अमेरिकेत न्यू ऑर्लिन्स शहरात नवीन वर्षाच्या पहाटे झालेल्या भीषण हल्ल्यात १५ जणांचा बळी गेला आणि कित्येक जखमी झाले. या घटनेत शहराच्या वर्दळीतच्या भागात नववर्ष साजरे करण्यासाठी जमलेल्या उत्साही गर्दीमध्ये हल्लेखोराने वेगात ट्रक घुसवला. हल्लेखोराचे नाव शमसुद्दीन जब्बार असे असून, त्याच्या ट्रकवर आयसिसचा काळा ध्वज आढळून आला. आयसिस नष्ट झालेली नसून, काहींच्या मते अशा प्रकारे हल्ले करण्याची तिची क्षमता अजूनही घातक आहे असे विश्लेषक मानतात.

न्यू ऑर्लिन्सचा हल्लेखोर आयसिस समर्थक

४२ वर्षीय शमसुद्दीन जब्बार हा अमेरिकी लष्करात होता. तेथे तो आयटी स्पेशालिस्ट होता आणि अफगाणिस्तानात जाऊन आला होता. याचवेळी त्याच्यावर आयसिसचा प्रभाव पडला असावा, असा एफबीआय या अमेरिकी तपासयंत्रणेचा अंदाज आहे. हल्ल्यापूर्वी त्याने समाजमाध्यमांवर आयसिसशी बांधीलकी व्यक्त केली होती. जब्बारने टेक्सासमध्ये पांढऱ्या रंगाचा फोर्ड पिक-अप ट्रक भाड्याने घेतला. काही वर्षांपूर्वी त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. पण त्याच्याकडे आयटीतली पदवी होती आणि लष्करातून निवृत्ती पत्करल्यानंतरही चांगली नोकरी होती. जब्बारने बुर्बोन स्ट्रीट या न्यू ऑर्लिन्समधील अतिशय गजबजलेल्या आणि लोकप्रिय भागात जाणूनबुजून ट्रक नेला. त्याआधी त्याने ट्रकमध्ये स्फोटके भरल्याचे सीसीटीव्हीवर आढळून आले. त्याचा हेतू दहशतवादी हल्ला करून अधिकाधिक मनुष्यहानी घडवण्याचाच होता. पण हे कृत्य त्याच्या एकट्याचे नसावे, अशी शक्यता एफबीआय आणि अमेरिकी प्रशासनाने व्यक्त केली आहे. ज्या प्रकारे स्फोटके भरली गेली, गर्दीची जागा निवडली गेली ते पाहता हा व्यापक स्वरूपाचा कट होता का, या दिशेने तपास सुरू आहे.

nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Israeli Palestinian Conflict
अन्वयार्थ : अरबांची जरब…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
loksatta anvyarth quality of school students has deteriorated clear from the asar survey
अन्वयार्थ: कोविडोत्तर निरीक्षणांच्या इयत्ताबदलाचा ‘असर’!
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

हेही वाचा : विश्लेषण : जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपदासाठी कार्लसनकडून ‘फिक्सिंग’? नक्की प्रकरण काय?

आयसिसचे अस्तित्व कुठे आणि किती?

गेल्या दशकाच्या मध्यावर आयसिसने इराक, सीरिया, लिबिया अशा तीन देशांमध्ये हातपाय पसरले होते. अल कायदा आणि तालिबानपेक्षाही क्रूर पण अधिक नियोजनबद्ध आणि धनवान अशा या संघटनेने या टापूतील अनेक देशांसमोर अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित केला होता. अखेरीस अमेरिका, रशिया, युरोपिय समुदाय, तुर्कीये, इराण अशा देशांच्या लष्करी कारवायांमुळे आयसिसचा अनेक ठिकाणी पाडाव झाला. इस्लामी राजवट छापायची, तर सरकारे उलथून टाकली पाहिजेत हे आयसिसचे धोरण होते. त्यातून बहुतेक देश सावध झाले. इराकमधून तेथील सरकारने अमेरिकेच्या मदतीने आयसिसला हुसकावून लावले. शिया इराणशी हाडवैर असल्यामुळे इराणी प्रभावक्षेत्रात उदा. लेबनॉन आणि सीरियाचा सरकारनियंत्रित भाग येथे आयसिसचा जम बसला नाही. परंतु सीरियाच्या काही भागांत, तसेच लिबियामध्ये काही प्रांतांमध्ये आयसिसचे अस्तित्व टिकून आहे. अफगाणिस्तानात आयसिस – खोरासान किंवा आयसिस – के या नावाने काही प्रांतांमध्ये या संघटनेची पाळेमुळे पसरली आहेत. तेथे तालिबान राजवटीचा विरोध असल्यामुळे, कट्टर इस्लामवादी असूनही आयसिसची डाळ फार शिजली नाही. सौदी अरेबिया, पाकिस्तान येथील सरकारांनी आयसिसला फार थारा दिला नाही. भारत, इस्रायल, चीन येथील सुरक्षा यंत्रण आयसिसचा संभाव्य धोका ओळखून सतत सावध राहिल्या. त्यामुळे या देशांत आयसिसला फार ढवळाढवळ कधीच करता आली नाही. मात्र तरीही आयसिसचे हस्तक, सहानुभूतीदार आणि समर्थक युरोप आणि अमेरिकेत सक्रिय आहेत. तसेच त्यांची संपर्कयंत्रणाही कार्यरत आहे. न्यू ऑर्लिन्ससारख्या हल्ल्याने हे पुन्हा अधोरेखित झाले.

२०२४मध्ये आयसिसचे पुनरुत्थान?

गतवर्षाची सुरुवातही आयसिसने घडवून आणलेल्या भीषण हल्ल्याने झाली होती. इराणमध्ये तेथील एक उच्चपदस्थ लष्करी अधिकारी कासिम सोलेमानीच्या स्मृत्यर्थ झालेल्या कार्यक्रमात आयसिसने बॉम्बस्फोट घडवून आणला, ज्यात ९५ नागरिक ठार झाले. पुढील महिन्यात तुर्कीयेत इस्तंबूलमधील एका रोमन कॅथलिक चर्चवर हल्ला झाला. काही दिवसांनी रशियात मॉस्कोजवळ एका सभागृहात सांगीतिक कार्यक्रमादरम्यान चार हल्लेखोरांनी बेछुट गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला. यात १३७ नागरिक मृत्युमुखी पडले. याशिवाय अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी घातपाताचे दोन कट हाणून पाडले. यातील एक पॉप गायिका टेलर स्विफ्ट हिच्या ऑस्ट्रियातील कार्यक्रमादरम्यान आणि एक अमेरिकेत ओक्लाहोमात निवडणुकीच्या दिवशी घडवला जाणार होता.

हेही वाचा : Air India Flight Wifi : विमानात हजारो फूट उंचीवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी मिळणार?

कारवायांत वाढ का?

आयसिसची व्याप्ती कमी झाली असली, तरी तिच्या प्रहारक्षमतेमध्ये फार घट झालेली नाही असे विश्लेषकांचे मत आहे. इस्रायलच्या गाझा पट्टीतील कारवाईमुळे पाश्चिमात्यविरोधी, इस्रायलविरोधी भावना चेतवण्याचा प्रयत्न आयसिसकडून सुरू झाला आहे. त्यास काही प्रमाणात सहानुभूती मिळू लागली आहे. याशिवाय अमेरिकेने गतदशकाच्या मध्यावर, आयसिसचा प्रभाव ओसरू लागल्यानंतर गुप्तवार्ता संकलनासाठी निधीत कपात केली. दहशतवादी हल्ल्यांसाठी आवश्यक सिद्धता सध्याच्या युद्धखोर वातावरणात पुरेशी सक्षम राहिलेली नाही, हेही एक कारण आहे.

Story img Loader