मानवी जिज्ञासा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच मग घेतलेल्या शोधांद्वारे वेगवेगळी माहिती समोर येते. अशीच जिज्ञासा मानवाला त्याचा उगम कसा, कुठून झाला, पूर्वज कोण होते याविषयी आहे, आणि त्याबद्द्लचा अभ्यास जगभरात सुरू आहे. ती माहिती, संशोधन काय आहे ते पाहू…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संशोधक कशाबद्द्ल अनुमान काढत आहेत?

जगातील सर्वात वैविध्यपूर्ण लोकसंख्या ही दक्षिण आशियात आहे. भिन्न वांशिक ओळख, भाषा, धर्म, जाती आणि रिती यांचा मिलाफ या भागात राहणाऱ्या १.५ अब्ज लोकांमध्ये जाणवतो. दक्षिण आशियातील आजवरच्या सर्वात मोठ्या आधुनिक जनुकीय विश्लेषणामध्ये – बायोरिक्सिववर गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालात संशोधकांनी भारताच्या इराणी वंशाच्या उत्पत्तीबद्दल आणि इराणी शेतकरी या प्रदेशात केव्हा स्थायिक झाले याबद्दल नवीन तपशील उघड केले आहेत. यात निअँडरथाल आणि डेनिसोव्हन्स या मानवी उत्क्रांतीमधील नरवानरांच्या जनुकांची मोठ्या प्रमाणात विविधता त्यांना आढळली. यापूर्वी भारतात या प्राचीन मानवी पूर्वजांचे कोणतेही जीवाश्म सापडले नसल्यामुळे, ही जनुके तिथे कशी आली याबद्दल संशोधक शक्यता वर्तवत आहेत.

हेही वाचा : किंग्ज सर्कल स्टेशनला नाव देण्यात आलेले तीर्थंकर पार्श्वनाथ कोण आहेत?

भारतीयांचे जनुकीय मूळ कोणते?

जागतिक जनुकीय क्रमनिर्धारण अभ्यासकांचेही भारताकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे, ज्यांच्याबद्दल अजूनही पुरेशी माहिती नाही, असे क्लेमसन विद्यापीठाच्या अनुवंशशास्त्रज्ञ केल्सी विट म्हणतात. म्हणून, आम्ही आशियायी लोकसंख्येबद्दल संशोधन करत आहोत. बहुतेक भारतीय प्रामुख्याने तीन वंशांच्या समूहाचे मिश्रण आहेत. हजारो वर्षांपूर्वीचे शिकारी, इराणी वंशाचे शेतकरी जे ४७०० ते ३००० इसवीसन पूर्व काळात कधीतरी इथे आलेले आणि इसवी सन ३००० नंतर कधीतरी – कदाचित १९०० आणि १५०० दरम्यान प्रदेशात वास्तव्य असणारे असे मध्य युरेशियन प्रदेशातील गुराखी यांचा समावेश आहे.

हेही वाचा : विश्लेषण : स्मॉल-मिडकॅप फंडांच्या भाव तेजीवर सेबीचा आक्षेप काय? या वाढीस ‘बुडबुडा’ का संबोधले?

भारतीयांशी कोणाची जनुके जुळतात?

बर्कलेस्थित कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या लोकसंख्या आनुवंशशास्त्रज्ञ प्रिया मूरजानी व त्यांच्या सहकारी यांनी देखील त्यांच्या अभ्यासात इराणी वंशजांच्या गटांच्या अस्तित्वाचे समर्थन करतात. पूर्वीच्या विश्लेषणाच्या तुलनेत आधुनिक भारतीयांच्या अभ्यास अधिक नमुन्यांचा आधार घेत त्यांनी केला. डायग्नोस्टिक असेसमेंट ऑफ डिमेंशिया (LASI-DAD) मधील माहितीसह मूरजानी यांच्या चमूने २७०० हून अधिक आधुनिक भारतीयांचा अभ्यास केला. यात जवळजवळ प्रत्येक भौगोलिक प्रदेशातील लोक तसेच प्रत्येक प्रमुख भाषा बोलणारे भाषा आणि सर्व जमाती आणि जातीचा अभ्यास यांचा समावेश करण्यात आला. या प्रदेशात हजारो वर्षांपूर्वी प्रवेश केलेल्या इराणशी संबंधित शेतकऱ्यांच्या अस्तित्वाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या संशोधकांनी इराणी वंशाच्या गटाच्या पूर्वीच्या डीएनएचे विश्लेषण केले. सध्याच्या भारतीयांमध्ये कोणाचे जनुके उत्तम जुळतात, हे त्यांनी पडताळले. सध्याच्या ताजिकिस्तानच्या वायव्येला असलेल्या सरझम नावाच्या प्राचीन कृषी उगमस्थानातील शेतकऱ्यांशी त्यांचे नमुने जुळले. येथील शेतकरी गव्हाचे पीक घेत तसेच गुराखी होते आणि संपूर्ण युरेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार करत, असे त्यांच्या निदर्शनास आले. “यामुळे दोन संस्कृतींचा संबंध थेट जोडण्यास साहाय्य झाले. ते केवळ एकतर्फी नव्हते, हे यातून दर्शविले गेले”, असे निरीक्षण मूरजानी नोंदवितात.

हेही वाचा : जवाहरलाल नेहरू संविधान सभेत नागरिकत्वाच्या मुद्यावर काय म्हणाले होते?

नवीन अभ्यासात काय आढळले?

नवीन अभ्यास म्हटले आहे की, सुरुवातीच्या संशोधकांनी केवळ जिवंत असणाऱ्यांचा अभ्यास करून किती जनुकीय उत्परिवर्तन झाले याचा अंदाज घेतला. भारताच्या आधुनिक लोकसंख्येला तिच्या सध्याच्या विविधतेच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी किती कालावधी लागला असेल याची गणना करताना, मुरजानी आणि तिच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे की, समकालीन भारतीयांना जन्म देणारे सुमारे ५०,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून झालेल्या एका स्थलांतराचा भाग होते. मात्र, जगभरातील इतर लोकसंख्येच्या तुलनेत भारतीयांत एकत्रितपणे निअँडरथाल आणि डेनिसोव्हन्स या पुरातन जनुकांची आश्चर्यकारक विविधता जाणवते. २७०० भारतीय जनुकांमध्ये ज्ञात निअँडरथाल जनुकांपैकी सुमारे ९० टक्के जनुकांचा समावेश आहे. २७००० पेक्षा जास्त जनुकीय क्रमनिर्धारण करणाऱ्या आइसलँडर्समधील निअँडरथाल डीएनएच्या समान अभ्यासात ते ५० टक्के जास्त आहे. भारताच्या विशाल भौगोलिक सीमा आणि नजीकच्या नातेवाईक संबंध, विवाह परंपरेने इतर खंडांपेक्षा निअँडरथाल डीएनएचे विभिन्न भाग जतन केले आहेत, असे आढळून आले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neanderthal hunters iranian farmers to central asian herders how exactly did indians evolve print exp css