तब्बल १२ वर्षानंतरच्या संशोधनानंतर समोर आलेल्या निष्कर्षात किंग कोब्राच्या अनुवांशिक आणि आकारशास्त्रीय विश्लेषणातून ही एकच प्रजाती नसून चार भिन्न प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सिद्ध करण्यासाठी अनुवांशिक आणि आकृतिशास्त्रीय दोन्ही पुरावे सापडले आहेत. वन्यजीव जीवशास्त्रज्ञ पी. गौरीशंकर यांच्या नेतृत्वातील या संशोधनात इंग्लंड, स्वीडन, मलेशिया आणि भारतातील शास्त्रज्ञांचे सहकार्य होते.

‘कलिंगा’ नावाचा किंग कोब्रा!

भारताच्या पश्चिम घाटात आढळणाऱ्या किंग कोब्रा या उपप्रजातीला अधिकृतपणे ‘ओफिओफॅगस कलिंगा’ हे वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. कर्नाटकच्या कन्नड वारशाचा सन्मान म्हणून हे नामकरण करण्यात आले आहे. पहिल्यांदाच असे झाले आहे की एका राज्यातील स्थानिक भाषेला जागतिक पातळीवरील वैज्ञानिक नामांकनाशी जोडण्यात आले. कलिंग हे नाव या प्रदेशातील अद्वितीय जैवविविधतेला दिलेला सन्मान आहे. वैज्ञानिक नावे बहुतेकवेळा युरोपियन भाषांमधून घेतली जातात. मात्र, ‘कलिंग’ ही कन्नड संज्ञा आहे. या उपप्रजातीला ‘ओफिओफॅगस कलिंगा’ हे नाव देऊन कन्नड वारशाच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वन्यजीव संरक्षण आणि वैज्ञानिक संशोधनात कर्नाटकच्या योगदानाची ओळख आहे.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक

हेही वाचा >>> Ajmer Sharif Dargah: अजमेर शरीफ़ दर्गा हे शिवमंदिर होते का? ऐतिहासिक संदर्भ काय सुचवतात?

‘कलिंग’ नावामागे कोणते संशोधन कारणीभूत?

अगुंबे येथील ‘कलिंगा सेंटर फॉर रेनफॉरेस्ट इकॉलॉजी’चे संस्थापक संचालक वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉ. पी. गौरीशंकर यांच्या नेतृत्वातील संशोधन २०१२ मध्ये सुरू झाले. त्यात डीएनए विश्लेषण, खवले तपासणी आणि प्रजातींच्या रंगांच्या पद्धतीवरील ऐतिहासिक तपशिलाचा समावेश होता. तब्बल १२ वर्षानंतर त्यांच्या या संशोधनाला यश आले. त्यांनी व त्यांच्या संशोधकांच्या चमुने नवीन प्रजाती शोधल्या. या कार्याने पश्चिम घाटातील किंग कोब्रा ही एक वेगळी उपप्रजाती असल्याचे समोर आले. त्यामुळे कलिंग फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कामासाठी प्रसिद्ध असलेल्या शंकर यांनी पश्चिम घाटातील किंग कोब्राचे नाव ‘ओफिओफॅगस कलिंग’ असे ठेवले. किंग कोब्रांवरील अग्रगण्य रेडिओ टेलीमेट्री अभ्यास सुरू करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

किंग कोब्राच्या किती उपप्रजाती आहेत?

१८३६मध्ये प्रथम कँटर या संशोधकाने किंग कोब्रा हा साप शोधून काढला. त्यानंतर जवळपास १८५ वर्षे ती एकच प्रजाती असल्याचे मानले गेले. मात्र अधिक संशोधनानंतर आणि डीएनए विश्लेषणानंतर जगभरात किंग कोब्राच्या चार उपप्रजाती आहेत असे आढळून आले. त्यांतील दोन भारतात आढळतात. पश्चिम घाटात एक आणि उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याशी, तसेच पूर्व घाटात आणखी एक. ऑफिओफगस हॅन्ना ही प्रजाती उत्तर आणि पूर्व भारतासह पाकिस्तानातही आढळून आलीय. याशिवाय अंदमान बेटे, इंडो-बर्मा, इंडो-चायना आणि थायलँड येथेही ती आढळते. ओफिओफॅगस बंगरस दक्षिण फिलिपिन्समध्ये, तर ओफिओफॅगस साल्वाटॅनस उत्तर फिलिपिन्समध्ये आढळते. ओफिओफॅगस कलिंगा केवळ पश्चिम घाटात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ येथे आढळतो. किंग कोब्राच्या उपप्रजातींमधील फरक शरीरावरील पट्ट्यांची संख्या आणि रंगाच्या नमुन्यांवरून करण्यात आला. पश्चिम घाटाच्या किंग कोब्राच्या शरीरावर साधारण ४० पट्टे असतात. तर ओफिओफॅगस बंगरस (५० ते ७० पट्टे) आणि ओफिओफॅगस हॅन्ना (७०पेक्षा जास्त पट्टे) यांसारख्या उपप्रजातींमध्ये पट्ट्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय डीएनए विश्लेषण आणि खवले पद्धत यावरूनदेखील उपप्रजातींमध्ये फरक ओळखण्यास मदत होते. ओफिओफॅगस  कलिंगाची उपप्रजाती भारताच्या पश्चिम घाटात स्थानिक आहे. ही पर्वतरांग तिच्या समृद्ध जैवविविधतेसाठी आणि अद्वितीय परिसंस्थेसाठी ओळखली जाते.

हेही वाचा >>> History of Watling Street: २००० वर्षांनंतर लंडनमध्ये उलगडले रोमन रस्त्याचे रहस्य; वॉटलिंग स्ट्रीटचा शोध नेमकं काय सांगतो?

पश्चिम घाट संवर्धनावर काय परिणाम?

वेगवेगळ्या उपप्रजातींची ओळख पश्चिम घाटातील अद्वितीय जैवविविधतेवर प्रकाश टाकते. त्यांच्या संवर्धनाच्या गरजेवर भर देते. यासारख्या अभ्यासामुळे या प्रदेशाच्या पर्यावरणीय महत्त्वाकडे लक्ष वेधले जाते. कारण याठिकाणी नेहमी जंगलतोड आणि अधिवास नष्ट होण्याचे धोके कायम आहेत. पश्चिम घाट हे युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसास्थळ म्हणून नोंदवले गेले आहे. येथे अनेक स्थानिक प्रजाती आढळतात. येथील हवामान आणि भौगोलिकता विविध वनस्पती आणि जीवजंतूंना संरक्षण देणारी आहे. त्यामुळे ते जगातील सर्वात महत्त्वपूर्ण जैविविवधता हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे या जैवविविधता हॉटस्पॉटचे संवर्धन आवश्यक आहे.

आययूसीएनच्या यादीत कोणती नोंद?

या प्रजातीची नोंद सध्या आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) लाल यादीत ‘असुरक्षित’ या गटात आहे. त्यामुळे या संशोधनातील अभ्यासातून समोर आलेला एक निष्कर्ष किंग कोब्राच्या संवर्धनाकडे बोट दाखवणारा आहे. आतापर्यंत किंग कोब्रा ही सामान्यतः आढळणारी प्रजाती मानली जात होती आणि त्याला विशेष संरक्षणाची आवश्यकता नसते असेही मानले जात होते. मात्र, या संशोधनात्मक अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानंतर हे चित्र बदलले आहे. नव्याने वर्णन केलेल्या चार प्रजातींपैकी ओफिओफॅगस कलिंगा आणि ओफिओफॅगस साल्वाटॅनस या अतिशय धोक्यात असलेल्या प्रजाती आहेत. त्यामुळे त्यांचे विशेष संवर्धन आवश्यक असल्याचेही पी. गौरीशंकर सांगतात. फिलीपिन्स सरकार आणि लुझोनमधील अधिकाऱ्यांनी या निष्कर्षांची दखल घेतली आहे आणि प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजनांवर ते विचार करत आहेत.

किंग कोब्राविरुद्धचा संघर्ष कुठे?

हा नवीन निष्कर्ष किंग कोब्राच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यास नक्कीच मदत करेल, असा विश्वास संशोधकांना आहे. मात्र, या प्रजातीला गोव्याच्या पश्चिम घाटात धोका आह, जेथे पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध भागात मोठ्या प्रमाणात काजूच्या बागा आहेत. गोव्यात गेल्या दोन दशकांपासून मानव आणि किंग कोब्रा यांच्यातील संघर्षात वाढ झाली आहे. गोव्यात म्हादेई वन्यजीव अभयारण्याच्या सीमेवर असलेल्या काजूच्या बागांमधून किंग कोब्राची वारंवार सुटकादेखील करण्यात आली आहे. कर्नाटकात कलिंग म्हणून ओळखला जाणारा किंग कोब्रा गोव्याच्या लोककथांमध्ये भुजंग म्हणून लोकप्रिय आहे.

rakhi.chavhan@expressindia.com