नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा)च्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, नवीन शोधलेला अशनी पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी या अशनीला 2024 YR4 असे नाव दिले आहे. हा अशनी २०३२ मध्ये पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता एक टक्क्यापेक्षा किंचित जास्त आहे. नासाच्या सेंटर फॉर नीयर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजचे संचालक पॉल चोड्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे, “आम्हाला या अशनीची चिंता नाही; परंतु याचे निरीक्षण करणे अत्यावश्यक आहे.” 2024 YR4 पृथ्वीवर आदळल्यास किती विनाश होऊ शकतो? अशनी किती वेळा पृथ्वीवर आदळतात आणि अशा परिस्थितींना तोंड देण्यासाठी अवकाश संस्था कशा प्रकारे कार्य करते? त्याविषयी जाणून घेऊ.

नवीन शोधलेला लघुग्रह 2024 YR4 काय आहे?

2024 YR4 पहिल्यांदा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चिलीमध्ये दुर्बिणीद्वारे शोधण्यात आला. पृथ्वीच्या जवळचा हा अशनी फुटबॉलच्या मैदानाइतका मोठा आहे. त्याचा आकार ४० ते १०० मीटर आहे. ‘असोसिएटेड प्रेस’च्या वृत्तानुसार, ख्रिसमसच्या दिवशी हा अशनी पृथ्वीच्या सर्वांत जवळ आला. हा अशनी पृथ्वीपासून अंदाजे ८,००,००० किलोमीटर अंतरावर म्हणजेच चंद्राच्या सुमारे दुप्पट अंतरावर आहे. तो अखेरीस पुढील काही महिन्यांत दृष्टीआड होईल आणि २०२८ मध्ये पृथ्वीच्या मार्गावरून जाईपर्यंत तो पुन्हा दिसणार नाही.

Ancient Egyptian Screaming Mummy
Egyptian Screaming Mummy: ३५०० वर्षे प्राचीन किंचाळणाऱ्या बाईचे रहस्य उलगडले; इजिप्तमधील नवे संशोधन नेमके काय सांगते?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Indian Migrants in America
Indian Migrants : अमेरिकेतील बेकायदेशीर भारतीयांची लष्करी विमानानं ‘घर’वापसी
Anajli Damania on dhananjay Munde
“…आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्याच”, भर पत्रकार परिषदेत पुरावे सादर केल्यानंतर अंजली दमानियांची मागणी!
accident to Vehicle of devotees returning from Mahakumbh on Samruddhi Highway
‘समृद्धी’वर चालकाला लागली डुलकी, कुंभतून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!
Sunetra Pawar Speaker List of Rajyasabha
खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर राज्यसभेत महत्त्वाची जबाबदारी; पहिल्याच टर्ममध्ये ‘या’ पदावर निवड!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024: “आज बाळासाहेब असते तर..”, अरविंद सावंत यांच्या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

त्यामुळेच जगभरातील शास्त्रज्ञ सध्या 2024 YR4 चा मार्ग निश्चित करण्यासाठी सर्वांत शक्तिशाली दुर्बिणी वापरण्यात गुंतले आहेत. तो दृष्टीआड होण्यापूर्वी या अशनीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. शास्त्रज्ञांना सध्या एप्रिलच्या मध्यापर्यंत अशनीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वेळ आहे.

2024 YR4 पहिल्यांदा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चिलीमध्ये दुर्बिणीद्वारे शोधण्यात आला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

लघुग्रह किती मोठा आहे हे तपासण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ चमक तपासतात. कारण- प्रकाशमान वस्तू आकाराने मोठ्या असतात. परंतु, या अशनीचे अचूक मोजमाप सांगणे कठीण आहे. कारण- चमक ही अशनीच्या पृष्ठभागावर किती प्रमाणात परावर्तित आहे यावर ते अवलंबून असते (अशनीला स्वतःचा प्रकाश नसतो. अशनी फक्त सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करतात). परिणामी, मोठा, गडद रंगाचा लघुग्रह आणि लहान लघुग्रह यांच्यातील फरक ओळखणे हे एक आव्हान आहे.

2024 YR4 धडकल्यास किती विनाश होऊ शकतो?

तज्ज्ञांनी सांगितले की, 2024 YR4 मोठा आहे; परंतु ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी डायनासोर आणि इतर अस्तित्वातील जीवांचा नाश करणाऱ्या अशनीइतका मोठा नाही. 2024 YR4, लोकसंख्येच्या क्षेत्रावर आदळल्यास मोठ्या प्रमाणात स्थानिक नुकसान होऊ शकते. खगोलशास्त्रज्ञ एखाद्या वस्तूमुळे होणाऱ्या विनाशाचे वर्गीकरण करण्यासाठी टोरिनो स्केल नावाचे उपकरण वापरतात. नासा जेपीएल सेंटर फॉर नीयर-अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (सीएनईओएस)ने सध्या ० ते १० च्या मोजपट्टीनुसार 2024 YR4 बाबत तीन प्रकारचे श्रेणीकरण केले आहे. २००४ मध्ये सापडलेल्या Apophis अशनीला सुरुवातीला ० ते १० च्या मोजपट्टीनुसार चार श्रेणीकरण दिले गेले. परंतु, नंतर त्याचे श्रेणीकरण कमी केले गेले. निरीक्षणातून असे दिसून आले आहे की, किमान १०० वर्षे या अशनीचा कोणताही धोका नाही.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार 2024 YR4 पृथ्वीवर आदळल्यास तो आठ ते १० मेगाटन ऊर्जा सोडण्याची शक्यता आहे. ‘एनपीआर’च्या अहवालानुसार, १५ फेब्रुवारी २०२३ रोजी रशियातील चेल्याबिन्स्क येथे आदळणाऱ्या अशनीने सुमारे ५०० किलोटन टीएनटीच्या समतुल्य ऊर्जा सोडली. ही ऊर्जा हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा सुमारे ३० पट जास्त आहे. त्या दुर्घटनेत सुमारे १,५०० लोक जखमी झाले आणि अनेक शहरांमधील हजारो इमारतींचे नुकसान झाले. तो लघुग्रह 2024 YR4 च्या जवळपास अर्ध्या आकाराचा होता.

अशनी पृथ्वीवर किती वेळा आदळतात?

दररोज हजारो अशनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. बहुतेक अशनी फारच लहान असतात आणि घर्षणामुळे ते वातावरणात जळतात. काही मोठे अशनीही जळतात आणि आकाशात आगीचे गोळ्यांप्रमाणे दिसतात. काही वेळा न जळालेले तुकडे पृष्ठभागावर आदळतात; परंतु त्यामुळे जास्त नुकसान होत नाही. मोठे लघुग्रह जागतिक आपत्तींसाठी कारणीभूत ठरू शकतात; परंतु ते पृथ्वीवर क्वचितच कमी वेळा आदळतात. ‘डीडब्ल्यू’च्या एका वृत्तानुसार आतापर्यंत विनाशास कारणीभूत ठरणारे जे अशनी पृथ्वीवर आदळले, त्यांचा व्यास एक किलोमीटरपेक्षा मोठा होता.

जसे की, डायनासोरचे अस्तित्व नष्ट करणारा चिक्सुलब अशनी. आपली सूर्यमाला पृथ्वीच्या आकारमानाच्या तुलनेत खूप मोठी आहे म्हणजे पृथ्वीला अशनीसारख्या वस्तूचा धक्का बसण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु, चिक्सुलब या अशनीप्रमाणे लहान अशनीदेखील नुकसान करू शकतात. या सर्व बाबी अशनीचा वेग आणि पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याच्या कोनावर अवलंबून आहेत. ४० मीटर रुंद खडक संपूर्ण शहर भुईसपाट करू शकतो, असे ‘डीडब्ल्यू’च्या वृत्तात म्हटले आहे.

अंतराळ संस्था अशनीचा धोका टाळण्यासाठी कसे कार्य करतात?

नासासारख्या अंतराळ संस्था सध्या ग्रहांच्या संरक्षण यंत्रणेवर काम करत आहेत; ज्यामुळे संभाव्य आपत्तीजनक परिणामांसह या अशनींची पृथ्वीशी टक्कर होण्यापासून रोखता येईल. उदाहरणार्थ, नासा आणि जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी यांच्यातील संयुक्त प्रकल्प डबल एस्टेरॉइड रीडायरेक्शन टेस्ट (DART) ही नासाची पहिली ग्रह संरक्षण मोहीम होती. २०२२ मध्ये DART अंतराळयानाने Dimorphos नावाच्या अशनीचा आकार आणि मार्ग दोन्ही यशस्वीरीत्या बदलले. Dimorphosचा पृथ्वीला धोका नव्हता आणि तो ग्रहापासून सुमारे ११ दशलक्ष किलोमीटर अंतरावर सूर्याभोवती फिरत होता.

Story img Loader