अनेक लोक बाहेरच्या जगापासून दूर राहात असले तरी बाहेरच्या जगात काय सुरू आहे, याची माहिती त्यांना असते. याचे कारण आहे सोशल मीडियाचे जग. जगाशी जुळून राहण्यासाठी, आपल्या आसपासच्या परिसरात काय सुरू आहे त्याविषयी सतर्क राहण्यासाठी, जगात काय सुरू आहे त्याबद्दल सजग राहण्यासाठी लोक सोशल मीडियावर अगदी सकाळी उठल्यापासून बातम्या वाचतात. त्यात काही बातम्या चांगल्या असतात, तर अधिकाधिक बातम्या नकारात्मक असतात. नकारात्मक बातम्यांचा अर्थ काय, तर एखाद्या आजाराशी संबंधित किंवा अपघाताशी संबंधित बातम्या. अशाच बातम्यांच्या वाचनामुळे लोकांना अगदी नैराश्य आणि तणावाचा सामना करावा लागत आहे. याला कारणीभूत आहे ‘डूमस्क्रोलिंग.’ ‘डूमस्क्रोलिंग’ म्हणजे काय तर सोशल मीडियावर नकारात्मक बातम्या सतत स्क्रोल करणे.

परंतु, निरोगी आहाराप्रमाणेच आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून आपण बातम्यांच्या वाचनाबाबतही आवश्यक काळजी घेतली पाहिजे. संशोधनातून हे समोर आले आहे की, तुम्ही बातम्यांच्या वाचनाभोवती एक सीमा निश्चित केल्याने मोठा फरक पडू शकतो. बातम्यांचे वाचन करताना संतुलन कसे साधता येते? डूमस्क्रोलिंग नक्की काय आहे? त्याला कसे टाळायचे? त्याचे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात? हे जाणून घेऊ.

नकारात्मक बातम्यांच्या वाचनामुळे लोकांना अगदी नैराश्य आणि तणावाचा सामना करावा लागत आहे. याला कारणीभूत आहे ‘डूमस्क्रोलिंग.’ (छायाचित्र-फ्रीपीक/इंडियन एक्सप्रेस)

‘डूमस्क्रोलिंग’ टाळण्यासाठी काय करावे?

ऑनलाइन स्क्रोलिंगचा वेळ नकारात्मक बातम्या, व्हिडीओ, फोटो किंवा नकारात्मक माहिती मिळवण्यात घालवण्यालाच डूमस्क्रोलिंग म्हटले जाते. हे टाळण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी करता येऊ शकतात. तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची माहिती ठेवावी अशी सक्ती का वाटते; हा प्रश्न स्वतःला विचारा की, ही माहिती माझ्यासाठी किती उपयुक्त आहे आणि मी यामुळे काय बदलू शकतो. बऱ्याचदा लोक सवय म्हणून स्क्रोल करत नाही, तर जगात नियंत्रणाची भावना प्राप्त करण्याचा प्रयत्नही करत असतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, नकारात्मक बातम्या स्क्रोल केल्याने तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि नैराश्य, चिंताही वाढू शकते.

तुम्ही करत असलेल्या सोशल मीडिया माध्यमांचा वापर हेतुपुरस्सर आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता. तुम्ही वाचता त्या बातम्यांच्या स्रोतांबद्दल चोख राहा. तुम्ही काय पाहता ते सोशल मीडिया अल्गोरिदमना ठरवू देण्याऐवजी काही विश्वसनीय आउटलेट निवडा. बातम्यांचे वाचन करत असताना तुम्हाला काय वाटते याकडे लक्ष द्या. जर तुम्हाला चिंता किंवा भावनिक त्रासाची चिन्हे दिसू लागली, तेव्हा हे विश्रांतीचे संकेत असतात. बातम्यांच्या वाचनासाठी एक वेळ निश्चित करा आणि त्या वेळेतच बातम्यांचे वाचन करा. बातम्यांचे वाचन करताना झोपेत व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या.

असहय्य वाटून घेऊ नका

बातम्यांच्या वाचनापासून विश्रांती घेणे म्हणजे स्वत:ची काळजी घेण्यासारखे आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक बातम्यांच्या वाचनासाठी काही सीमा निश्चित करतात ते सहसा महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्यस्त राहण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार कृती करण्यास अधिक सुसज्ज असतात. ते मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहतात. बातम्या वाचताना पुढील गोष्टींचा अवलंब करू शकता:

बातम्यांच्या वाचनापासून विश्रांती घेणे म्हणजे स्वत:ची काळजी घेण्यासारखे आहे. (छायाचित्र-फ्रीपीक/इंडियन एक्सप्रेस)
  • तुम्ही बातम्या वाचता तेव्हा सतत स्क्रोल करू नका.
  • पूर्ण बातमी वाचण्यासाठी एक किंवा दोन सखोल लेख निवडा.
  • बातमी संदर्भातील तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी सहकारी, मित्र आणि कुटुंबीयांशी बातम्यांवर चर्चा करा.
  • सकारात्मक बदलावर आधारित असणाऱ्या बातम्या वाचा.

विविध ॲप्स आणि टूल्सदेखील आहेत, जे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी योग्य अश्या डिजिटल सवयी लागण्यासाठी मदत करू शकतात. हे ॲप्स तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी विविध पद्धती वापरतात, तुमचे स्क्रोलिंगपासून लक्ष वळवण्यासाठी मार्ग प्रदान करतात. बातम्या क्युरेशन ॲप्सनंतर वाचण्यासाठी लेख जतन करण्याची परवानगी देतात, यामुळे सर्व काही त्वरित वाचण्याची तातडीची वाटणारी गरज दूर होऊ शकते. अनेक स्मार्टफोन्समध्ये आता स्क्रीन टाइम मॅनेजमेंट वैशिष्ट्य देण्यात आले आहे, जसे की Apple’s Screen Time किंवा Android’s Digital Wellbeing. तुम्ही तुमच्या स्क्रोलिंग सवयींचे परीक्षण करण्यासाठी आणि सोशल मीडिया किंवा न्यूज ॲप्सवर तुम्ही किती वेळ घालवता हे व्यवस्थापित करण्यासाठी याचा वापर करू शकता.

एखाद्या गोष्टीबद्दल माहिती राहणे म्हणजे त्याच्याशी सतत कनेक्ट राहणे असा याचा अर्थ होत नाही, त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही ॲप्सचा वापर करू शकता. तुम्ही उत्पादकता ॲप्स आणि इतर साधने वापरत असल्यास लहान प्रारंभ करा. डूमस्क्रोलिंग कशामुळे ट्रिगर होते याकडे लक्ष द्या आणि त्यानुसार तुमची सेटिंग्ज बदला. संपूर्णपणे बातम्यांपासून डिस्कनेक्ट करणे हे याचे ध्येय नाही, परंतु माहितीसह मनःशांती राखणे यामध्ये संतुलन शोधणे आवश्यक आहे.

Story img Loader