामध्ये गौदान, भूदान, तिळदान, हिरण्यादान (सोने), अजयदान (तूप), धान्यदान, वस्त्रदान, गुळदान, रौप्यदान (चांदी), लवणदान (मीठ) अशा वस्तू देण्यात येतात.

चांदीचा नारळ, चांदीचा शिक्का अन् बरंच काही

भूदान म्हणून चंदनाच्या लाकडापासून बनवलेली पेटी दिली जाते. हिरण्यदान म्हणून मोदी यांनी बायडेन यांना दिलेल्या पेटीत सोन्याचा शिक्का आहे. या पेटीत ९९.५ टक्के शुद्ध चांदीचा शिक्कादेखील आहे. लवणदान म्हणून या पेटीत गुजरातमधील मीठ ठेवण्यात आलेले आहे. गोदानाचं (गायीचं दान) प्रतीक म्हणून पश्चिम बंगालमधल्या कारागिरांनी घडवलेला चांदीचा नारळ या पेटीमध्ये आहे. तसेच पंजाबमधील तूप, उत्तराखंडमधील तांदूळ, तामिळनाडूचे तीळ, महाराष्ट्राचा गूळ अशा वस्तू या पेटीत ठेवण्यात आलेल्या आहेत.