संजय जाधव

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक झाली आहे. करचुकवेगिरी प्रकरणात त्यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली आहे. नरेश गोयल हे देशाच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात एकेकाळी सर्वांत मोठे नाव होते. मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात गोयलआणि त्यांच्या पत्नी अनिता यांच्याविरोधातील गुन्हा रद्दबातल ठरविला होता. त्याच न्यायालयाने गोयल यांच्या विरोधातील इतर गुन्ह्यांचा तपास करण्याची मुभाही ईडीला दिली होती. अखेर कॅनरा बँकेने गोयल यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली. आधी जेट एअरवेज बुडाली आणि त्यानंतर हा प्रवास गोयल यांच्या अटकेपर्यंत पोहोचला. याची नेमकी कारणे काय?

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात

शून्यातून कशा प्रकारे सुरुवात?

गोयल यांची पार्श्वभूमी तशी मध्यमवर्गीय. त्यांचा जन्म पंजाबमधील संगरूर येथे झाला. पतियाळा येथे त्यांनी वाणिज्य शाखेचे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी दिल्लीत त्यांचे मामा चरणदास रामलाल यांच्या ट्रॅव्हल एजन्सीपासून कामाला सुरुवात केली. तिथे ते रोखपाल होते. काही काळातच ते स्वतंत्रपणे सर्वसाधारण विक्री एजंट (जीएसए) बनले. त्यांनी जगभरातील विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी ओळख निर्माण केली. त्यावेळी १९९० मध्ये जीएसए हे अतिशय ताकदवान होते. ते स्थानिक बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहायचे.

आणखी वाचा-जी-२० परिषदेमध्ये जिनपिंग यांच्या अनुपस्थितीचा अर्थ काय?

जेटची मुहूर्तमेढ कशी रोवली?

महत्त्वाच्या व्यक्तींशी चांगले संबंध ठेवण्याचा हातखंडा गोयल यांच्याकडे होता. इंटरनॅशनल एअर टान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) या संस्थेच्या प्रतिनिधींना ते आग्य्राला घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी या प्रतिनिधींना काही लाखांचे संगमरवरी फर्निचर भेट दिले होते. त्यानंतर झालेल्याअनौपचारिक बैठकीत गोयल यांनी छोटी विमाने खरेदी करण्याची व्यूहरचना या प्रतिनिधींसमवेत आखली होती. जेट एअरवेजची सुरुवात हवाई टॅक्सी सेवा म्हणून १९९३ मध्ये झाली. तिथून ती देशातील सर्वांत मोठी प्रवासी विमान कंपनी बनली. सुरुवातीला कंपनीत कुवेत एअरवेज आणि गल्फ एअर यांचा २० टक्के हिस्सा होता. नंतर या दोन्ही कंपन्या बाहेर पडल्या. कंपनीने २००४ मध्येआंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली. त्यानंतर वर्षभरातच २००५ मध्ये कंपनीने प्रारंभिक समभाग विक्री केली. तोपर्यंत सगळे सुरळीत होते.

नेमकी चूक कुठे झाली?

जेट एअरवेजची प्रतिस्पर्धी कंपनी एअर सहारा गोयल यांनी २००७ मध्ये १ हजार ४५० कोटी रुपयांत विकत घेतली. तेव्हापासून जेट एअरवेज आणि गोयल यांना उतरती कळा लागली. या व्यवहारामुळे जेट एअरवेजसमोर आर्थिक, कायदेशीर आणि मनुष्यबळ विषयक अशा न संपणाऱ्या अडचणी सुरू झाल्या. इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांशी सक्षमपणे स्पर्धा करण्यासाठी जेट एअरवेजकडे पैसे उपलब्ध नसल्याची स्थिती निर्माण झाली. त्याचवेळी प्रारंभिक समभाग विक्रीतून उभारलेला पैसा जेटने विमानांच्या खरेदीवर खर्च केला. विमानाच्या तिकिटांचे दर वाढणे आणि इंधन स्वस्त होणे, यासारख्या बाह्य घटकांवर कंपनी कसेबसे दिवस काढत होती. २०१२मध्ये किंगफिशर बंद पडलीआणि गोयल यांनी दुसरी चूक केली. त्यांनी मोठ्या आकाराची एअरबस ए३३० आणि बोईंग ७७७ ही विमाने घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे कंपनीच्या खर्चात मोठी वाढ झाली. त्याच वेळी आलिशान रचना करण्यासाठी विमानात चारशेऐवजी ३०८ आसनेच ठेवण्याचा अव्यवहार्य निर्णय त्यांनी घेतला.

आणखी वाचा-गुजरातच्या ओबीसी आरक्षणाद्वारे भाजपच्या मतपेढीला बळ?

संकटांची नांदी कुठून?

जेटच्या आर्थिक अडचणी २००८पासून सुरू झाल्या. त्यावेळी जेटने विमाने इतर कंपन्यांना भाड्याने देऊन खर्च भरून काढण्यास सुरुवात केली. कंपनीला पहिला मोठा फटका २०११-१२ मध्ये बसला. अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर गोयल हे कंपनीतील २४ टक्के हिस्सा अबूधाबीची सरकारी विमान कंपनी एतिहादला ३७.९ कोटी डॉलरला विकू शकले. त्यानंतर एतिहादने त्यांच्या १५ अधिकाऱ्यांचे पथक कंपनीचे प्रभावी व्यावसायिकरण करण्यासाठी पाठविले. परंतु, कंपनी आपल्या हातातून सुटत आहे, असे गोयल यांना वाटू लागले. त्यातून हा व्यवहार यशस्वी ठरला नाही. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना विमाने विकण्याची संधीही गोयल यांनी किमतीत घासाघीस करण्याच्या प्रयत्नात घालविली. नंतर ग्राहक मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले. अखेर कंपनीने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये चौथ्या तिमाहीत १ हजार ३६ कोटींचा तोटा नोंदविला. नंतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळणे बंद झाले. अखेर मार्च २०१९ मध्ये कंपनी कर्जदार बँकांच्या ताब्यात गेली. तेव्हापासून ही कंपनी बंद आहे.

गोयल यांना अटक का?

कॅनरा बँकेने जेट एअरवेजविरोधात करचुकवेगिरी प्रकरणी तक्रार केली होती. तब्बल ५३८ कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीचा आरोप करण्यात आला आहे. गोयल, त्यांच्या पत्नी अनिता आणि कंपनीचे काही माजी वरिष्ठ अधिकारी यात आरोपी आहेत. बँकेने जेटला ८४८ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यातील ५३८ कोटी रुपये परत करण्यात आले नाहीत. जेट एअरवेज आणि तिच्या संस्थापकांनी हा पैसा दुसरीकडे वळविल्याचे तपासात समोर आले. अखेर या प्रकरणात गोयल यांना अटक झालीआहे.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader