नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘इंडियन प्रीडेटर’ नावाची एक वेबसीरिज सध्या चांगलीच गाजत आहे. यामध्ये वेगवेगळ्या सिरियल किलरची गोष्ट आणि त्यामागची त्यांची विकृत मानसिकता उलगडून दाखवली जात आहे. डॉक्युमेंटरी असली तरी या सिरिजचा एक वेगळा चाहता वर्ग आहे जो अशाप्रकारच्या सत्यघटनेवर आधारित गोष्टी बघणं पसंत करतो. आता याच सिरिजमध्ये बंगलोरच्या एका सिरीयल किलर आणि रेपिस्टची कहाणी उलगडणार आहे. त्याचं नाव आहे उमेश रेड्डी. कोण आहे हा उमेश रेड्डी, बंगलोरमध्ये त्याची दहशत एवढी का वाढली, तसंच गुन्हा करण्यामागची त्याची मानसिकता काय होती? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

९० च्या दशकात उमेश रेड्डी हे नाव ऐकताच कर्नाटकमधील लोक चळाचळा कापायचे. उमेशसारखा दिसणारा एखादा माणूस जरी समोर आला तरी लोक त्यापासून दूर पळायचे. १९६९ साली कर्नाटकच्या चित्रदुर्गा जिल्ह्यात उमेशचा जन्म झाला. उमेशने CRPF जवान म्हणून जम्मू काश्मीरमध्ये ड्यूटी बजावली आहे. तिथल्या कमांडरच्या मुलीवर बलात्काराचा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला प्रथम अटक झाली, पण तो कसाबसा तिथून निसटून कर्नाटकमध्ये परत आला आणि ‘डिस्ट्रिक्ट आर्म्ड रिजर्व’मध्ये तो रुजू झाला. अर्थात इथेही त्याची पार्श्वभूमी तपासण्यात बराच घोळ झाला.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
devendra fadnavis gadchiroli guardian minister
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!

आणखी वाचा : मिलिंद सोमण विकतोय खास पुरुषांसाठी भांडी घासायचा साबण; व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले

उमेश अत्यंत अभ्यास करून नियोजन करून महिलांवर हल्ला करायचा. दुपारी ११ ते ३ या वेळेत घरात एकट्या असणाऱ्या गृहीणींना तो आपली शिकार बनवायचा. पाणी मागण्याच्या किंवा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तो घरात शिरायचा. त्यानंतर त्या महिलांना चाकूचीभीती दाखवून त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि निर्दयीपणे त्यांची हत्या करायचा. इतकंच नाही तर काही ठिकाणी त्याने मृत शरीराशीसुद्धा संभोग केला आहे. महिलांचा खून केल्यावर घरातले दाग दागिने घेऊन तो लंपास करायचा जेणेकरून लोकांना वाटेल की हे काम दरोडेखोरांचं काम आहे.

मीडिया रीपोर्टच्यानुसार जेव्हा जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा दरवेळी त्याने आतमध्ये महिलांची अंतरवस्त्र परिधान केलेली होती. १९९६ मध्ये नोकरी लागल्यानंतर त्याने लहान शाळकरी मुलींपासून प्रौढ महिलांवर असे अत्याचार केले. एके दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये एका मुलीने उमेशला ओळखले आणि तिने केलेल्या तक्रारीवर उमेशला नोकरीवर बडतर्फ केले. कर्नाटकबरोबरच अहमदाबाद, बडोदा या शहरातील महिलांनाही त्याने सोडले नाही. एका महिलेवर बलात्कार करताना त्या महिलेने बराच आरडा ओरडा केला, तेव्हा घाबरून तिथल्या बाल्कनीमधून उमेशने पळायचा प्रयत्न केला, पण उडी मारताना त्याचा पाय मुरगळला आणि तिथल्या लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला. तो याआधीही बऱ्याचदा फरार होण्यात यशस्वी ठरला होता.

आणखी वाचा : विश्लेषण : सुपरहिरोजपेक्षा ‘अवतार’ का ठरतो सरस? जेम्स कॅमेरुन यांचा मॅजिकल टच कसा ठरतो यशाचा हीट फॉर्म्युला?

१७ मे २००२ मध्ये उमेश अखेर पोलिसांच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या झडतीमध्ये त्याच्या बॅगमध्ये महिलांचे कपडे मिळले, तेव्हा उमेश हा एक क्रॉसड्रेसर आहे याचा खुलासा झाला. एकूण १८ महिलांचा बलात्कार करण्याचा आरोप त्याच्यावर लावला गेला त्यापैकी ९ गुन्हेच सिद्ध होऊ शकले. २६ ऑक्टोबर २००६ साली बंगलोर फास्ट ट्रॅक कोर्टाने उमेशला फाशीची शिक्षा ठोठावली. कोर्टात दिलेल्या जबाबात उमेश हे सगळं पैशांसाठी करत असल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्याने दयेचा अर्जदेखील केला आणि ही केस उच्च न्यायालयात उभी राहिली. या दरम्यान उमेशने स्वतःला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सिद्ध करायचा प्रयत्न केला. त्यानंतर सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती यांनीदेखील या प्रकरणात दखल घेण्यासाठी उमेशने अर्ज केला होता, पण अजूनही उमेशच्या फाशीचा निकाल प्रलंबित आहे.

Story img Loader