जर तुम्ही काहीही कारणामुळे नेहमीच राहण्याचं ठिकाण बदलत असाल आणि तुम्ही स्वतःचीच कार वापरत असाल तर या नवीन सर्विसबदल तुम्ही जाणून घेण महत्त्वाच ठरेल. राहण्याची जागा सतत बदलत असल्यामुळे प्रत्येक वेळी वाहनाची नोंदणी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेतून जावे लागते. हीच अडचण टाळू इच्छित असाल तर ही एक चांगली बातमी आहे. केंद्राने सर्व वाहनांमध्ये न्यू इंडिया सीरीज ( New Bharat Series BH mark) किंवा ‘बीएच’ नावाचे नवीन वाहन नोंदणी चिन्ह सादर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणाला होणार लाभ?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) शुक्रवारी भारत सीरीज वाहनांची (Bharat Series vehicles) अधिसूचना जारी केली आहे. नवीन बीएच सीरीज वाहनांना नोंदणीच्या कोणत्याही हस्तांतरणाची आवश्यकता नाही आणि ती देशभरात वैध असेल. ही सुविधा संरक्षण कर्मचारी तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वैच्छिक आधारावर उपलब्ध असेल. चार किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी कंपन्यांचे कर्मचारीही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
याचा सर्वात मोठा फायदा हस्तांतरणीय (transferable) नोकरी असलेल्या लोकांना होईल, जे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असतात. प्रत्येक वेळी नवीन राज्यात जाताना त्यांच्या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरित करण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी ही सुविधा मदत करेल.

मोटार वाहन अधिनियम काय सांगतो?

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ४७ नुसार, मूळ राज्यातून दुसऱ्या राज्यात नोंदणी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत, मालकाला आपले वाहन ज्या राज्यात रजिस्टर आहे त्या राज्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राज्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवण्याची परवानगी नाही. निर्धारित कालावधीत मालकाला नवीन राज्य प्राधिकरणासह नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे.

कसं असेल नोंदणीचे स्वरूप?

BH नोंदणीचे स्वरूप YY BH 4144 XX YY असे आहे. यात YY हे प्रथम नोंदणी वर्ष दर्शवते. नंतर BH आहे. पुढे गाडीचा नंबर असेल. पुढे भारत मालिका कोड 4- 0000 ते 9999 (यादृच्छिक) XX- वर्णमाला (AA ते ZZ) असेल.

वाहन कर कसा आकारला जाईल?

अधिसूचनेमध्ये सांगण्यात आले आहे की बीएच सीरीज अंतर्गत मोटार वाहन कर दोन वर्षांसाठी किंवा ४, ६, ८ वर्षांसाठी आकारला जाईल. खाजगी वाहनांना नवीन राज्यात स्थलांतरित केल्यावर या योजनेमुळे मोफत प्रवास करता येईल. चौदाव्या वर्षानंतर मोटार वाहन कर दरवर्षी आकारला जाईल जो त्या वाहनासाठी पूर्वी गोळा केलेल्या रकमेच्या निम्मा असेल.

या सुविधेचा नक्कीच अनेकांना फायदा होईल.