आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामुळे (आयएसएस) नासाची चिंता वाढली आहे. अनेक वर्षांपासून रशियन-नियंत्रित आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील एका विभागात अनेक वर्षांपासून वायुगळती सुरू आहे. मात्र, आता ही गळती दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता या स्थानकावरील क्रूच्या सुरक्षिततेबद्दल आणि परिभ्रमण प्रयोगशाळेच्या दीर्घकालीन टिकाऊपणाबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहे. या परिस्थितीमुळे रशियन अंतराळ संस्था आणि नासाच्या अधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. नेमके हे प्रकरण काय आहे? ही गळती होण्याचे कारण काय? या गळतीचा काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.

अंतराळ स्थानकातील गळती

वृत्तानुसार, फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाच वर्षांपासून गळती होत आहे. रशियन मॉड्युल झ्वेझदाला डॉकिंग पोर्टशी जोडणाऱ्या बोगद्यात २०१९ मध्ये अधिकाऱ्यांना गळती होत असल्याचे आढळून आले होते. या पोर्टला पुरवठा आणि मालवाहतूक करणारे अवकाशयान जोडले जाते. जुलै २००० मध्ये ‘रोसकॉसमॉस’ने हे मॉड्युल पृथ्वीच्या निम्न कक्षेत लाँच केले होते. ही वायुगळती मोठ्या चिंतेचा विषय मानला जात आहे, कारण- या स्थानकात काम करणाऱ्या अंतराळवीरांना या अंतराळ स्थानकावर सतत दाब आणि श्वास घेण्यायोग्य वायूची आवश्यकता असते. एका निवेदनात, नासाने सांगितले की, भेगा अत्यंत लहान आहेत, त्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत आणि त्यांच्या जवळ पाइपलाइन आहेत; ज्यामुळे ही परिस्थिती आणखीनच अवघड होते. या वर्षी ज्या दराने ही गळती सुरू आहे, तो आतापर्यंतचा सर्वांत जास्त दर आहे. एप्रिल २०२४ पर्यंत दररोज १.७ किलोग्रॅम वेगाने वायू बाहेर पडत आहे.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश
Resolution to grant special status to Jammu and Kashmir approved
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी
Loksatta kutuhal Artificial intelligence and environmental challenges
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरणीय आव्हाने
फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाच वर्षांपासून गळती होत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : डेन्मार्कने जिंकला ७३ व्या मिस युनिव्हर्सचा किताब; ही स्पर्धा कशी सुरू झाली? डोनाल्ड ट्रम्प आणि या स्पर्धेचा संबंध काय?

नासा आणि रोसकॉसमॉसमध्ये मतमतांतर

नासा आणि रोसकॉसमॉस या दोन्ही संस्था अंतराळ स्थानकात सतत होणाऱ्या गळतीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत एकमेकांशी सहमत नाहीत. रशियन मॉड्युलमधील गळतीची कारणे आणि उपायांबद्दलदेखील ते असहमत आहेत. नासाच्या मते या गळतीसाठी दबाव, यांत्रिक ताण, मॉड्युलची भौतिक वैशिष्ट्ये व पर्यावरणाशी संपर्क यांसारख्या अनेक बाबी कारणीभूत आहेत. नासाच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफिसरच्या ताज्या अहवालानुसार, देशाच्या पर्यवेक्षण अधिकाऱ्यांचे असे मानणे आहे की, अंतराळ स्थानकासमोरील ही सर्वांत गंभीर समस्या आहे आणि त्यामुळे क्रूच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. बुधवारी या विषयावरील चर्चेदरम्यान एजन्सीच्या आयएएस सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले नासाचे माजी अंतराळवीर बॉब कबाना यांनी सांगितले की, अंतराळ संस्थेने या गळतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गळती थांबविण्यासाठी काही प्रयत्न केल्यास ही समस्या कमी होऊ शकेल. परंतु, त्यापासून कायमस्वरूपी तोडगा काढता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

नासा आणि रोसकॉसमॉस या दोन्ही संस्था अंतराळ स्थानकात सतत होणाऱ्या गळतीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत एकमेकांशी सहमत नाहीत. (छायाचित्र-रॉयटर्स)

अंतराळ स्थानक सुरक्षित नसल्याचे अमेरिकेचे सांगणे आहे. अमेरिकेने या प्रकरणाचे मूल्यमापन करण्यासाठी रशिया आणि नासातील तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू केली आहे, जेणेकरून त्यांना मूळ कारण निश्चित करण्यात मदत होईल. कॅबाना यांनी सांगितले की, अमेरिकेने आधीच तज्ज्ञांची टीम स्थापन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली असली तरी रशियाने अद्याप याबाबत कोणतीही पाऊले उचलेली नाहीत.’सीएनएन’च्या मते, परिस्थितीच्या तीव्रतेवर वेगवेगळी मते असूनही नासा आणि रोसकॉसमॉस अजूनही मुक्त संवादात आहेत. “आमचे रशियन अंतराळवीर सहकाऱ्यांबरोबर खूप खुले आणि पारदर्शक संबंध आहेत,” असे बॅरेट म्हणाले. नासा आणि रोसकॉसमॉस या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आयएसएस मधील वायुगळतीवर चर्चा करण्यासाठी भेटले. नासाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले की, रोसकॉसमॉसला खात्री आहे की, गळती दर असमंजस पातळीवर पोहोचण्याआधी ते सर्व्हिस मॉड्युलच्या हॅचचे निरीक्षण करण्यास आणि बंद करण्यात सक्षम असतील,” असे अलीकडील वृत्तामध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळल्याने ‘अफ्स्पा’ लागू ; याचा अर्थ काय? भारतीय लष्कराला विशेषाधिकार मिळणार का?

अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर सावधगिरीचे उपाय योजण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गळतीचा भाग नेहमी बंद ठेवणे, जवळच्या डॉकिंग बंदरावर येणाऱ्या अंतराळयानातून माल उतरवण्याकरिता गळतीचा भाग बंद ठेवणे आदी बाबींचा समावेश आहे. नासाचे अंतराळवीर मायकेल बॅरेल अलीकडेच आठ महिने अंतराळात घालवल्यानंतर क्रू-८ मोहिमेतून परत आले होते. त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी सांगितले की, त्यांनी या काळात अमेरिका आणि रशियन भागांना विभाजित करणारी दारे बंद करणे आवश्यक आहे.