न्यूयॉर्क शहर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) च्या मालकीतील रुझवेल्ट हॉटेलचे २२० दशलक्ष डॉलर्स भाडे देत असल्याचे अमेरिकेतील रिपब्लिकन नेते आणि उद्योगपती विवेक रामास्वामी यांच्या लक्षात आल्यानंतर मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने याला वेडेपणा म्हटले आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, न्यूयॉर्क शहरातील करदाते त्यांच्या स्वत:च्या जमिनीवर बेकायदा स्थलांतरितांना वास्तव्य करण्यासाठी परदेशी सरकारला पैसे देत आहेत. काय आहे न्यूयॉर्क आणि पाकिस्तानमधील करार? हॉटेलचा इतिहास काय सांगतो? न्यूयॉर्कमधील या हॉटेलमधून पाकिस्तानला पैसे कसे मिळत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

न्यूयॉर्क आणि पाकिस्तानमधील २२० दशलक्ष डॉलर्सचा करार काय आहे?

जून २०२३ मध्ये पाकिस्तानचे हवाई वाहतूक आणि रेल्वे मंत्री ख्वाजा साद रफीक यांनी पाकिस्तान आणि न्यूयॉर्क यांच्यातील तीन वर्षांच्या कराराची घोषणा केली. या करारामुळे पीआयएला २२० दशलक्ष डॉलर्स महसूल पाकिस्तानला मिळू शकेल आणि १८ दशलक्ष डॉलर्सच्या अडचणीत असलेल्या एअरलाइन्सला फायदा होईल, असे नमूद करण्यात आले होते. करारामध्ये रुझवेल्ट हॉटेलच्या सर्व १,०२५ खोल्या प्रति रात्र प्रति खोली २१० डॉलर्स या दराने भाड्याने देणे समाविष्ट आहे. सुरुवातीला केवळ एक वर्षाच्या कराराची हमी देण्यात आली होती, परंतु रफीक यांनी ही व्यवस्था पूर्ण तीन वर्षांसाठी वाढवण्याचा आशावाद व्यक्त केला होता, असे वृत्त ‘जिओ टीव्ही’ने दिले आहे. त्यांनी हेदेखील अधोरेखित केले की, या करारामुळे हॉटेलला महत्त्वाची वास्तू म्हणून घोषित करण्याचा धोका तात्पुरता कमी झाला आहे; ज्यामुळे त्याचा वापर आणि बदल मर्यादित असतील.

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
South Korea could become the first country to disappear from Earth
‘हा’ देश होणार पृथ्वीवरून गायब? कारण काय?
South Korea News
Emergency In South Korea : दक्षिण कोरियात आणीबाणी जाहीर, राष्ट्रपतींनी केली घोषणा, म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
gold reserves, Dhanteras gold, gold storage, RBI, england
विश्लेषण : १०२ टन सोने इंग्लंडकडून भारताकडे… रिझर्व्ह बँकेच्या ‘सोने वापसी’ निर्णयामागे काय कारण?
delay in Maharashtra Chief Minister face announcement
अग्रलेख : विलंब-शोभा!
जून २०२३ मध्ये पाकिस्तानचे हवाई वाहतूक आणि रेल्वे मंत्री ख्वाजा साद रफीक यांनी पाकिस्तान आणि न्यूयॉर्क यांच्यातील तीन वर्षांच्या कराराची घोषणा केली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ‘हा’ देश होणार पृथ्वीवरून गायब? कारण काय?

हॉटेलचा इतिहास काय सांगतो?

मिडटाउन मॅनहॅटनमधील ४५ पूर्व रस्त्यावर स्थित रूझवेल्ट हॉटेल १९२४ मध्ये सुरू झाले होते आणि तेव्हापासून ते न्यूयॉर्कच्या वास्तुशास्त्रीय भव्यतेचे प्रतीक ठरले आहे. हे हॉटेल अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांच्या नावावर आहे. ही १९ मजली इमारत जॉर्ज बी पोस्ट आणि सोन यांनी इटालियन पुनर्जागरण शैलीमध्ये डिझाइन केली होती. गेल्या अनेक दशकांमध्ये हिल्टन हॉटेल्स आणि रियल्टी हॉटेल्ससह अनेकांकडे या हॉटेलची मालकी होती. अखेर २००० मध्ये ‘पीआयए’ला पूर्ण मालकी मिळाली. १,२०० हून अधिक खोल्या असलेले हे हॉटेल एकेकाळी पाळीव प्राण्यांचे घर म्हणून, मुलांचे देखभाल सेवा केंद्र म्हणून आणि इन-हाउस डॉक्टर या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध होते. परंतु, आर्थिक अडचणींमुळे ऑक्टोबर २०२० मध्ये कोविड-१९ महामारीदरम्यान हे हॉटेल बंद झाले. मे २०२३ मध्ये न्यूयॉर्क शहराशी झालेल्या करारानुसार आश्रय शोधणाऱ्यांसाठी आश्रयस्थान म्हणून हे हॉटेल पुन्हा उघडण्यात आले.

रुझवेल्ट हॉटेलचा न्यूयॉर्कला काय फायदा?

न्यूयॉर्क शहरात आश्रय शोधणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात रूझवेल्ट हॉटेलमुळे न्यूयॉर्कला मदत झाली आहे. हे हॉटेल स्थलांतरितांना आश्रय देण्यासह लसीकरण आणि अन्न यांसारख्याही आवश्यक सेवा देत आहे. १४ हजारांहून अधिक खोल्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी न्यूयॉर्कने केवळ रुझवेल्टच नाही तर इतर १०० हून अधिक हॉटेल्स भाड्याने दिली आहेत. समीक्षकांनी निदर्शनास आणून दिले आहे की, यातील अनेक मालमत्ता एअर इंडिया आणि ताज ग्रुपसह परदेशी संस्थांच्या मालकीच्या आहेत. शहर अधिकारी असा युक्तिवाद करतात की, हा करार तातडीच्या समस्येवर व्यावहारिक उपाय प्रदान करतो. हॉटेल पुन्हा सुरू झाल्यामुळे ऑपरेशनल कर्मचाऱ्यांची संख्या ४७९ वरून ७७ पर्यंत कमी झाली आहे.

हेही वाचा : अजमेर दर्गा आणि संभल मशीद विवादावरून चर्चेत आलेला प्रार्थनास्थळ कायदा नक्की आहे तरी काय?

पाकिस्तानसाठी हा करार महत्त्वाचा का आहे?

पाकिस्तानसाठी रुझवेल्ट करार हा देशाची अर्थव्यवस्था स्थिर करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. हॉटेलचे भाडे करार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) कडून १.१ अब्ज डॉलर्स बेलआउट पॅकेजशी संरेखित आहे. हॉटेल लीजमधून मिळणारे २२० दशलक्ष डॉलर्स महसूल पीआयए आणि देशातील संघर्षात असलेल्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी अत्यंत आवश्यक आर्थिक सहाय्य प्रदान करते. परंतु, यावरून सुरू असलेला अमेरिकेतील वाद देशांतर्गत राजकारणात गुंफलेल्या आंतरराष्ट्रीय करारांच्या वाढत्या असहमतीवर प्रकाश टाकतात. एलोन मस्क यांच्यासमवेत नव्याने स्थापन झालेल्या शासकीय कार्यक्षमतेच्या विभागाचे (DOGE) सह-नेते रामास्वामी यांनी या करारावर टीका केली आहे. रामास्वामी यांच्या विधानाने करारातील आर्थिक बारकावे दर्शवले आहेत. रामास्वामी ट्रम्प प्रशासनात आपली भूमिका स्वीकारण्याच्या तयारीत असताना करारावरील त्यांची टीका भविष्यातील व्यवस्था बदलणार असल्याचे संकेत आहेत.