अभिषेक तेली

शाळा, महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेचे म्हणजेच एनसीसीचे यंदाचे ७५वे वर्ष आहे. देशाच्या तरुण पिढीमध्ये शिस्त, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, साहसी वृत्ती आणि देशासाठी निःस्वार्थ सेवेचे गुण विकसित करण्याच्या हेतूने या सेनेची स्थापना झाली. एनसीसीच्या कार्याचा आढावा…

Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
upsc exam preparation tips,
यूपीएससीची तयारी : सीसॅट पेपर
Higher Education Policy State University Chancellor Elections
उच्च शैक्षणिक धोरणदशा!
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Reaction from the education sector on UGC NEP implementation proposal pune news
आधी निधी द्या, मग स्वतंत्रपणे मूल्यमापन करा; यूजीसीच्या ‘एनईपी’ अंमलबजावणी प्रस्तावावर शिक्षण क्षेत्रातून प्रतिक्रिया
Kavikulaguru Kalidas Sanskrit University ,
‘या’ विद्यापीठात मिळणार कर्मकांडाचे प्रशिक्षण! उद्देश वाचून थक्क व्हाल…

राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना कशी झाली?

१९४८च्या काश्मीर युद्धाने भारताला महत्त्वाचा धडा शिकवला. सशस्त्र दले सक्षम करण्याची आवश्यकता या युद्धामुळे प्रकर्षाने जाणवली. यानंतर १३ मार्च १९४८ रोजी पंडित एच. एन. कुंजरू यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसी संसदेसमोर ठेवण्यात आल्या. ज्यात लष्करातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पातळीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कॅडेट संघटना स्थापन करण्यात यावी, अशी मुख्य शिफारस करण्यात आली होती. १६ एप्रिल १९४८ रोजी १३ कलमांसह ‘नॅशनल कॅडेट कोअर’ साठी कायदा अस्तित्वात आला. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि शाळा, महाविद्यालयात एनसीसीची पथके उभी राहिली. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे १५ जुलै १९४८ रोजी उदघाटन करण्यात आले.

राष्ट्रीय छात्र सेनेची उद्दिष्टे…

संघटित, प्रशिक्षित आणि प्रेरित तरुणांची पिढी तयार करून त्यांना सर्व क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्यासाठी आणि राष्ट्राच्या सेवेसाठी तयार करणे, हे राष्ट्रीय छात्र सेनेचे पहिले मुख्य उद्दिष्ट आहे. युवकांना सशस्त्र दलात सामील होण्यास प्रवृत्त करण्यासाठी अनुकूल असे वातावरण निर्माण करण्याचा या संस्थेचा प्रयत्न असतो. १२ ऑक्टोबर १९८० रोजी झालेल्या १२व्या केंद्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत राष्ट्रीय छात्र सेनेसाठी ‘एकता आणि शिस्त’ हे ब्रीदवाक्य म्हणून निवडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय छात्र सेनेचा ध्वज कसा आहे?

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विविध तुकड्यांसाठी पहिल्यांदा १९५१ साली ध्वज सादर करण्यात आला. त्यात ध्वज लष्कराच्या विविध दलांच्या ध्वजांचा नमुना, रंग आणि आकाराचा वापर करण्यात आला होता. फरक एवढाच होता की, त्या ध्वजाच्या मध्यभागी राष्ट्रीय छात्र सेनेचा बिल्ला आणि युनिटचे पदनाम रेखाटण्यात आले होते. ध्वज हा कोअरच्या आंतर-सेवा रंगांनुसार असावा. म्हणूनच १९५४मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यमान तिरंगा ध्वज सादर करण्यात आला. ज्यात तीनही लष्करी तुकड्यांच्या सेवा दर्शविल्या आहेत. या ध्वजातील लाल रंग सैन्यदलाचे, निळा रंग नौदलाचे आणि आकाशी रंग हवाई दलाचे प्रतिनिधित्व करतो. ध्वजाच्या मध्यभागी सुवर्णरंगाने लिहिलेली एनसीसी आणि एनसीसी क्रेस्ट ही अक्षरे, ध्वजाला वेगळी ओळख प्राप्त करून देतात.

सध्या राष्ट्रीय छात्र सेनेचे मनुष्यबळ किती?

राष्ट्रीय छात्र सेना ही आता जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना आहे. या संघटनेच्या स्थापनेवेळी वरिष्ठ विभागात ९६ नव्या तुकड्यांचा समावेश करण्यात आला. त्यात एक सशस्त्र लष्करी तुकडी, तीन तोफखाने, पाच अभियंते, दोन लष्करी संप्रेषणाच्या तुकड्या आणि दोन वैद्यकीय व पायदळाच्या ८३ कंपन्यांचा समावेश होता. सुरुवातीला फक्त २०,००० कॅडेट्स राष्ट्रीय छात्र सेनेत सामील झाले होते. सध्याच्या घडीला राष्ट्रीय छात्र सेनेत १३ लाख कॅडेट्स कार्यरत आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेची १७ संचालनालये लष्कर, नौदल आणि हवाई या तीन सेवा गटांमध्ये ८३७ तुकड्यांमध्ये विभागली गेली आहेत. यापैकी ७०० लष्कर, ७३ नौदल आणि ६४ हवाई तुकड्या आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख महासंचालकपद (डीजी) थ्री-स्टार रँकचे अधिकारी करतात. डीजीला दोन-स्टार रँकचे दोन अतिरिक्त महासंचालक (ए आणि बी) (मेजर-जनरल, रिअर-अॅडमिरल किंवा एअर व्हाईस-मार्शल) सहाय्य करतात. पाच ब्रिगेडियर दर्जाचे अधिकारी आणि इतर नागरी अधिकारीही त्यांना मदत करतात. राष्ट्रीय छात्र सेनेचे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे.

आव्हाने काय?

प्रशिक्षित मनुष्यबळ हे या संघटनेसमोरील मोठे आव्हान आहे. शिक्षक हे शाळा, महाविद्यालयाचा कणा असतात. प्रशिक्षित शिक्षकांच्या कमतरतेमुळे ज्युनिअर डिव्हिजन युनिट्सची खूप प्रगती झाली नाही. त्याचप्रमाणे शिक्षक राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी म्हणून काम करण्यास पुढे येत नाहीत. अनेक शाळा शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टीशिवाय रजेसाठी सवलतही देत नाहीत.

राष्ट्रीय छात्र सेना काय करते?

प्रजासत्ताक दिन शिबिर (आरडीसी), एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिरे (सीएटीसी), राष्ट्रीय एकात्मता शिबिर (एनआयसी), अॅडव्हान्स लीडरशिप शिबीर (एएलसी), आर्मी अटॅचमेंट शिबिर, साहसी आणि गिर्यारोहण शिबिर, थल सैनिक शिबिर, वायु सैनिक शिबिर, नौ सैनिक शिबिर, ऑल इंडिया यॉटिंग रेगेटा, रॉक क्लाइंबिंग शिबिर, नौदल उपक्रम, हवाई दल उपक्रम, युवा विनिमय कार्यक्रम, परदेशात तैनात करण्यात शिबिर आयोजित केले जाते. अशा शिबिरांमधून राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना विविधांगी गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते आणि सशस्त्र दलांमध्ये सामील होण्यास सज्ज केले जाते. आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक संकटे यात एनसीसीची पथके मदतीसाठी उभी राहतात. निवडणुका, मोठे उत्सव, कार्यक्रम यासाठी सुरक्षा व्यवस्थेचे मनुष्यबळ कमी पडत असेल तर एनसीसीच्या पथकांची मदत घेतली जाते.

Story img Loader