ATM Scam दिवसेंदिवस एटीएम संबंधित घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. घोटाळेबाज नवनवीन पद्धतींचा वापर करून लोकांना गंडवत आहेत. आता एटीएम संबंधित पुन्हा एक घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे जर तुम्ही पुढल्यावेळी पैसे काढण्यासाठी एटीएमला भेट द्याल, तेव्हा सावधानता बाळगा. कारण आता घोटाळेबाजांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन पद्धत शोधून काढली आहे. या घोटाळ्याला कार्ड ट्रॅप घोटाळा असे नाव देण्यात आले आहे. या घोटाळ्यातून अनेक लोकांची लूट झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. हा नवीन घोटाळा काय आहे? यातून स्वतःचा बचाव कसा करता येईल? याबद्दल जाणून घेऊ या.

फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांमुळे अधिकाऱ्यांची चिंताही वाढत आहे. लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)देखील लोकांना संबंधित धोक्यांची जाणीव करून देण्यासाठी मोहीम राबवत आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगशी संबंधित ६५,८९३ लोकांची फसवणूक झाली आहे, ज्यात एकूण २५८.६१ कोटी रुपयांची लूट झाली आहे.

Loksatta kutuhal Artificial Intelligence for Anomaly Detection in Financial Transactions
कुतूहल: वित्तव्यवहारांत विसंगती शोधक कृत्रिम बुद्धिमत्ता
are you addicted your favourite lip balm then read what doctor said
तुम्हालाही ओठांना सतत लिप बाम लावण्याचे व्यसन तर नाही ना? काय होतात परिणाम? वाचा डॉक्टरांचे मत….
mp supriya sule comment on growing variety of reels
सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रील्सवर भाष्य… म्हणाल्या, पाच मिनिटे…
There should be communication between parents and children Dr Harish Shetty
पालक आणि मुलांमध्ये संवाद असावा-डॉ. हरिश शेट्टी
Carrot Smoothie Recipe In Marathi
Carrot Smoothie: मुले गाजर खात नसतील तर बनवा स्मूदी, दृष्टी वाढण्यास होईल मदत
Weather forecasting and artificial intelligence models
कुतूहल: हवामानाचा अंदाज व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपे
Bike Accident Shocking Video Goes Viral On The Internet
VIDEO: सुसाट गाड्यांमध्ये उलट्या दिशेने आला अन् एका मागोमाग अपघातांचा थरार; मदत करायची सोडून केलं असं काही…
mht cet result date latest marathi news
एमएचटी-सीईटीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार…जाहीर झाली तारीख आणि वेळ…

हेही वाचा : खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट ‘RAW’ अधिकार्‍याने रचल्याचा आरोप, कोण आहेत विक्रम यादव?

काय आहे एटीएम ‘कार्ड ट्रॅप’ घोटाळा?

फसवणूक करणारे प्रथम सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएममधील कार्ड रीडरमध्ये फेरफार करतात आणि याचा पुरावा मिळू नये म्हणून सीसीटीव्ही रंगवतात. एखादी व्यक्ती एटीएममध्ये आल्यानंतर आणि त्याने आपला व्यवहार पूर्ण केल्यानंतर ते कार्ड काढू शकत नाहीत. कारण घोटाळेबाजांनी कार्ड रीडरमध्ये केलेल्या फेरफारामुळे कार्ड मशीनमध्येच अडकते. तेव्हा फसवणूक करणारे मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी पिन पुन्हा एंटर करण्यास सांगतात. व्यक्तीने एटीएम पिन पुन्हा टाकल्यानंतरही कार्ड मशीनमध्येच अडकून राहते. तेव्हा फसवणूककर्ते संबंधित व्यक्तीला बँकेशी संपर्क साधण्यास सांगतात. यावेळेत फसवणूककर्ते कार्डचा पिन कोड टाकून संबंधित व्यक्तीच्या खात्यातील रक्कम काढून घेतात.

फसवणूक करणारे केवळ फसवणूकच करत नाहीत तर मारहाणदेखील करतात. १९ एप्रिल रोजी अशाच एका प्रकरणादरम्यान, दोन व्यक्ती उत्तम नगरमधील एटीएममध्ये छेडछाड करत असल्याचा कॉल दिल्ली पोलिस ठाण्यात आला. “जेव्हा फोन करणाऱ्या व्यक्तीने, इतर काही लोकांसह कथित दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यापैकी एकाने पिस्तूल काढून हवेत गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पळ काढला.” पोलिसांनी एटीएम लुटणाऱ्या टोळीतील तिघांना अटक केली. विशाल नेगी, अमित मेहरा आणि विजय कुमार अशी या घोटाळेबाजांची नावे आहेत. दक्षिण पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली, उत्तर पूर्व दिल्ली आणि दक्षिण दिल्लीमध्ये घडलेल्या २५ घटनांमध्ये या टोळीचा सहभाग होता.

आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एटीएम घोटाळ्यांबाबत सतर्क राहणे आणि घोटाळेबाज कसे कार्य करतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

स्वतःचा बचाव कसा कराल?

-नेहमी सुरक्षा रक्षक असलेल्या एटीएममध्ये जा. सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएममध्ये असे फसवेगिरीचे प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते.

-कार्ड स्लॉटमध्ये आपले कार्ड टाकण्याआधी आजूबाजूला काही संशयास्पद गोष्टी आढळतात का, ते तपासा. एटीएमवर काही संशयास्पद उपकरणे लागली आहेत का, हेदेखील तपासा.

-अनोळखी व्यक्तींकडून मदत मागणे टाळा आणि तुमचे व्यवहार स्वतंत्रपणे हाताळा. अडचणीत आल्यास, घाबरून न जाता नेहमी बँकेच्या ग्राहक सेवेतील अधिकृत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.

-सावध राहा आणि तुमचा पिन टाकताना नेहमी मशीनचा कीपॅड झाकून ठेवा. कीपॅडच्या वरच्या बाजूला काही उपकरण तर लागलेले नाही ना, याची पडताळणी आधी करून घ्या.

-तुमचे बँक खाते स्टेटमेंट नियमितपणे तपासा. अतिरिक्त मदतीचे आश्वासन देणाऱ्या आणि किफायतशीर ऑफरबद्दल सतर्क राहा.

-बँकेचे लोगो आणि नावांसह अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. अनोळखी ईमेल किंवा एखाद्या मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. त्याबरोबर एखादा मजकूर पाठवण्यात आला असेल तर, डाउनलोड करू नका.

-रोख व्यवहार वापरणे टाळा. यूपीआय आणि ऑनलाइन बँक पेमेंट यांसारख्या सुरक्षित डिजिटल व्यवहार पद्धतींचा अवलंब करा.

हेही वाचा : रस्त्यांवरचे खड्डे आपोआप भरणार; काय आहे ‘सेल्फ हीलिंग’ तंत्रज्ञान?

एटीएम फसवणुकींचे प्रकार

एटीएम फसवणुकींच्या प्रकारातील शिमिंग आणि कार्ड क्लोनिंग स्कॅमचेही प्रकरणे दिवसागणित वाढत आहेत. शिमिंग स्कॅममध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या चिपमधून गुप्तपणे डेटा काढण्यासाठी घोटाळेबाज पातळ कार्डच्या आकाराच्या उपकरणांचा वापर करतात. कार्ड क्लोनिंगमध्ये घोटाळेबाज एटीएम किंवा कार्ड रीडरवर स्थापित केलेल्या उपकरणांचा वापर करून गुप्तपणे कार्ड माहिती चोरतात. त्यानंतर त्याचा उपयोग अनधिकृत वापरासाठी करतात. विशेषतः अशा घोटाळ्यात घोटाळेबाज वृद्धांना लक्ष्य करतात.