भारतातील महत्त्वाच्या वकिलांपैकी एक फली एस नरिमन यांचे बुधवारी (२१ फेब्रुवारी) निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फली एस नरिमन यांना वकील म्हणून ७० वर्षांचा अनुभव होता. एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत नरिमन हे देशातील अनेक ऐतिहासिक प्रकरणांचे साक्षीदार राहिले आहेत. गोलकनाथ खटला आणि केशवानंद भारती खटला यांसारख्या ऐतिहासिक न्यायालयीन कामकाजात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्णय दिले होते, ज्यामुळे नागरिकांच्या हक्कांचे रक्षण झाले आणि भारतीय लोकशाहीला हादरे बसण्यापासून वाचवले. नोव्हेंबर १९५० मध्ये नरिमन बॉम्बे बारमध्ये वकील म्हणून रुजू झाले. नरिमन हे त्यांच्या कारकिर्दीत आणि जीवनात नागरी स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेचे कट्टर समर्थक राहिले आहेत. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० प्रकरणी केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या एका स्तंभात नरिमन यांनी लिहिले होते की, सर्वोच्च न्यायालयाचा सध्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या मान्य असेल, परंतु तो घटनात्मकदृष्ट्या योग्य नाही. नरिमन यांच्या काही महत्त्वाच्या प्रकरणातील सहभागाबद्दल जाणून घेऊ यात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा