न्यूझीलंड देशात लवकरच मतदानाचे वय १८ वरून १६ वर्षे होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडच्या सर्वोच्च न्यायालयाने मतदानाचे वय १६ वर्षे करण्याच्या मागणीच्या बाजूने निर्णय दिला आहे. पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन यादेखील त्यासाठी अनुकूल असून लवकरच या विधेयकावर संसदेत चर्चा होणार आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला? येथील वेगवेगळ्या पक्षांचे मतदानाचे वय कमी करण्याबाबत काय मत आहे? तसेच हा कायदा अस्तित्वात येण्यासाठीची प्रक्रिया काय आहे? यावर नजर टाकुया.
मतदानाचे वय १८ वरून १६ वर्षे करावी, अशी मागणी ‘मेक इट १६’ या ग्रुपने केली होती. त्यासाठी या ग्रुपने न्यायालयात धाव घेतली होती. याच मागणीवर न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून मतदारासाठीचे वय १८ वर्षे असणे हे भेदभावजनक असल्याचे म्हटले आहे. याआधी १९६९ साली न्यूझीलंड सरकारने मतदानाचे वय २१ वरून २० केले होते. तर १९७४ साली हेच वय १८ वर्षे करण्यात आले होते. त्यानंतर आता मतदानाचे वय १६ वर्षे करण्यासाठी संसदेत चर्चा केली जाणार आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : पैसा, संघाचा समोतल की अन्य काही, IPL मध्ये फ्रँचायझी खेळाडूंना संघमुक्त का करतात?
सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
न्यूझीलंडमधील बील ऑफ राईट्सप्रमाणे १६ वर्षे झाल्यानंतर कोणाशीही वयाच्या आधारावर भेदभाव केला जाऊ शकत नाही. याच कारणामुळे न्यायालयाने मतदानासाठीचे वय १८ वर्षे असणे म्हणजे भेदभावजनक असल्याचे म्हटले आहे. तसेच देशाचे अॅटर्नी जनरल मतदानासाठीचे वय १६ ऐवजी १८ वर्षे का आहे, हे सांगण्यात अपयशी ठरले आहेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
इलेक्टोरल अॅक्ट १९९३ आणि लोकल इलेक्टोरल अॅक्ट २००१ नुसार मतदानाचे वय १८ वर्षे ठरवण्यात आलेले आहे. मात्र राईट्स अॅक्ट १९९० मधील कलम १९ मध्ये वयाच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊन नये असे म्हणण्यात आले आहे. त्यामुळे मतदानासाठी वयाच्या आधारावर केला जाणारा भेदभाव समर्थनीय नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : मोदींनी इटलीच्या पंतप्रधानांना भेट म्हणून दिलेल्या स्कार्फची का होतेय चर्चा? ‘पाटण पटोला’ वस्त्राचे महत्त्व काय?
आता पुढे काय?
न्यायालयाच्या या निर्णयानंतर न्यूझीलंडमध्ये मतदानाचे वय लगेच १८ वरून १६ वर्षे होणार नाही. न्याायलयाच्या या निर्णयानंतर हा विषय संसदेत चर्चेसाठी मांडला जाणार आहे. निवडणूक कायद्यात बदल करायचा असेल कायदेमंडळाच्या ७५ टक्के सदस्यांची सहमती आवश्यक असते. त्यामुळे संसदेत या विषय़ावर आणखी विस्तृत चर्चा होणार आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: कर्नाटकात गाजत असलेलं मतदार माहिती चोरी प्रकरण काय आहे? काँग्रेसच्या आरोपांवर भाजपाची भूमिका काय?
स्थानिक राजकीय पक्षांची काय भूमिका?
मतदानाचे वय १८ वरून १६ करण्याच्या मागणीवर वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी मतं आहेत. पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन वैयक्तिकरित्या मतदानाचे वय १६ वर्षे करावे, या मताच्या आहेत. मात्र हा निर्णय फक्त माझा स्वत:चा किंवा सरकारचा नाही. हा बदल करायचा असेल तर कायदेमंडळाच्या ७५ टक्के सदस्यांची सहमती आवश्यक आहे, असे ऑर्डन म्हणाल्या आहेत. न्यूझीलंडमधील सत्ताधारी पक्ष लिबरल लेबर पार्टीने या विषयावर अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. लिबरल ग्रीन पार्टीने या मागणीला पाठिंबा दिला आहे. न्यूझीलंड नॅशनल पार्टी आणि एटीसी न्यूझीलंड पार्टीने या मागणीला विरोध केला आहे.
हेही वाचा >>> विश्लषण : इस्लाममध्ये मद्यप्राशन ‘हराम’, मुस्लीम राष्ट्रांमध्ये मद्यासंंबंधीचे नियम काय?
या देशात मतदांनाचे वय १६ वर्षे
मतदानाचे वय १६ वर्षे करण्याचा विषय नेहमीच वादाचा ठरलेला आहे. सध्या अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, क्यूबा, इक्वेडोर, जर्सी, माल्टा, निकीरगुआ, स्कॉटलँड या देशात मतदानाचे वय १६ वर्षे आहे.