New Zealand Cricketers opting out of National Contract: आयसीसीतर्फे आयोजित कोणत्याही स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ जेतेपदाचा दावेदार असतो. सेमी फायनलपर्यंत तरी हमखास मजल मारणारा संघ अशी त्यांची ख्याती आहे. आपल्या खेळातून आणि वर्तनातून जंटलमन्स गेमचा प्रत्यय घडवणारा न्यूझीलंडचा संघ कमकुवत दिसल्यास चक्रावून जाऊ नका. न्यूझीलंडच्या बहुतांश प्रमुख खेळाडूंनी देशासाठी खेळण्याऐवजी फ्रीलान्स तत्वावर जगभरातील टी२० स्पर्धांमध्ये खेळायला प्राधान्य दिलं आहे. या खेळाडूंनी देशासाठी खेळणं पूर्णत: थांबवलेलं नाही किंवा त्यांनी निवृत्तीही स्वीकारलेली नाही पण यापुढे ते न्यूझीलंड क्रिकेटचे पाईक नसतील हे मात्र खरं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
न्यूझीलंडचा भरवशाचा सलामीवीर आणि गरज पडल्यास यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या डेव्हॉन कॉनवेने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेला मोठा करार नाकारला आहे. कॉनवे आता ‘कॅज्युअल कंत्राटा’अंतर्गत न्यूझीलंडसाठी खेळणार आहे. टेस्ट, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात कॉनवेने न्यूझीलंडच्या संघात स्थान पक्कं केलं होतं. पदार्पणाच्या टेस्टमध्येच त्याने शतकी खेळी साकारली होती. उत्तम तंत्रकौशल्य असल्यामुळे कॉनवे न्यूझीलंडचा सलामीचा शिलेदार झाला होता. संघाचं संतुलन राखण्याच्या दृष्टीने कॉनवेने प्रसंगी यष्टीरक्षणही केलं आहे. मात्र जगभरातून टी२० लीगकडून खेळण्यासाठी विचारणा होत असल्याने कॉनवेने त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल स्पर्धेत कॉनवे चेन्नई सुपर किंग्सचा अविभाज्य घटक आहे.
मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असलेल्या कॉनवेने न्यूझीलंडमध्ये येऊन क्रिकेट कारकीर्द घडवली. कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट स्वीकारल्याने कॉनवे आपल्या मूळ देशात अर्थात दक्षिण आफ्रिकेत होणार असलेल्या SA20 स्पर्धेत खेळताना दिसेल. दरम्यान या हंगामात न्यूझीलंडचा संघ जेवढे कसोटी सामने खेळणार आहे त्यासाठी कॉनवेने उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण नवा करार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय संघासाठी खेळणं हे त्याच्यासाठी प्राधान्य नसेल.

युवा धडाकेबाज फलंदाज फिन अॅलन याला न्यूझीलंड बोर्डाने कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही. अॅलन बिग बॅश स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. मालिकेनिहाय अॅलनचा विचार केला जाईल असं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडचा कर्णधार आणि फलंदाजीतला आधारवड केन विल्यमसनने बोर्डाच्या पूर्णवेळ करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. केनने वनडे आणि टी२० कर्णधारपदही सोडलं होतं. केन दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या लीगमध्ये खेळण्याची शक्यता आहे. २०१० ते २०२४ या कालावधीत जागतिक पातळीवर खोऱ्याने धावा करणाऱ्या चार अग्रगण्य खेळाडूंना फॅब फोर अशी बिरुदावली मिळाली. विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ, जो रूट यांच्यासह केनचा या मांदियाळीत समावेश झाला. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा आणि शतकं केनच्याच नावावर आहेत. मात्र कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या केनने आता जगभरातील टी२० स्पर्धांमध्ये खेळण्याला प्राधान्य दिलं आहे.
दरम्यान याआधी न्यूझीलंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये हमखास विकेट मिळवून देणारा, धावांची गती रोखणारा तसंच अफलातून क्षेत्ररक्षक अशी बोल्टची ओळख आहे. बोल्टला ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी जगभरातील टी२० संघ आतूर असतात. जगभरातील जवळपास प्रत्येक लीगमध्ये खेळणाऱ्या बोल्टने न्यूझीलंडचा संघ हे प्रथम प्राधान्य नसेल हे स्पष्ट केलं. असं असूनही नुकत्याच झालेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत बोल्ट न्यूझीलंड संघाचा भाग होता. मात्र हा न्यूझीलंडसाठी शेवटचा वर्ल्डकप असेल असं बोल्टने स्पष्ट केलं आहे.
केन आणि बोल्ट यांच्याप्रमाणे वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन, अष्टपैलू खेळाडू जीमी नीशाम तसंच कॉलिन डी ग्रँडहोम यांच्यासह वेगवान गोलंदाज अॅडम मिल्न यांनीही पूर्णवेळ करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या टेस्ट, वनडे आणि टी२० संघाचा अविभाज्य भाग असलेले खेळाडूच करारातून बाहेर पडल्याने किवींचा संघ कमकुवत होण्याची चिन्हं आहेत.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा वार्षिक करार काय असतो?
न्यूझीलंड पुरुष क्रिकेटपटूंना प्रति टेस्ट ५ लाख, वनडेसाठी २ लाख तर टी२० खेळण्यासाठी १.२० लाख एवढं मानधन मिळतं. भारतीय खेळाडूंच्या तुलनेत न्यूझीलंडच्या खेळाडूंचं मानधन कमी आहे. करारबद्ध खेळाडूंना प्रतिवर्ष दीड ते अडीच कोटी रुपये प्रत्येकी मिळतात. यात खेळाडूंच्या श्रेणी असतात. श्रेणीनिहाय वार्षिक रकमेचा आकडा बदलतो. केन विल्यमसनसारख्या मोठया खेळाडूला करारबद्ध झाल्यानंतर दरवर्षी अडीच कोटी रुपये मानधन मिळतं. याच्या तुलनेत टी२० लीग महिना किंवा दोन महिने खेळून न्यूझीलंडच्या खेळाडूंना जास्त मानधन मिळतं.
करारबद्ध झाल्यास काय अटी शर्ती असतात?
करारबद्ध झालेल्या खेळाडूंचाच प्राधान्याने राष्ट्रीय संघाच्या निवडीवेळी विचार होतो. करारबद्ध झालेल्या खेळाडूंना न्यूझीलंडसाठी टेस्ट, वनडे आणि टी२० खेळण्यासाठी तय्यार राहावं लागतं. दुखापती किंवा वैयक्तिक अडचण हा अपवाद वगळला तर न्यूझीलंडचा संघ जेव्हाही खेळतो तेव्हा खेळण्यासाठी उपलब्ध राहणं ही करारबद्ध खेळाडूची जबाबदारी असते. याव्यतिरिक्त करारबद्ध खेळाडूंना न्यूझीलंडमधली डोमेस्टिक स्पर्धा सुपर स्मॅशमध्ये खेळणं अनिवार्य असतं.
जगभरात किती टी२० लीग आहेत?
जगभरात आयपीएल (भारत), लंका प्रीमिअर लीग (श्रीलंका), पाकिस्तान सुपर लीग (पाकिस्तान), बिग बॅश (ऑस्ट्रेलिया), SA20 (दक्षिण आफ्रिका), बांगलादेश प्रीमिअर लीग (बांगलादेश), ग्लोबल टी२० (कॅनडा), कॅरेबियन प्रीमिअर लीग (वेस्ट इंडिज), मेजर लीग क्रिकेट (अमेरिका), आयएलटी२० (युएई), द हंड्रेड (इंग्लंड), व्हायटॅलिटी ब्लास्ट (इंग्लंड) अशा लीग सुरू आहेत. न्यूझीलंडचे बहुतांश खेळाडू या सगळ्या लीगमध्ये खेळतात. ५ ते ६ महिने विविध लीगमध्ये खेळून वर्षभराची पुंजी मिळत असल्याने न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी फ्रीलान्स खेळायला सुरुवात केली आहे. लीगसाठी ठराविक महिन्याची उपलब्धता दिल्यानंतर उर्वरित वेळ ते आपल्या कुटुंबीयांना देऊ शकतात. घर चालवण्यासाठी आवश्यक पैसे, सोयीसुविधा आणि मोजकंच खेळणं यामुळे वार्षिक करार न स्वीकारणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे.