न्यूज ब्रॉडकास्टर्स डिजिटल असोसिएशनने (NBDA, एनबीडीए) गुगलवरविरोधात दंड थोपटले आहेत. गुगलवर प्रसारित होत असलेल्या बातम्यांमधून मिळणारी कमाई योग्य पद्धतीने दिली जात नसल्याचा आरोप एनबीडीएने केला आहे. एनबीडीए तशी तक्रार कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडे केली आहे. इंडियन न्यूजपेपर सोसायटीनेदेखील (INS) सीसीआयकडे या वर्षी फ्रेब्रुवारी महिन्यात तर डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन (DNPA) गेल्या अशीच एक तक्रार दाखल केलेली आहे. एनबीडीएने दाखल केलेल्या तक्रारीवर आयएनस, आणि डीएनपीए यांच्या तक्रारीसोबतच सुनावणी घेतली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विश्लेषण : सागरी मार्गानेच मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी का होते? देशात कोट्यवधींचे अमली पदार्थ नेमके कुठून येतात?

नेमके प्रकरण काय आहे?

ऑनालाईन वेब सर्च आणि डिजिटल जाहिरात सेवा या दोन्ही विभागात गुगलचे वर्चस्व आहे. कोणतेही वृत्तसंकेतस्थळ हे वेगवेगळ्या जाहिरातींसाठी आपल्या संकेतस्थळावरील जागा देत असते. या जागेच्या बदल्यात वृत्तसंकेतस्थळांना पैसे मिळतात. मात्र गुगलकडून वृत्तसंकेतस्थळांना योग्य मोबदला दिला जात नाही, असा दावा डीएनपीएने केला आहे. वेबसाईटच्या पब्लिर्शना जाहिरातीमधील फक्त ५१ टक्के वाटाच वृत्तसंकेतस्थळांना मिळतो, असा आरोप डीएनपीएने केलेला आहे. या क्षेत्रात गुगलचे वर्चस्व असल्यामुळे पब्लिशर्सना गुगल प्लॅटफॉर्मवर कन्टेंट देण्यास सक्ती करण्यात येते, असेही NBDAने म्हटले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

गुगलविरोधात का तक्रार केली?

एनबीडीएनुसार मागील काही वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने बातम्या वाचणे, पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. याच कारणामुळे ऑनलाईन जाहिरातींमधून मिळणाऱ्या मिळकतीकडे वृत्त समूहांचा ओढा वाढलेला आहे. वेगवेगळ्या न्यूज वेबसाईट्सवरील अर्ध्यापेक्षा जास्त ट्रॅफिक ही गुगल या सर्च इंजिनच्या माध्यमातून येत असते. अल्गोरिथम तसेच अंतर्गत तपासणीच्या माध्यमातून गुगल कोणत्या बातम्यांना प्राधान्य द्यायचे हे ठरवत असते. याच पद्धतीचा वापर करून गुगल वेगवेगळ्या बातम्यांना सर्च रिझल्टमध्ये प्राधान्य देत असते. कोणत्याही वेबसाईटवर भेट देणाऱ्या युजर्सची संख्या ही गुगल सर्व रिझल्टवरच अवलंबून असते. वापरकर्ते कोणत्याही न्यूज वेबसाईटचे पूर्ण यूआरएल टाईप करत बसण्यापेक्षा सर्च इंजिनचा वापर करत असतो. याच कारणामुळे सर्च इंजिनला महत्त्व आलेले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nbda allegation on google related to ad revenue prd
Show comments