ISRO Chandrayaan-3 Moon Landing Update : ‘चांद्रयान-३’ ही भारताची तिसरी चंद्र मोहीम आहे. १४ जुलै रोजी दुपारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘चांद्रयान-३’ चंद्राकडे झेपावले. ‘चांद्रयान-२’चे अपयश दूर सारून वैज्ञानिकांना अपेक्षित असलेली माहिती मिळवण्याचा उद्देश या ताज्या मोहिमेचा आहे. २०१९ साली ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या पृष्ठभागावर अनियंत्रितपणे आदळल्यानंतर ती मोहीम अपयशी ठरली होती. मागच्या अनुभवानंतर वैज्ञानिकांनी यावेळी ‘चांद्रयान-३’मध्ये अनेक बदल करून संभाव्य अपघात टाळण्याचा प्रयत्न केला आहे. दोन वर्षांच्या संशोधनानंतर इस्रोच्या वैज्ञानिकांनी लँडर यशस्वीपणे उतरवण्यासाठी अनेक चाचण्या घेतल्या. त्याप्रमाणे सॉफ्टवेअर-हार्डवेअर, सेन्सर, नेव्हिगेशन, इंधन क्षमता आणि लँडरच्या पायामध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल कसे आहेत? चंद्राच्या खडबडीत पृष्ठभागावर उतरण्यासाठी त्यांची कशी मदत होणार? ही सर्व माहिती जाणून घेऊया…

अपडेट >> चांद्रयान-३ च्या लँडरचे विलगीकरण यशस्वी; आता पुढे काय?

Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख
Cyclone Fengal caused rain in Sindhudurg mdisrupting mango blooming due to changing weather conditions
थंडी गायब…आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रियेत खोडा
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial
भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”

७ सप्टेंबर २०१९ रोजी चंद्रावर अलगद उतरत असताना चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर उंचीवर लँडरशी इस्रोच्या शास्त्रज्ञांचा संपर्क तुटला. ‘चांद्रयान-२’चा वेग नियंत्रणात न राहिल्यामुळे शेवटच्या काही सेकंदात यान पृष्ठभागावर कोसळले. या अनुभवानंतर वैज्ञानिकांनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमधील अनेक समस्या जाणून घेतल्या. त्याचा परिणाम असा झाला की, यावेळी ‘चांद्रयान-३’मधील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये अनेक बदल करण्यात आले असून त्यांची क्षमता वाढविण्यात आली आहे.

हे वाचा >> चंद्रावर संशोधन करण्यासाठी इस्रोने दक्षिण ध्रुवाची निवड का केली? इतर देश इथे का गेले नाहीत?

लँडरचे पाय आणखी मजबूत केले

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणाऱ्या लँडरला चाके नसून स्टिल्ट्स (Stilts) किंवा पाय (legs) आहेत. (सर्कशीतला जोकर दोन उंच काठ्यावर चालण्याचा खेळ करतो, त्याच्या पायखाली असलेल्या त्या काठ्यांना स्टिल्ट्स म्हणतात. आणखी एक उदाहरण म्हणजे, पाणथळ जमिनीवर लाकडाच्या खांबाचा आधार घेऊन थोड्या उंचीवर घर बांधलेले असते, त्या खांबानाही स्टिल्ट्स म्हणतात).

लँडर पृष्ठभागावर उतरत असताना या स्टिल्ट्स किंवा पायांनी चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करून लँडरला स्थिर करणे अपेक्षित आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेच्या वेळी लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून जवळपास ७.२ किमी उंचीवर असतानाच त्याचे नियंत्रण गमावले गेले होते. चंद्राच्या पृष्ठभागाच्या ४०० मीटर अंतरावर असताना विक्रम लँडरची गती कमी होणे अपेक्षित होते. लँडर जेव्हा पृष्ठभागावर आदळले, तेव्हा त्याचा वेग प्रतितास ५८० किमी इतके होता, असे सांगितले गेले.

Chandrayaan 3 Lander
चांद्रयान ३ चे लँडर (Photo – ISRO)

चांद्रयानमधील पाय आणखी मजबूत करण्यात आले आहेत, जेणेकरून यावेळी पृष्ठभागावर अलगद उतरणे, लँडर स्थिर करणे शक्य होईल. अर्थात, ‘चांद्रयान-२’मध्ये ज्याप्रकारे वेग अनियंत्रित होण्याची समस्या निर्माण झाली होती, तशी ‘चांद्रयान-३’मध्येही निर्माण झाली तर या नव्या बदलाचा काहीही उपयोगा होणार नाही. पण, जर नियंत्रित वेगामध्ये खडबडीत जागेवर उतरायचे असल्यास या मजबूत पायांचा नक्कीच उपयोग होईल.

हे ही वाचा >> चांद्रयान-२ मध्ये नेमकं काय चुकलं ? लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर का कोसळले? जाणून घ्या

इंधनाच्या टाकीची क्षमता वाढवली

‘चांद्रयान-२’पेक्षाही अधिक इंधन वाहून नेण्याची क्षमता ‘चांद्रयान-३’मध्ये आहे. लँडर उतरत असताना आवश्यकता भासल्यास लँडिग साइटमध्ये शेवटच्याक्षणी बदल करता येण्यासाठी इंधन क्षमतेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ‘चांद्रयान-२’च्या लँडरला कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेऱ्यांना पृष्ठभागावर मोठा खडक, खड्डा किंवा लँडिग अस्थिर करणारे पृष्ठभागावर इतर कोणतेही अडथळे आढळल्यास त्याचा मार्ग बदलण्याची क्षमता ‘चांद्रयान-२’मध्ये होती. ‘चांद्रयान-३’मध्ये अतिरिक्त इंधन असल्यामुळे लँडिगच्या प्रक्रियेची क्षमता आणखी वाढली आहे.

लँडरचा प्रत्येक भाग सूर्यप्रकाश घेऊ शकतो

‘चांद्रयान-३’मधील लँडरच्या चारही बाजूंना सौरपत्रे (Solar Panels) बसविण्यात आले आहेत. ‘चांद्रयान-२’मध्ये फक्त दोन बाजूंना सौरपत्रे लावले होते. या बदलामुळे लँडर चुकीच्या ठिकाणी उतरले किंवा कोसळले तरी सौरऊर्जेचा अखंड पुरवठा होत राहील. लँडरच्या एक किंवा दोन बाजू सतत सूर्याच्या दिशेला असतील, ज्यामुळे लँडर सक्रिय राहण्यास मदत होईल.

आणखी काही अधिक साधने

चांद्रयानावर अतिरिक्त नेव्हिगेशनल आणि मार्गदर्शक उपकरणे बसविण्यात आली आहेत, ज्यामुळे लँडरचा वेग आणि इतर आवश्यक सुधारणा याचे सतत निरीक्षण करणे सोपे जाणार आहे. यावेळी ‘चांद्रयान-३’वर लेझर डॉप्लर व्हेलोसिमीटर हे उपकरण बसविण्यात आले आहे. या उपकरणातून लेझर बिम्स (प्रकाशरेषा) चंद्राच्या पृष्ठभागावर सोडून त्या माध्यमातून लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागावर जातानाचा वेग मोजणे शक्य होणार आहे. यासोबतच नवे सेन्सर्स आणि कॅमेरेही लँडरवर बसविण्यात आले आहेत.

सॉफ्टवेअर अद्ययावत

नव्या सॉफ्टवेअरमध्ये धोका शोधणे, कॅमेराचा प्रतिबंध टाळणे आणि अल्गोरिदमची (विशिष्ट प्रश्न सोडविताना पाळावयाच्या नियमांचा संच) प्रक्रिया अद्ययावत करण्यात आली आहे. नेव्हिगेशन आणि मार्गदर्शक सॉफ्टवेअरमध्येही अत्याधुनिकीकरण करण्यात आले आहे. लँडरमधील एखादी प्रणाली कोणत्याही कारणास्तव कार्य करत नसेल, तर दुसरे उपकरण काम करेल याची खात्री करण्यासाठी अनावश्यकतेचे अनेक स्तर जोडण्यात आले आहेत.

अनेक ताण चाचण्या पार पडल्या

‘चांद्रयान-३’मधील लँडरच्या अनेक ताण चाचण्या (Stress Tests) आणि प्रयोग घेतले आहेत. हेलिकॉप्टरमधून लँडर सोडण्याचीही चाचणी घेण्यात आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरला यशस्वीरित्या उतरवण्यासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी चंद्राच्या पृष्ठभागाशी मिळत्याजुळत्या जागेवर वेगवेगळ्या पद्धतीने लँडर उतरवण्याच्या चाचण्या घेतल्या आहेत. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, मागच्या दोन वर्षांत आम्ही अनेक शक्यता पडताळून पाहिल्या असून त्यावर आधारित प्रयोग केले आहेत. त्यानंतरच आम्ही ‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला.

२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरविण्याच प्रयत्न केला जाईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी (१४ जुलै) सांगितले. सॉफ्ट लँडिंग म्हणजे यान अलगद उतरविणे हे तांत्रिकदृष्टया आव्हानात्मक मानले जाते. चंद्रयान-३ हे १ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ मिनिटांनी चंद्रयान-३ अलगद उतरविण्याची योजना आहे. मागील मोहिमेमध्ये काय चूक झाली याचा अभ्यास करण्यासाठी एक वर्ष लागले. दुसरे म्हणजे आम्ही त्यात सुधारणा करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत आणि काय चूक होऊ शकते याचा अभ्यास केला. त्या आधारावर पुनरावलोकन केले, अशी माहिती सोमनाथ यांनी यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पत्रकारांना दिली. 

Story img Loader