निठारी हत्याकांड हा देशाच्या गुन्हेगारी विश्वातील गुन्हेगारीचा काळा अध्याय आहे असंच म्हणावं लागेल. अंगावर काटा येणं, किळस येणं या शब्दांच्या उपमाही कमी पडतील इतकं भयंकर हे प्रकररण होतं. या प्रकरणात सुरिंदर कोली आणि मणिंदर सिंह पंढेर या दोघांची फाशीची शिक्षा अलहाबाद हायकोर्टाने रद्द केली आहे. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

प्रकरण कसं उघडकीस आलं?

२००६ मध्ये नोएडाच्या निठारी गावातल्या कोठी क्रमांक डी ५ च्या नाल्यातून सांगाडे मिळू लागले. ही बातमी जशी देशभरात पसरली तेव्हा संपूर्ण देश हादरला. कारण सीबीआयला तपासा दरम्यान ४० अश्या गोण्या मिळाल्या होत्या ज्यामध्ये मानवी अवयवांचे तुकडे होते. या प्रकरणी पोलिसांनी कोठीचे मालक मोनिंदर सिंह पंढेर आणि त्याचा नोकर सुरिंदर कोली या दोघांना अटक केली. ७ मे २००६ ला पायल नावाची एक मुलगी बेपत्ता झाली. ती मोनिंदर पंढेर यांच्या कोठीमध्ये रिक्षाने आली होती.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

पायल ज्या रिक्षाने आली होती त्यातून उतरुन ती आतमध्ये गेली. मी आत जाऊन येते आणि तुला पैसे देते असं तिने सांगितलं होतं. त्यामुळे हा रिक्षावाला या कोठीबाहेरच थांबला होता. बराच वेळ झाला तरीही पायल बाहेर आली नाही. त्यामुळे रिक्षावाल्याने पैसे घेण्यासाठी आत जाऊन कोठीचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी सुरिंदर कोलीने त्याला सांगितलं की पायल इथून निघून गेली आहे. रिक्षावाल्याचं म्हणणं होतं की मी कोठीसमोरच थांबलो होतो पायलला जाताना पाहिलेलं नाही. यानंतर पायल नावाची मुलगी बेपत्ता झाल्याचं प्रकरण समोर आलं. पायलच्या वडिलांनी या प्रकरणी FIR नोंदवली आणि पोलिसांनी तिचा शोध सुरु केला.

पोलिसांना या प्रकरणात हे लक्षात आलं की निठारीतून १२ पेक्षा जास्त मुलं बेपत्ता झाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पायलकडे एक मोबाइल होता जो स्विच ऑफ लागत होता. पोलिसांनी या नंबरचे कॉल डिटेल्स काढले तेव्हा त्यांना मुंबईसह अनेक भागांमधले नंबर मिळाले. या फोन क्रमांकांची चौकशी झाली त्यात असं काही आढळलं की पोलिसांनी कोठीवर छापा मारला. त्यानंतर मणिंदर सिंह पंढेर आणि सुरिंदर कोली या दोघांना अटक केली. ज्यानंतर निठारीचं भयंकर हत्याकांड उघडकीस आलं.

निठारीमध्ये राहणारा सुरिंदर कोली हा मुळचा उत्तराखंडमधल्या अल्मोडा गावातला आहे. तो २००० मध्ये दिल्लीला आला. दिल्लीला आल्यानंतर कोली हा एका ब्रिगेडियरच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करत होता. तो उत्तम स्वयंपाक करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली.

२००३ मध्ये पंढेर आणि सुरिंदर कोली हे एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतरसुरिंदर कोली हा पंढेरकडे काम करु लागला. २००४ मध्ये पंढेरचं कुटुंब पंजाबला निघून गेलं. त्यावेळी मोनिंदर पंढेर हा एकटाच त्याच्या कोठीत राहात होता. त्यानेच सुरिंदरलाही राहण्यासाठी बोलावलं. पंढेरच्या या कोठीत अनेकदा कॉल गर्ल्स यायच्या, त्यावेळे सुरिंदर हा गेटवर नजर ठेवायचा. हळूहळू कोलही नेक्रोफिलिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त झाला. लहान मुलांबाबत त्याला आकर्षण वाटू लागलं.

डी-५ ही कोठी ज्या ठिकाणी आहे तिथून शाळेत जाणाऱ्या मुलांवर कोली नजर ठेवून असायचा. तो लहान मुलांना पकडून त्यांच्यावर बळजबरी करत असे आणि मग त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करत असे. निठारी गावातल्या लोकांनी पोलिसांना हेदेखील सांगितलं होतं की पंढेरच्या कोठीतून मानवी अवयवयांची तस्करी केली जाते. लहान मुलांचे अवयव काढून ते विदेशात विकले जात होते.

नेक्रोफिलिया हा आजार नेमका काय आहे?

नेक्रोफिलिया हा असा आजार आहे ज्यात माणूस मृतदेहाशी शरीर संबंध प्रस्थापित करतो. जिवंत महिलेवर बलात्कार केला आणि महिलेने विरोध केला तर काय? या भीतीतून हा आजार जडलेले लोक हे महिलेची हत्या करतात आणि त्यांच्या मृतदेहाशी सेक्स करतात. सुरिंदर कोली हा याच आजाराने ग्रस्त होता.

निठारी हत्याकांड प्रकरणात खटला उभा राहिल्यानंतर काय काय घडलं?

२९ डिसेंबर २००६ या दिवशी मणिंदर सिंह पंढेर आणि सुरिंदर कोली या दोघांना पोलिसांनी अटक केली.

३० डिसेंबर २००६ या दिवशी तपास सुरु झाला आणि डी-५ या कोठीबाहेरच्या नाल्यात पोलिसांना लहान मुलांचे सांगाडे मिळाले.

१ जानेवारी २००७ ला या हत्या प्रकरणी पोलीस आणि गावकरी यांच्यात संघर्ष झाला. त्यानंतर पोलिसांनी पंढेर कुटुंबाची चौकशी केली.

५ जानेवारी २००७ ला उत्तर प्रदेश पोलिसांनी संशियत पंढेर आणि कोली यांची नार्को टेस्ट केली.

१० जानेवारी २००७ ला हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं.

११ जानेवारी २००७ ला सीबीआयने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आणि सीबीआयचं पहिलं पथक निठारीला पोहचलं. डी-५ या कोठीजवळून त्यांनी ३० हाडं ताब्यात घेतली.

१२ जानेवारी २००७- मोनिंदर सिंह आणि सुरिंदर कोली यांची चौकशी सीबीआयने सुरु केली.

२० जानेवारी २००७ : उत्तर प्रदेश सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात या प्रकरणी अहवाल सादर केला.

८ फेब्रुवारी २००७ : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पंढेर आणि कोली या दोघांनाही १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.

१२ फेब्रुवारी २००७ : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणात एक समिती स्थापन केली.

२८ फेब्रुवारी आणि १ मार्च २००७ : सुरेंद्र कोलीचा जबाब नोंदवण्यात आला, त्याची व्हिडीओग्राफी करण्यात आली.

२२ मे २००७ : सीबीआयने गाझियाबादच्या कोर्टात पहिलं आरोपपत्र दाखल केलं. सुरिंदर कोलीवर बलात्कार, अपहरण आणि हत्या हे आरोप ठेवण्यात आले. तर मोनिंदर सिंह पंढेरवरचे गुन्हे हे सौम्य स्वरुपाचे होते.

२००८ मध्ये काय काय घडलं?

१ मे २००८ ला निठारी हत्याकांडातल्या तीन पीडितांच्या वडिलांनी मुख्य आरोपी पंढेरला हत्या आणि अपहरण या आरोपांमध्ये न घेणाऱ्या सीबीआयच्या निर्णयाविरोधात न्यायलायचा दरवाजा ठोठावला.

११ मे २००८ : गाझियाबाद न्यायालयाने सीबीआयला पंढेर चा या सगळ्या प्रकरणात काय वाटा होता त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

६ सप्टेंबर २००८: निठारी हत्याकांडात मारल्या गेलेल्या मुलीच्या वडिलांचा मृतदेह पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या एका नदीत आढळून आला.

१ नोव्हेंबर २००८: सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातल्या एका पीडितेच्या नातेवाईकाने केलेल्या आरोपांनंतर सीबीआयला नोटीस धाडली. या पीडितेच्या नातेवाईकाने हा आरोप केला होता की निठारी प्रकरणात पंढेरला वाचवण्याचा प्रयत्न सीबीआयकडून केला जातो आहे.

१३ डिसेंबर २००८ : गाझियाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयाने मणिंदर पंढेर विरोधात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि त्यांची हत्या केल्याचा आरोप निश्चित केला.

२००९ मध्ये काय घडलं?

१२ फेब्रुवारी २००९ या दिवशी विशेष सीबीआय न्यायाधीशांनी पंढेर आणि कोली या दोघांनाही बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरवलं.

१३ फेब्रुवारी २००९ : निठारी मध्ये ज्या १२ हून अधिक हत्या झाल्या त्याततल्या १४ वर्षीय मुलीसह बलात्कार आणि तिची हत्या केल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने पंढेर आणि कोली या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली.

११ सप्टेंबर २००९: अलाहबाद कोर्टाने पंढेरला जी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्याकडे डोळेझाक करत त्याला दिलासा दिला. मात्र कोलीची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

२८ सप्टेंबर २००९ : आठ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणात कोलीला तिसऱ्यांदा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

२२ डिसेंबर २००९ : सुरिंदर कोलीला चौथ्यांदा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

यानंतर ७ जानेवारी २०१० या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने कोलीच्या फाशीला स्थगिती दिली.

२०१४ मध्ये काय घडलं?

२० जुलै २०१४ या दिवशी सुरेंद्र कोलीची दया याचिका तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी फेटाळली.

८ सप्टेंबर २०१४ च्या दिवशी रात्री एक वाजता कोर्टाने कोलीच्या फाशीला स्थगिती दिली. ती दिली नसती तर कोलीला त्याच दिवशी फाशी दिली जाणार होती.

७ सप्टेंबर २०१४ ला सर्वोच्च न्यायालयाने सुरिंदर कोलीच्या फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली.

१२ सप्टेंबर २०१४ च्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निठारी हत्याकांडातील आरोपी सुरिंदर कोलीच्या फाशीला अंतरिम स्थगिती दिली.

२९ जानेवारी २०१५ च्या दिवशी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पीठाने कोलीच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. दया याचिकेवर निर्णय करण्यास उशीर नको हे सांगत हा निर्णय दिला गेला.

यानंतर २०१७ मध्ये काय काय झालं?

२२ जुलै २०१७ या दिवशी सीबीआय च्या विशेष न्यायालयाने मोनिंद सिंह पंढेर आणि सुरेंद्र कोली यांना दोषी ठरवलं आणि २४ जुलै रोजी शिक्षा सुनावली जाईल हे सांगितलं.

२४ जुलै २०१७ या दिवशी कोली आणि मोनिंदर सिंह यांना २० वर्षीय पिंकी सरकारच्या हत्या आणि बलात्काराच्या प्रयत्नाच्या प्रकरणाता दोषी ठरवलं. या दोघांविरोधात हत्येचा हे आठवं प्रकरण होतं. आता या प्रकरणात मोनिंदर सिंह पंढेर आणि सुरिंदर कोली या दोघांचीही फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.